नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक दुसरी लपविण्यासाठी तिसरी चवथी पाचवी अशा चुका सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन आत्महत्या कि खून प्रकरणी या प्रकरणाशी संबंधित साऱ्यांच्याच होत गेल्या निष्पन्न निघणार आहे शिक्षा नुकसान अपमान आणि बदनामी. सर्वाधिक नुकसान याप्रकरणी होणार आहे ते मुंबई आणि राज्याच्या पोलिसांचे आणि राज्यातल्या तमाम जनतेचेही कारण ज्या पद्धतीने विनाकारण अजिबात गरज नसतांना कुठल्यातरी बदमाश नेत्याला खुश व इम्प्रेस करण्यासाठी मुंबई पोलिसातील काही वरिष्ठांनी चुकीचे, चुकीच्या पद्धतीने त्यात अडकलेल्या रियासारख्या काही मंडळींना सहकार्य केले ज्यामुळे नजीकच्या भविष्यात पोलिसांनो तुम्हा आम्हा सर्वांनाच या चुकीचा मोठा त्रास फार मोठा मनःस्ताप नक्की होणार आहे. यामुळे यापुढे आता असे घडेल कि गुन्हेगार येथे या मुंबईत या राज्यात गंभीर गुन्हे करून थेट बिहारला पळून जातील जेथे त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या आपल्या पोलिसांना यापुढे सहकार्य मिळणार नाही सहजासहजी शिरकाव मिळणार नाही एवढेच काय राज्याचे पोलीस तेथे गेलेच तर त्यांना मारहाण होऊ शकते ज्यात आमच्या पोलसांना अतिशय चिडलेल्या बिहारी पोलिसांचे कुठेही सहकार्य मिळणार नाही त्यामुळे यापुढे गुन्हेगारांचे देखील हेच ठरलेले असेल कि येथे गुन्हे करून मोकळे व्हायचे आणि थेट बिहार मध्ये पलायन करायचे. अन्य राज्यातले गुन्हेगार देखील बिहार मध्ये पळून जातील…


www.vikrantjoshi.com

कोणावरही लिखाण किंवा टीका करतांना आम्हाला आजपर्यंत कधीही कोणाचेही भय वाटले नाही पण सुशांत व दिशा प्रकरण ज्याप्रकारे सुरुवातीला दाबल्या गेले त्यामुळेच आता भीती वाटायला लागलेली आहे, येथे या राज्यातल्या बदमाशांविरुद्ध यापुढे लढा द्यायचा कि येथेच थांबायचे. कारण दिव्या भारतीपासून तर सुशांतसिंग पर्यंत चित्रपटसृष्टीतले खून ज्यापद्धतीने आजपर्यंत आत्महत्या दाखवून सारी प्रकरणे व गुन्हे विशेषतः मुंबई पोलिसांनी रफा दफा करून ते मोकळे झाले आहेत उद्या इतरांच्या बाबतीत देखील हे असे सऱ्हास घडणार आहे,आणि मराठी माणसाची शिवसेना सत्तेत असतांना हे घडते आहे ज्याची मोठी किंमत यापुढे राज्यातल्या जनतेला आणि शिवसेनेलाही चुकवावी लागणार आहे. वाचकहो, जे घडलेच नाही त्यावर कृपया कोणाचीही अजिबात बदनामी करू नका जसे सोशल मीडियावर कार मध्ये बसलेल्या आदित्य ठाकरे यांचा कुठल्याशा नटीबरोबर एक फोटो सर्वदूर व्हायरल करण्यात आला आहे आणि त्याखाली “आदित्य विथ रिया चक्रवर्ती” असे लिहिण्यात आलेले आहे जे तद्दन चूक आहे खोटे आहे ती नटी रिया नसून दिशा पटणी आहे, रियाला आपल्या कार मध्ये कधीही आदित्य ठाकरे यांनी बसविले नसल्याची माझी १००% माहिती आहे…

विवाहापूर्वी आदित्य यांच्या हातून चुका घडू शकतात पण चुकीच्या प्रकरणात त्यांना विनाकारण ओढून बदनाम करू नका. विशेष म्हणजे आदित्य यांनी देखील बापाच्या पावलावर पाउल ठेऊन स्त्रियांच्या बाबतीत उद्धव व्हावे,आदर्श ठरावे एकेकाळी अत्यंत पराक्रमी तेजस्वी ठरलेला काका जयदेव होऊन शिवसेनाप्रमुख होण्याची चालून आलेली संधी गमावू नये म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती करू नये म्हणजे जयदेव यांना बाळासाहेबांनी दूर केले आणि उद्धव यांना जवळ घेऊन त्यांना आपली  गादी चालविण्यास दिली, आदित्य तुम्ही देखील अशाच पद्धतीने वागत गेलात तर तुमचाही काका होईल आणि उद्धवजी तेजसला नाईलाजाने पुढे करून मोकळे होतील. आम्हा पत्रकारांना कोणताही राजकीय पक्ष महत्वाचा नसतो पण माझ्यासाठी मराठी बाणा आणि हिंदू असल्याचा मोठा अभिमान आहे. ठाकरे परंपरा आम्हा सर्वांचे दैवत आहे आणि देव हा राम असावा लागतो रावण नव्हे. तुमच्यातला जो तो उठतो आणि सांगत सुटतो कि हे भाजपाचे कारस्थान आहे पण तुम्हाला अत्यंत महत्वाची बातमी येथे आज सांगतो तुमच्या आणि वरुण सरदेसाई विषयी विशेषतः शिवसेना नेते आणि मंत्र्यांमध्ये फार मोठी अस्वस्थता आहे, नाराजी आहे, ती का आहे त्याची करणे शोधून काढा. आजच त्यावर विचारमंथन करून सावध व्हा. तुमच्यातलेच अनेक तुमच्या पाठी लागले आहेत का जरा शोध घ्या. या राज्यात शिवसेनेचे महत्व संपणे किंवा कमीही होणे आम्हाला कोणालाही ते परवडणारे नाही. वरुण सरदेसाई तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे मिलिंद नार्वेकर असतील पण त्यांनीही तेवढीच काळजी घ्यायला हवी कि तुमची, मातोश्रीची आणि तुमच्या आईवडिलांची कुठेही कधीही बदनामी होणार नाही. प्रत्त्येक पुरावा छापायचा नसतो पण येथे तुम्हाला आणि उद्धवजींनाही सावध करणे तेही न घाबरता माझे काम कर्तव्य होते ते मी केले तुम्ही त्यातून हवा तो अर्थ काढा…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *