बाळ उद्धव कि उद्धव बाळ : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी


बाळ उद्धव कि उद्धव बाळ : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

ते शरद पवार आहेत त्यांचे काहीही चुकलेले नाही कारण त्यांची स्वतःची राजकीय पार्टी आहे त्यामुळे ते तुमचे वाटोळेच करायला बसले आहेत, तुम्ही ते ठरवायचे आहे कि वाटोळे कितीमी करून घ्यायचे किंवा वाटोळे करवून घ्यायचे किंवा नाही. जसे त्यांनी जाळ्यात ओढून राज ठाकरे यांचे वाटोळे केले उद्या त्यांना तेच क्रमाक्रमाने शिवसेना काँग्रेस आणि भाजपाचे करायचे आहे. राज ठाकरे आणि भाजपा अशी युती होण्याआधी जर पुन्हा शिवसेना आणि भाजपाची युती झाली तर ते शंभर टक्के त्या दोघांनाही फायद्याची ठरणार आहे पण युती झाली नाही तर नुकसान भाजपाचे नव्हे शिवसेनेचे होणार आहे कारण शिवसेना भाजपा एकत्र आले नाहीत तर भाजपासमोर जो पर्याय पुढे आला आहे तेच घडेल म्हणजे भाजपा मनसेशी युती करून मोकळी होईल. त्यानंतर भाजपा म्हणजे शरद पवार नव्हेत कि राज ठाकरे यांना आधी वापरून घेतील नंतर त्यांना दूर करून मोकळे होतील. असे कधीही घडणार नाही, एकदा का भाजपने या राज्यात मनसेशी युती केली तर त्याचा फायदा मनसे आणि भाजपाला होईल, आघाडी मध्ये राहून शिवसेना आणि उद्धव ठाकरे व ठाकरे घराण्याचे फार भले होईल हे दूरदूरपर्यंत दिसत नाही…


www.vikrantjoshi.com

आता तर हे असे झाले कि तुझ्या प्रेयसीला, बायकोला माझ्याकडे पाठवून दे म्हणजे मी तिचे मुके घेतो लाड करतो पप्प्या घेतो नंतर तिला तुझ्याच घरी सोडून येतो. हे असे चालले आहे त्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचे. म्हणजे शरद पवार किंवा अजित पवार काँग्रेस आणि सेनेच्या मंत्र्यांना बोलावून घेतात, उद्धव दुरून गम्मत बघतात त्यांचे त्यातून हसे होते आहे आणि पवारांची राजकीय पॉवर झपाट्याने वाढते आहे. विचार तर खरे त्या एकनाथ शिंदे यांना ते का संतापलेत अलीकडे जेव्हा त्यांना थेट शरद पवार यांनी बोलावून घेतले वरून त्यांच्याशी दोन तास चर्चा केली, ठाणे जिल्ह्यातील विविध कामांचा आणि त्यांच्याकडील खात्यांचा आढावा घेतला. आणि हे असे सतत घडते आहे कारण उद्धव ठाकरे यांनीच तशी मोकळीक काका व पुतण्याला देऊन ठेवलेली आहे. म्हणजे मंत्री  उदय सामंत उद्धव यांच्यासमोर कमी आणि अजित पवारांसमोर अधिक हजेरी देत असतील तर उद्धव यांनी लक्षात घ्यावे कि सततच्या सहवासाने जर आकर्षण निर्माण झाले तर उफाडी मुलगी बापाच्या मित्राशी देखील लग्न करून मोकळी होते. नेमके नाजूक तब्बेतीचे कारण आहे कि शासन चालविण्याचा अनुभव गाठीशी नसल्याने उद्धव असे वागताहेत कळत नाही पण सध्या तरी त्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम करणे आणि आदित्य यांचे मंत्री म्हणून काम करणे, एखाद्या पुणेकराला शोभावे असे आहे म्हणजे दुपारी वामकुक्षी सकाळी उशीरा  कामांना सुरुवात आणि रात्री घरी जाण्याची घाई….

पत्रकारांना कोणताही पक्ष नसतो त्यामुळे सत्तेत कोण यासी आम्हाला फारसे देणेघेणे नसते फक्त एकच वाटत राहते कि पुनःपुन्हा राज्याचे वाटोळे करणारे सत्तेत नसावेत, नेमके तेच सुरु झाल्याने पोटतिडकीने लिहितो आहे, पुन्हा पूर्वींसारखी हिशेबाची टक्केवारीची गणित जोमाने जोराने सुरु झालेली आहेत कारण उघड आहे कि यातल्या प्रत्येकाला माहित आहे आपले काही खरे नाही त्यामुळे टाळूवरचे जेवढे लोणी खाता येईल तेवढे खाऊन मोकळे होणे हे एवढेच उद्देश ध्येय समोर ठेऊन मंत्रालय सुरु आहे, मंत्र्यांना नेहमीच्याच बदमाश अधिकाऱ्यांची मनापासून साथ आहे. हीच ती वेळ आणि संधी भाजपाला या राज्यावर सत्तेत पुन्हा पकड घेण्याची पण त्यांच्यातला उत्साह निघून गेल्यासारखे दिसते आहे त्यातून इकडे लक्ष घालण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांसारखे बडे नेते तिकडे दिल्लीत पत्रके मतदार याद्या वाटण्यात स्वतःला धन्य समजताहेत. आजही सांगतो उद्धव आणि देवेंद्र यांचे मनसे फारसे बिनसले नाही पण मोहन भागवत किंवा नितीन गडकरी यांच्या सारख्या मान्यवर बुजुर्ग मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटविणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा नेमके तेच घडेल जे मराठी माणसाला नको आहे कि मोठे राजकीय नुकसान शिवसेनेचे होईल कारण मनसे भाजपा त्यांचे तर ठरलेले आहे एकत्र येण्याचे. एकच सांगतो सध्या जे राजकीय चित्र दिसते रंगते आहे ते फारसे चांगले नाही, सामान्य लोकांचे नुकसान करणारे आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *