अब आयेगा मजा : पत्रकार हेमंत जोशी

अब आयेगा मजा : पत्रकार हेमंत जोशी 

डॉ. काशिनाथ घाणेकर मीना कुमारी लक्ष्मीकांत बेर्डे सतीश तारे इत्यादी अनेक आजच्या किंवा आधीच्या नट किंवा नट्या तुम्हा आम्हाला माहित आहेत कि त्यांनी घेतली कि त्यांना अभिनयाची भट्टी अधिक उत्तम जमून येत असे. येथे हा उल्लेख रीया चक्रवर्ती संदर्भात देखील मला येथे करायचा आहे. भामटा राजदीप सरदेसाई तर तोंडावर आपटला पण वाईट वाटले ते आज तक वाहिनीचे आणि सतीश मानशिंदे या दोघांचे निदान त्यांनी तरी भारतीयांच्या व मराठी माणसांच्या असे नजरेतून उतरणे मनाला वाईट वाटले मनाला यातना झाल्या. आणि रियाच्या संदर्भात जरा माहिती घ्या कि त्यादिवशी तिची पढवलेली मुलाखत आज तक वाहिनी वर अधिक सफाईदार व्हावी म्हणून तिला तू तुझा रोजचा डोस घेऊनच मुलाखत दे असे कोणी सांगितले होते. बघा तुमच्या सोर्स मधून माहिती मिळवा म्हणजे तुमच्या ते सहज लक्षात येईल कि पत्रकार किंवा एखाद्या मुलाखतीचे प्रायोजक किंवा आयोजक कसे व किती खालच्या थराला जाऊ शकतात ते. रिया पण एक अभिनेत्रीच आहे आणि काहींना नशा केली कि अभिनयाची भट्टी अधिक उत्तम जमून येते म्हणून का रियाला तसे करण्यास सांगण्यात आले… 

रियाला तर काय स्वतःचा बचाव करण्यासाठी वाट्टेल ते करावे लागले तरी ते तिला मान्य असेलच पण त्या मुलाखती मागे ज्यांचे ज्यांचे हात होते राग त्यांचा आला कि आम्ही भारतीय हिंदू किंवा मराठी किती खालची पातळी गाठून काहींना वाचविण्याचा कसा व किती किळसवाणा प्रकार घडवून आणतो आहे. रियाने जवळपास एक तास चाळीस मिनिटे चाललेली मुलाखत संपवली आणि ज्यांच्या डोक्यात रियाची तद्दन खोटी मुलाखत घेण्याचे आले त्यांची मला आधी किळस आली नंतर राग आला. मी त्यावेळी  म्हणालो, चला राजदीप ने हि मुलाखत घेऊन रिया सहित अनेकांचा  आज मार्ग कठीण करून सोडला, आता नेमके तेच घडते आहे. कदाचित या मागे असलेले नेते किंवा एखादी राजकीय पार्टी, मुलाखत घडवून आणणाऱ्या जाहिरात कंपन्या आज तक हि वाहिनी राजदीप सरदेसाई रिया चक्रवर्ती तिला नेमके काय व कसे खोटे बोलायचे हे लिहून देणारे समजावून सांगणारे कायदेतज्द्न्य सारेच भारतीयांच्या नजरेतून त्याक्षणी उतरले आहेत पण या प्रकरणात बघ्याची भूमिका घेणारे शरद पवार वेडे नाहीत कारण त्यांना माहित आहे कि वर बसलेला जो कडवा हिंदू राजा आहे तो पाप्यांना आणी पापात सहभागी व सामील असणाऱ्या प्रत्येकाला मग तो कोणीही असो सोडत नाही सोडणार नाही. एक कडवा हिंदू राजा आणि पाक विचारांचे जे कोणी मुसलमान या देशात ड्रग्स चा धंदा घेऊन बसले आहेत त्यांना हा राजा सोडणे शतसर टक्के अशक्य. हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा, हा राजा बीसीसीआय करून राहील त्यांना सुतासारखे सरळ करेल हे नक्की ठरलेले आहे… 

बघा मी जे तुम्हाला येथे सांगत आलोय तेच उघड होते आहे. आज आणखी एक महत्वाचे सांगतो कि ज्या दिशा सालियन ची आत्महत्या दाखवण्यात आलेली आहे ती आत्महत्या नसून खून आहे हे एक दिवस नक्की उजेडात येणार आहे आणि महत्वाचे म्हणजे नार्कोटीज सीबीआय इत्यादी मंडळींनी अद्याप दिशा सालियन प्रकारणावर काहीही सांगितलेले नाही कारण अतिशय धूर्तपणे ड्रग्स सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकारणाचा छडा लावण्याचे नक्की वर ठरलेले आहे. अस्थाना वानखेडे किंवा अन्य सारे अधिकारी जे मुंबईत डेरेदाखल आहेत त्यांच्या साऱ्यांच्या दृष्टीने हा तपास महत्वाचा आहे आणि तो  सुरु आहे. मराठी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी भलेही यावर बातम्या करू नये पण केलेल्या बातम्या प्रायोजक असाव्यात असे जे चित्र त्यांच्यापैकी अनेकांच्या बाबतीत दिसते आहे त्यावरून ते आपली लोकप्रियता झपाट्याने घालवून बसणार आहेत कारण रियाच्या बाजूने बातम्या देणे म्हणजे एकप्रकारे ड्रग्स व्यवसायाला ते समर्थन देणे असे त्यातून सिद्ध होते आहे जे मराठी माणसाला मग तो कोणत्याही विचारांचा असो नक्की आवडण्यासारखे पटण्यासारखे नाही. रियाची राजदीप सरदेसाई ने आधी घेतली हिंदीतून मुलाखत ती एकाच छापील पद्धतीने त्यानंतर काही वेळातच मराठी वाहिन्यांनी दाखविणे त्यादिवशी तो प्रकार तर शिसारी आणणारा ठरला. सार्या मराठी वाहिन्या त्याक्षणी किळसवाण्या वाटल्या… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *