आशिष शेलार कामगिरी दमदार : पत्रकार हेमंत जोशी

आशिष शेलार कामगिरी दमदार : पत्रकार हेमंत जोशी 

सार्वजनिक स्वरूपाचे किंवा वैयक्तिक काम कधी आमदार तर कधी नामदार या नात्याने आशिष शेलार यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर हाती वाटाण्याच्या अक्षता ठेवल्या आणि रिक्त हस्ते हाकलून लावले असे अपमानित करून पाठवणारे आशिष शेलार नाहीत, अर्थात मनापासून सहकार्य करतात म्हणून उद्या तुम्ही काहीही सांगू नका कि अमुक एका मुलीशी माझे प्रेमप्रकरण जुळवून द्या, आमच्या मुलींसाठी स्थळ शोधा, आमच्याबरोबर पत्ते खेळा, आम्हाला पिकनिकला घेऊन चला, आमच्याबरोबर झिम्मा फुगडी खेळा, असे काहीही त्यांना सांगत बसू नका, कडेवर घेतले म्हणून डोक्यावर चढून मुतून ठेवू नका, पण व्यक्तिगत फायद्याचे विशेषतः सार्वजनिक स्वरूपाचे कुठलेही योग्य काम त्यांच्याकडे न्या, शक्य नसेल तर शेलार आज या उद्या या परवा भेटूया, पुढल्या आठवड्यात नक्की, असे हवेतले शब्द फेकून तुम्हां भुलवणारे किंवा झुलवणारे नेते नाहीत ते पारदर्शी आहेत म्हणून लोकप्रिय आहेत…


शेलारांना विचारायचा अवकाश कि तुम्ही, तुमच्या पक्षाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने, मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी या मुंबईसाठी काय हो केले, क्षणाचाही विलंब न लावता शेलार मुखोद्गत असल्यासारखे मुंबईच्या विकास कामांविषयी फाडफाड बोलायला सुरुवात करतात. अहो, मी किंवा खासदार या नात्याने पूनम महाजनांनी नक्की अनेक विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा केला पण केंद्राने आणि राज्याने दाखल घेतली म्हणून आमचे मुंबई विकासाचे स्वप्न पूर्ण झाले असे मी नक्की सांगू शकतो. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जेव्हा तयार होणार आहे, तेव्हा सारे तोंडात एकाचवेळी पाचही बोटे आश्चर्याने घालून मोकळे होणार आहेत. राज्याच्या विकासाचा फार मोठा पल्ला पुढल्या केवळ वर्ष भरात सुरु होणाऱ्या समृद्धी महामार्गाने गाठला असे जो तो ज्याला त्याला सांगत सुटेल…


www.vikrantjoshi.com


आमच्या मुंबईत केवढा तरी समुद्र किनारा पण जलवाहतूक सुरु करून रहदारीचा ट्राफिकचा प्रश्न निकालात काढावा कधी आघाडीच्या हे लक्षात आलेच नाही किंवा त्यांनी कधी लक्ष न घातल्याने मुंबईकरांचे रस्त्यावर किंवा लोकल ट्रेन्स मध्ये होणारे हाल त्यांना होणारा त्रास, बघवत नाही त्यावर जलवाहतूक हा सर्वोत्तम पर्याय आहे असे आमच्या मनात आले लवकरच ते प्रत्यक्षात उतरल्याचे तुम्हाला दिसेल. मोनो रेल्वेचा सुरु होणारा दुसरा टप्पा, त्यानेही डोकेदुखी नक्की कमी होईल. महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेत मी नगरसेवक म्हणून अनेक वर्षे काम केल्याने माझ्या मतदारसंघात त्यांच्याकडून नेमकी कशा पद्धतीने आणि कोणती लोकोपयोगी कामें व्यवस्थित करवून घ्यायची हे मला तोंडपाठ आहे, सुदैवाने माझ्या मतदारसंघातले माझ्या पक्षाचे विद्यमान नगरसेवक नगरसेविका त्यांच्या जबाबदाऱ्या अतिशय प्रभावी पद्धतीने पार पडत असल्याने माझा मुंबईतील हा मतदार संघ जगाला, इतरांना कायम आकर्षणाचा आनंदाने फिरण्याचा बागडण्याचा विषय ठरला आहे. आमच्या या मतदारसंघात अप्रतिम मेंटेन केलेल्या गार्डन्स मध्ये तर येथिल आणि बाहेरचे कायम पिकनिक स्पॉट म्हणून बघायला फिरायला येतात…


आशिष शेलार आणि जवळपास दररोजच त्यांच्या भोवताली भरणारा जनता दरबार, एकदम रेकॉर्ड ब्रेक म्हणजे विविध समस्या घेऊन आमच्या या मतदारसंघातले आणि बाहेरचे देखील म्हणजे राज्यातले, मुंबईतले, जगातले, देशातले असंख्य त्यांच्या भोवती ते भेटले रे भेटले कि वेटोळे करून बसतात आणि त्यांनी काम सांगितले रे सांगितले कि शेलार त्यांचे काम होणे शक्य असेल तर तेथल्या तेथे करून मोकळे होतात. विशेष म्हणजे अमुक एखाद्याने सांगितलेले काम झाले कि नाही याचा नेमका 

पाठपुरावा करण्यासाठी शेलारांनी बांद्र्यात त्यांच्या घराखाली एक कार्यालय थाटून ठेवलेले आहे, तेथे दिवसभर हेच चालते, अमुक एखाद्याचे त्याने सांगितलेले काम झाले आहे किंवा नाही. कार्यालयात जर नजरचुकीने अमुक एखाद्याने लक्ष घातले नाही तर अशावेळी आशिष शेलार यांचा रुद्रावतार देखील बघण्यासारखा असतो, लोकांसाठी काहीही हे त्यांचे स्वप्न असल्याने, त्यांना कोणत्याही कामात कसूर केलेली आवडत नाही, लोकांकडे दुर्लक्ष त्यांना राग अनावर होतो पण तो तात्पुरता असतो…

क्रमश: हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *