निखिल वागळे १ : पत्रकार हेमंत जोशी

निखिल वागळे १ : पत्रकार हेमंत जोशी 

गुण दोषांनी खचाखच भरलेल्या पत्रकार निखिल वागळे यांचे आडनाव बदलविणाऱ्या म्हणजे त्यांच्या लिखाणातून कायम स्वरूपी ‘ वटवागळे ‘ असे करणाऱ्या आणि एकेकाळी निखिल वागळे व कपिल पाटील यांचे या जोडगळीचे नेमके हिडीस स्वरूप कित्येक वर्षांपूर्वी या समाजासमोर तंतोतं उघड करणाऱ्या पत्रकार भाऊ तोरसेकर यांना वंदन करून निखिल वागळेंवर पुढे लिहायला सुरुवात करतो…


येथे एक अतिशय महत्वाचे सांगतो कि मुंबई किंवा राज्यातले जे पत्रकार स्वतःला प्रतिष्ठित म्हणवून घेतात पण ते प्रत्यक्षात अजिबात प्रतिष्ठित मूल्याधिष्ठित नसून पडद्याआड ज्यांचे आयुष्य अतिशय काळेबेरे असते पण असे आयुष्य ज्यांना भाबड्या समाजासमोर अजिबात उघड करायचे नसते असे संपादक वृत्तपत्र मालक पत्रकार मला किंवा भाऊ तोरसेकर यांना कायम वचकून असतात, आम्हाला दूर ठेवतात त्यामुळे मला किंवा भाऊ तोरसेकर यांना मुंबई प्रेस क्लब मध्ये नक्की एन्ट्री नाही कारण तेथे हे असे भंपक आणि भामटे मीडियावाले खचाखच भरलेले असतात म्हणजे ज्यांचे धंदे वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे तेथे कायमचा अड्डा करून असल्याने अशा ठिकाणी आमची अवस्था शनी शिंगणापूर मंदिरातल्या स्त्रियांसारखी असते, काही तेथे येणारे जाणारे चांगलेही असतात पण ते बलात्कार झाल्यानंतरही मूग गिळून बसणार्या स्त्रीसारखे मान खाली घालून वावरतात, मग एखादाच विनय जोशी तेथे जन्माला येतो आणि पत्रकारांचे हिडीस स्वरूप समाजासमोर उघड करतो…


www.vikrantjoshi.com


पण हे असे भंपक तसे संख्यने कमी याउलट स्वतःचे गूण दोष अजिबात न लपविता मला मोठ्या भावासारखे किंवा भाऊ तोरसेकर यांना साक्षात वडिलांच्या जागी ठेवून आमच्यावर प्रेम करणाऱ्या आमचे सहकार्य मग ते अगदी कुठल्याही कामांसाठी असेल येऊन मागणाऱ्या आमच्याजवळ त्यांच्या आयुष्यातले सारे बरे वाईट उद्योग, प्रसंग उघड करून आमच्यावर विश्वास ठेवणार्या या राज्यातल्या बड्या पत्रकारांची, सर्वच मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींची संख्या अधिक आहे कारण त्यांना हे शंभर टक्के माहित आहे कि भाऊ तोरसेकर असोत अथवा हेमंत जोशी प्रसंगी त्यांच्यासाठी जीव धोक्यात घालून सहकार्य करायला पुढे येतील पण त्यांना सांगितलेली गुपितेते इतरांकडे कधीही उघड करणार नाहीत…


मी मोठ्यांशी वर्षानुवर्षे मैत्री कशी टिकवतो त्याचे सिक्रेट येथे सांगतो. जी मोठी माणसे मग उदय निरगुडकर असतील जयराज साळगावकर असतील, भाऊ तोरसेकर, अरुण देव, अनंत गाडगीळ, माधव भंडारी, अतुल लोंढे, डॉ. विश्वास पाठक, श्रीकांत भारतीय, अनिल थत्ते, कैलास म्हापदी, उल्हास पवार, आशिष शेलार, हर्षल प्रधान, हेमंत टकले, शिरीष देशपांडे, गिरीश गांधी किंवा कितीतरी उच्च अधिकारी, आजी माजी मंत्री किंवा मुख्यमंत्री असतील विविध मान्यवर व्यावसायिक असतील या राज्यातल्या अशा हजारो मान्यवरांशी माझे संबंध टिकून आहेत कारण ते जेव्हा तुमच्याशी बोलतात, संवाद साधतात तेव्हा त्यांचे म्हणणे बोलणे सांगणे शांतचित्ताने 

ऐकून घ्यायचे असते, मीच कसा शहाणा असे त्यांना आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवू द्यायचे नसते विशेष म्हणजे हि अशी माणसे त्यांच्या बोलण्याच्या ओघात अनेक गुपिते फोडून मोकळी होतात पण जीव गेला तरी अशी गुपिते कुठेही उघड करायची नसतात, माझ्या या अशा वागण्याने मला स्वतःला आयुष्यात मोठा फायदा झाला आहे, होतो आहे…


ज्या पत्रकार निखिल वागळे यांना वयाच्या केवळ २२ व्य वर्षी एकेकाळी दर्जेदार म्हणवून गाजलेल्या ‘ दिनांक ‘ सारख्या साप्ताहिकाचे संपादक म्हणून करिअर सुरु करता आले त्यानंतरही त्यांची मीडिया मधली कारकीर्द दिवसागणिक वलयांकित होत गेली, बहरत गेली अलीकडे त्याच निखिल वागळे यांना जेव्हा काही कामच उरलेले नाही बघून किंवा ते जे अलीकडे सुरु करण्याच्या तयारीत आहेत म्हणजे त्यांना जे आता साधे सोपे असे न्यूज पोर्टल सुरु करायचे आहे, हे सारे बघून मला त्यांची तुलना डर्टी पिक्चर मधल्या विद्या बालनशी करावी वाटते. मराठी जगात आपले नाव धाडसी सेवाव्रती देशभक्त पत्रकार म्हणून छाप पाडणारे निखिल वागळे नेमके कसे, काय त्यांची नेमकी यशापयशाची गुपिते मला तुमच्यासमोर बिनधास्तपणे उघड करायची आहेत.ज्यांना आपल्या आयुष्यात खूप मोठे व्हायचे आहे, नाव कमवायचे आहे त्यांनी नेहमी एकच ध्यानात ठेवायचे असते कि मी नेमका जसा वाईट किंवा चांगला आहे, मला माझे नेमके हिडीस आणि गोंडस दोन्ही प्रकारचे रूप लोकांसमोर न लपविता सांगायचे आहे, गुप्त ठेवायचे नाही त्यामुळे होते काय कि तुम्हाला मोठे झाल्यानंतर किंवा मोठे होतांना कोणतीही अडचण येणार नाही, अडचण येत नाही. नाना पाटेकर यांचे नेमके तेच झाले आहे कि त्यांना त्यांच्या खाजगी आयुष्यातले नेमके दोष किंवा केलेल्या भानगडी लपवून मी कसा चांगला तेवढे त्या तनुश्री दत्ता प्रकरणात दाखवायचे आहे पण नानांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांची प्रकरणे नेमकी तशीच म्हणजे त्या त्या स्त्रीला प्रचंड मानसिक त्रास झालेली असावीत असे मला वाटते, अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांना नानांच्या या प्रेमप्रकरणांचा विचित्र वागण्याचा जो मनस्वी मानसिक प्रचंड त्रास झाला त्यांनीच आता पुढे येऊन त्या कशा त्यांच्या मुलांना किंवा मल्हारला घेऊन एकट्या राहिल्या, लोकांसमोर पुढे येऊन सांगायला हवे पण जर नीलकांती आणि नाना हे या समाजातले निखिल वागळे पद्धतीचे चेहरे आणि मुखवटे वेगवेगळे, पद्धतीचे जीवन जगणारे असतील तर अशी विशेषतः समाजवादी विचारसरणीची माणसे वैयक्तिक आयुष्यात नेमकी वेगळी कशी, सर्वसामान्य जनतेसमोर ते पोहोचतच नाही, मोठी झालेली ढोंगी माणसे हि आपल्या देशातली फार मोठी शोकांतिकाआहे, एवढेच म्हणता येईल..

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *