स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि हिरवे दिसे नेत्यांना २ : पत्रकार हेमंत जोशी

बायकांच्या घोळक्यात कायम रमणाऱ्या राशीचाक्रकार उपाध्येबुवांच्या पद्धतीने सांगायचे झाल्यास मीन राशीची माणसे कायम द्विधा मन:स्थितीत असतात म्हणजे नेमका कोणता निर्णय घ्यावा यावर त्यांचा कायम गोंधळ असतो म्हणजे बायकोला गजरा घेऊन जायचा कि त्याआधी मैत्रिणीला चुंबनाचा आहेर करून घरी जायचे किंवा ‘ तूच माझी राणी ‘ हे नेमके कवेत घेतल्यानंतर प्रेयसीला म्हणायचे कि बायकोच्या केसात गजरा खोवतांना तिला म्हणायचे असा त्यांच्या मनाचा कायम गोंधळ असतो आणि याच गोंधळात ते बायकोला प्रेयसीच्या नावे आवाज देऊन नंतर पुढले दोन तीन दिवस तिच्या हातचा भरभरून मार खातात. राहुल गांधी असोत कि सोनिया गांधी किंवा कॉंग्रेसचे इतर बोलणारे नेते, त्यात मौनिसिंग उर्फ मनमोहनसिंग यांना कृपया गृहीत धरू नये, थोडक्यात कॉंग्रेसमध्ये बोलणारे जे नेते आहेत, मला वाटते त्यातले बहुतेक मीन राशीचे असावेत कारण बोलतांना, भाषण करतांना कायम त्यांच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो म्हणजे एकीकडे ते म्हणतात, नरेंद्र मोदी हुकुमशहा आहेत आणि त्याचवेळी ते हे देखील बोलून मोकळे होतात कि भाजपवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हुकुमत आहे, त्यांनी नक्की करायला नको का कि त्यांना कोणावर निशाणा साधायचा आहे, साराच गोंधळ. समजा केंद्रातल्या किंवा राज्यातल्या भाजपा सरकारवर संघाचा प्रभाव आणि दबाव आहे तर हे ते सांगू शकतील का किंवा सपुरावा स्पष्ट करतील का कि केंद्रात मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना जशा प्रत्येक निर्णयाच्या नसत्या हुकुमावरून जशा सोनिया, वद्रा किंवा राहुल यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय त्यावर पंतप्रधान सही करणे शक्य नव्हते ते तसे येथे घडले का किंवा घडते का कि अमुक एखादी केंद्रातली किंवा राज्यातली फ़ाइल संघ मुख्यालयातून हिरवा कंदील दाखविल्या गेल्याशिवाय बाहेर पडलेली नाही, आणि हे असे वागणे अत्यंत धडाकेबाज नरेंद्र मोदी यांच्या हातून घडणे शक्य आहे का….? हे असे एकदा जरी त्यांना संघ मुख्यालयातून सांगितल्या गेले तर मोदी उठतील आणि राजीनामा देऊन बाहेर पडतील. फक्त एकदा जेव्हा मोदी यांच्या लक्षात आले होते कि नितीन गडकरी हे संघाच्या तालावर नाचून त्यांना त्रास देऊ बघता आहेत मग मोदी यांनी आधी गडकरी यांना अध्यक्षपदावरून खाली खेचले, संघाला किंवा भागवत यांना नको तिथे नाक न खुपसण्याचा दिला दिला, गडकरी आणि भागवत वरम्ल्यानंतर मग याच गडकरी यांचे मोदींनी राजकीय पुनर्वसन केले त्यांना केंद्रात महत्वाचे स्थान देऊन दाखवून दिले कि गाढवाच्या मागून आणि माझ्या पुढून जाण्याचा प्रयत्न केलात तर लाथ बसेल.तेच पुढे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत त्यांनी पक्षाच्या बैठकीत अगदी जाहीर सांगून टाकले होते. मुंडे हयात असते तर तेच या राज्याचे मुख्यमंत्री केल्या गेले असते, आता ते हयात नाहीत त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच असतील. आणि घडलेही तेच, विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी घेतलेला तो निर्णय असल्याने मुख्यमंत्री म्हणून अनेक इच्छुक होते पण तोंडातून त्यावर एकानेही साधा शब्द काढला नाही कि मला मुख्यमंत्री करा अन्यथा त्यांचा देखील ‘ गडकरी ‘ झाला असता….वर दिलेले संदर्भ हेच सांगतात कि भाजपवर संघाचा प्रभाव किती हे नेमके सांगणे कठीण पण या पक्षावर नरेंद्र मोदी यांची हुकुमत आहे, प्रभाव आहे, आणि हाच नेमका टीकेचा मुद्दा पुढे करून कॉंग्रेस नेत्यांनी गमावलेली सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करावा, उगाच त्यांनी आपली मन:स्थिती द्विधा ठेवू नये, हसे होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *