केवल वयस्कोके लिये : पत्रकार हेमंत जोशी

केवल वयस्कोके लिये : पत्रकार हेमंत जोशी 

ऐन मधुचंद्राच्या राती पत्नीची पाळी यावी आणि पुढले काही अत्यंत महत्वाचे दिवस नवरदेवाला भजन कीर्तनात घालावे लागावेत किंवा उत्तम पोहे समोर आल्यानंतर नेमका पहिल्याच घासाला पोरकीडा चमच्यात यावा किंवा तुमच्या आवडत्या मोलकरणीने नेमके लाडात यावे, तेवढ्यात तुमच्या कजाग आडदांड बायकोने पलंगावर उडी घ्यावी किंवा विवाहित मैत्रिणीने तिच्या घरी बोलावून घ्यावे आणि दाराआड तिने हाती काठी देऊन आडदांड नवऱ्याला उभे करावे आपले मनोरथ तेथेच हवेत विरावे किंवा प्रेयसीला घेऊन एखाद्या आडवाटेच्या हॉटेलात रूम बुक करावी आणि खोलीत शिरत नाही तोच पोलिसांमुळे तुमच्यावर रुमालाने अर्धवट तोंड झाकण्याची वेळ यावी ते तसे माझ्या लंडन स्थित मित्र विजय डफळ याजवर आलेली आहे. विजयची आणि माझी ओळख अझरभाईजान या देशातल्या राजधानीत एका रेस्टारंट मध्ये जेवतांना झाली. विजय तसा पुण्याचा पण व्यवसायानिमीत्ते लंडनला स्थिरावला आणि त्याच्या व्यवसायानिमीत्ते तो आणि मला आवड असल्याने मी जगभर फिरत असतो म्हणून आमची आधी भेट नंतर ओळख आणि ओळखीचे रूपांतर मोठ्या मनाच्या विजयशी मैत्रीत झाले…

करोनाचे संकट आले तेव्हा विजय अझरभाईजानला त्याची आई पुण्याला आणि पत्नी व दोन लहान मुली लंडनला होत्या, याला देश सोडायला सांगितल्यावर हा थेट पुण्याला आला आणि येथेच अडकला, परिस्थिती गंभीर झाल्याने आता तो लंडनला जाऊ शकत नाही, त्याने जी चूक केली त्यावर मी वर काही उदाहरणे दिली योगायोगाची. आता त्याचे लंडनला व्हिडीओ कॉलवर तेवढे बोलणे होते त्यात विरहाची दर्दभरी गाणी अधिक असतात. खरी गम्मत पुढे आहे म्हणजे विजय अडकला तेही टोमणे मारणाऱ्या पुण्यात आणि तेही त्याच्या एका सोसायटी मधल्या सदनिकेत, सुरुवातीला तर त्याला थेट १४ दिवस होम कोरंटाईन व्हावे लागले, रिझल्ट निगेटिव्ह आल्यावर आता खाली उतरल्यानंतर सोसायटीतले सारे त्याच्याकडे अशा नजरेने बघतात कि जणू एखाद्या खानदानी कुटुंबात नागपुरातल्या गंगा जमाना किंवा जळगाव जिल्ह्यातल्या माहिजी मधली एखादी नको ती बाई घुसली आहे. पण करणार काय बिच्चारा, साऱ्यांच्या नको नको त्या नजरा सहन करतोय…

अलीकडे आपण सारे कमालीचे आपापल्या क्षेत्रात नको तेवढे व्यस्त आणि त्रस्त झालो आहोत, त्यामुळे करोना निमित्ते यादिवसात घरात राहणे कंपलसरी झाले आहे आणि नको तेवढे आपले आर्थिक व्यावसायिक नुकसान होते आहे त्यामुळे तुम्ही आम्ही सारेच कमालीचे अस्वथ आहोत किंवा येत्या काही दिवसात आपल्यापैकी अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा लागणार आहे आणि तशी गरज पडली तर घ्यावा देखील, पण पूर्वी विशेषतः आमच्या लहानपणी म्हणजे ७०-८० च्या दशकात म्हणजे आपल्या आधीच्या पिढीपर्यंत तसे अजिबात नव्हते, बहुतेकांना उन्हाळ्याच्या दोन महिने सुट्या  असायच्या, घरी वातानुकूलित यंत्रणा तर फार दूर साधे पंखे किंवा मनोरंजनाचे कोणतेही साधन नसायचे त्यामुळे भर दुपारी देखील आई बाबा त्यांच्या मुलांना जबरदस्तीने झोपण्या सांगायचे आणि मुले झोपल्या झोपल्या ते स्वतः आई बाबा आई बाबा खेळ खेळात बसायचे असे काही बुजुर्ग मला सांगतात अन्यथा तुम्हाला तर माहित आहेच का  मी याबाबतीत किती इनोसंट आहे.  थोडक्यात, मित्रहो, तुम्ही देखील पूर्वीच्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात पुन्हा एकदा अवतरले आहात असे समजून आपला वेळ कोणत्याही चिंता काळज्या न करता मजेत घालवा म्हणजे तुमचे प्रकृती स्वास्थ्य चांगले टिकेल आणि करोना  संकट एकदाचे टळले कि पुन्हा पूर्वीसारखे जोमाने आपणा सर्वांना कामाला लागून झालेले नुकसान काही महिन्यात नक्की भरून काढता येईल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *