सामंत दणाणून सोडला आसमंत : पत्रकार हेमंत जोशी

काही वाक्ये खूप छान असतात. कालच कुठेतरी वाचले, जेव्हा एखादा पुरुष बायकोसाठी कार डोअर उघडतो, समजावे कि एकतर गाडी नवीन आहे किंवा बायको तरी…

येथे ज्या नेत्यावर मी लिहिणार आहे तो तरुण आहे पण राजकारणात, समाजकारणात नवीन नाही, राजकारण किंवा समाजकारण इतर बहुतेकांसारखा त्याचा धंदा नाही कारण वडिलोपार्जित धंदा त्याचा वयाच्या सत्तरीतील बाप आणि मोठा भाऊ समर्थपणे सांभाळतात, त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी तो राजकारणात आणि समाजसेवेत उतरलेला नाही, ही दोन्ही क्षेत्रे त्याने स्वतः निवडलेले आहेत, त्याला या दोन्ही क्षेत्रात घरदार विसरून काम करायला आवडते, म्हणून तो सतत राजकारणात यशस्वी आहे, रत्नागिरीचे आमदार, शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे नेते, दिलदार आणि दमदार उदय सामंत ही ते नाव आहे, पार पडलेल्या जिल्हापरिषद किंवा महापालिका निवडणुकीत सेनेची पडझड होत असतांना तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात, रत्नागिरी विधान सभा मतदारसंघात किंवा रत्नागिरी शहरात थेट उद्धव ठाकरे यांना सुखावणारे निकाल बाहेर पडत होते, म्हणून उद्धवजींनी एक बरे केले, निवडणुकांआधीच ते या जिल्ह्याशी संबंधित एका मंत्र्याला म्हणाले होते, तसे त्यांनी त्याला सांगितले होते कि मला रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची हमखास सत्ता आणायची असल्याने, तुम्ही एक करा, तिकडे फारसे फिरकू नका, आपली मते कमी होतात, अकेले उदय काफी है, मंत्र्याला ते पटले, मग त्या मंत्र्याने इकडे मुंबईत बसून नेहमीप्रमाणे त्यांच्या खात्यात धुडगूस घालणे नेहमीप्रमाणे पसंत केले आणि उदय यांनी अगदी सहज यश संपादन केले… 

अलीकडे म्हणजे ज्या दिवशी या राज्याचे वीज मंत्री श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या कन्येच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर सहकुटुंब गेले होते, दुसरेच दिवशी माझी त्यांच्याशी विमानतळावर गाठ पडली, त्यानंतर त्यांनी जे सांगितले ते ऐकतांना आणि त्यांनी सांगतांना आम्ही दोघेही देहभान विसरून गप्पात रंगलो, एक मंत्री म्हणून आपण रस्त्याच्या कडेला उभे राहून का गप्पा माराव्यात, असला फाजील शिष्टपणा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अंगी भिनलेला नाही, तिकडे नागपुरातही त्यांचे असेच साधे वागणे मी प्रत्यक्ष बघितलेले आहे. रवी भवनमधल्या त्यांच्या सरकारी बंगल्याबाहेर उभे राहूनच ते घोळक्यात रमतात आणि भेटणाऱ्याचा चेहरा न बघता त्यांची कामे तेथल्या तेथे करून ते मोकळे होतात, म्हणून तेही उदय सामंत यांच्याप्रमाणे ते सतत यश खेचून आणतात, लोकप्रियता मग अशा नेत्यांच्या घरी पाणी भरते…

तर त्यादिवशी विमानतळावर बावनकुळे यासाठी देहभान विसरले कि ते जेव्हा निमंत्रण द्यायला आयुष्यात प्रथमच मातोश्रीवर आणि उद्धव यांच्यासमोर गेले, ते म्हणाले, मला असे कुठेही वाटले नाही कि मी आयुष्यात पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटतोय, खूप जुनी ओळख असल्यासारखी ते आणि त्यांचे कुटुंब ३५ मिनिटे आमच्याशी गप्पा मारण्यात रंगले, त्यात कुठेही राजकारण नव्हते किंवा माझ्या अत्यंत आवडत्या नेत्यांचा म्हणजे गडकरी आणि फडणवीसांचा त्यांनी कुठलाही खोचक उल्लेख केला नाही. मी त्यांना म्हणालोही कि फक्त एकदा म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान तुमचा मला थेट फोन आला होता कि उमेदवार कृपाल तुमाने यांना मनापासून सहकार्य करा, आणि मी त्यावेळी उद्धवजी तुमचा मान, आदर राखून आमचे मित्र तुमाने यांच्यासाठी प्रसंगी १६-१६ 

तास काम केले….

बावनकुळे यांनी जे उद्धव ठाकरेंविषयी जे सांगितले ते खरे आहे, समोरच्या कोणत्याही माणसाला आपलेसे करण्याची किमया त्यांनी साधलेली आहे,म्हणून कि काय अलीकडे रश्मी ठाकरे सतत त्यांच्या सोबतीला असतात किंवा आदित्यला तरी धाडतात, न जाणो उद्धवजींचा ‘ कीर्तिकर ‘ झाला तर, अर्थात हा गमतीचा भाग झाला, उद्धव किंवा देवेंद्र यांच्यावर स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्यवर संशय घेणे म्हणजे प्रभू रामचंद्राला, चालू होता, म्हणण्यासारखे ठरेल….

माफ करा, नेहमीप्रमाणे मूळ विषय भरकटला, माझे ही असे नेहमीचेच म्हणजे बायको समोर असतांना घरी नव्याने आलेल्या तरुण मोलकरणीची आस्थने चौकशी करतो, नुकसान होते, दुसरेच दिवशी, तुझ्या सासूला किंवा आईला आमच्याकडे कामाला पाठव, असे घरातून तिला फर्मान निघते. तर येथे या ठिकाणी मला रत्नागिरीचे आमदार आणि सेनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे दमदार नेते श्रीमान उदय सामंत यांच्याविषयी काही सांगायचे आहे. उदय आणि उद्धव यादोघांत एक साम्य नक्की कि उद्धवजींप्रमाणे श्रीमान उदय सामंत हेही नव्याने भेटायला आलेल्या किंवा ते एखाद्याला भेटायला गेले तर पुढल्या पाच मिनिटात, समोरच्या भेटणाऱ्याला आपलेसे करून मोकळे होतात, किमया अशी कि त्यांचा एखादा कट्टर राजकीय विरोधक देखील एकदा का त्यांच्यासमोर आला कि मनातला राग किंवा हृदयात साठून ठेवलेला विरोध विसरतो आणि उदय सामंत यांना घट्ट बिलगून मोकळा होतो. वास्तविक माझी रत्नागिरीची एक तरुण आणि सुंदर मैत्रीण, मला अनेकदा म्हणते, माझी उदय सामंत यांच्याशी एकदा ओळख करून दे कि, मी हे सहज काम का दुर्लक्षितो, तुमच्या लक्षात आलेच असेल, अलीकडे रिस्क घेणे नको वाटते म्हणून तर पत्रकार उदय तानपाठक यांची मी रिमा लागू यांच्याशी ओळख करून दिलेली नाही, ऑफ द रेकॉर्ड म्हणजे माझीही या वयस्क अभिनेत्रीशी ओळख नाही. समजा तानपाठक यांचा धर्मेंद्र झाला तर, मागे नाही का एकदा मी तुम्हाला म्हणालो होतो, ढोसल्यानंतर हे महाशय माँ असे म्हणून थेट एका बुजुर्ग अभिनेत्रीला झोंबून मोकळे झाले होते. गमतीचा भाग सोडा पण आमच्यातला उदय तानपाठक असा एकमेव पत्रकार कि तो देखील अमुक एखाद्याला भेटल्यानंतर पुढल्या पाच मिनिटात त्याला आपलेसे करतो, म्हणजे एखाद्या सकाळी जर त्याची थेट भेट बाराक ओबामाच्या बायकोशी भेट झाली तर, निदान मला तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही, त्याच संध्याकाळी मॅडम उदय यांच्या स्वयंपाक घरात पोळ्या लाटताहेत….

तो आला त्याने पहिले त्याने जिंकले, या वाक्यातून थेट प्रकट होतात ते श्रीमान उदय सामंत, त्यांच्याविषयी आणखी काही पण पुढे….

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *