खा ते वाटप : पत्रकार हेमंत जोशी

खा ते वाटप : पत्रकार हेमंत जोशी 

जेव्हा तुमची बायको तुम्हाला घसा धरल्यानंतर मीठ आणि पाणी एकत्र करून देते तेव्हा एकतर त्यात मीठ नसते आणि पाणी थंड असते किंवा अधिक मीठ घातलेले असते आणि तोंड आतून भाजेल एवढे ते पाणी गरम असते पण तेच काम ती मुलांच्या बाबतीत परफेक्ट करते. मंत्रिमंडळ खातेवाटपाचे देखील असेच आहे म्हणून त्यास्नी मी खा ते वाटप असे म्हटलेले आहे. हे राज्य

यापुढे अधिकाधिक बिघडवून  ठेवण्यासाठी कंगाल आणि बकाल करण्यासाठीच ज्यांना जसे शोभेल त्यापद्धतीने खा ते वाटप करण्यात आलेले आहे. गेल्या २० वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्यात काहीही चांगले घडलेले नाही. कोट्यवधी रुपयांचा आलेला फंड अमुक एखाद्या कामावर फारतर ३० टक्के खर्च करण्यात येतो बाकी ७० टक्के पैसे वरपासून तर खालपर्यंत आपापसात सारे वाटून घेतात. या राज्यात असा एकही रस्ता नाही जो उखडलेला नाही खराब नाही ज्यावर खड्डे नाहीत. अत्यंत जीवघेणे रस्ते संपूर्ण राज्यातले असे या राज्याचे चित्र आहे. पैसे खाऊन देखील दर्जेदार कामें केल्या जातात हे गडकरी सूत्र जर अशोक चव्हाण यांनी निदान यावेळी आत्मसात केले तरच राज्यातली जनता जीव मुठीत न घेता रस्त्याने प्रवास करू शकते अन्यथा जे सतत २० वर्षे घडते आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात जी केवळ पैसे लुटण्याची प्रत्येकाची भूमिका आहे असते ते तसेच पुढे सुरु राहील…


www.vikrantjoshi.com

सार्वजनिक बांधकाम खात्यातील अंदाधुंदीवर आजतागायत अनेक पत्रकार समाजसेवक आमदार किंवा विविध संघटना नेते तुटून पडल्याचे मला तंतोतंत माहित आहे पण त्यांचे देखील तुटून पडणे व्यक्तिगत स्वार्थासाठीच असते म्हणजे आधी तुटून पडायचे नंतर तोडपाणी करायची हि अशीच या सर्वांची भूमिका असल्याने त्यातून काहीही निष्पन्न निघत नाही. एखाद्या असहाय्य्य तरुणीवर कसे एकाचवेळी अनेक बलात्कार करतात, आपल्या राज्यातल्या बान्धकाम खात्यात किंवा अन्य साऱ्याच खात्यात नेमके हेच घडते आहे जो उठतो तो त्या त्या खात्यावर बलात्कार करून मोकळा होतो. नागपूरच्याच नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते सोपविण्यात आलेले आहे याआधी ते नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होते, बावनकुळे मंत्री होण्याआधी वीज खात्यात स्वतः कंत्राटदार होते त्यानंतर ते मंत्री असतांना त्यांच्या घरातलेच काही सदस्य वीज खात्यात ऊर्जा खात्यात कंत्राटदार होते, थोडक्यात बावनकुळे यांना या राज्यातले वीज खाते तंतोतंत पाठ असतांना ठाऊक असतानाही त्यांना वीज खात्याशी संबंधित काही अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी असे काही गोत्यात आणले कि पुढे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्या सांगण्यावरून गडकरी फडणवीस व स्वतः बावनकुळे यांनी जंग जंग पछाडून देखील विधानसभेला बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली नाही कारण त्यांच्या हातून चुकून माकून जे पाप घडले होते ते अक्षम्य होते ज्याची त्यांना मोठी शिक्षा एकप्रकारे मिळाली. नितीन राऊत यांना तर ऊर्जा खाते कशाशी खातात हे देखील माहित नाही आणि त्या वीजमंडळात तर तेच बिलंदर कंत्राटदार आणि अधिकारी पदाधिकारी बसलेले आहेत, त्यामुळे यावेळी राऊत यांच्या चुकांवर नेमके बोट ठेवतांना आम्हाला नक्की हुरूप येणार आहे. त्यांनी चुका केल्या तर त्यांनाही मोठी किंमत नक्की मोजावी लागणार आहे…

असे कानावर आले कि औरंगाबाद येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वीज खात्यातील बडे प्रस्थ, मोठे कंत्राटदार विवेक देशपांडे यांची ऊर्जा मंत्री नितीन राऊत मोठी चौकशी लावणार आहेत. न केलेल्या कामांचे करोडो रुपये विवेक देशपांडे यांनी घेतल्याचे नितीन राऊत यांच्या संबंधितांनी पहिल्याच दिवशी म्हणे नजरेत आणून दिलेले आहे. हरकत नाही, जर कोणतीही तोडपाणी होऊ न देता हे घडणार असेल तर राऊत यांचे करावे तेवढे कौतुक कमी आणि या पद्धतीने जर राऊत कडक वागणार असतील तर त्यांना माझ्यासारखे माहितगार अनेक पुरावे आणून देतीलही, बघूया, नितीन राऊत पुढे पुढे कशी भूमिका घेतात ते…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *