दोन पुस्तके ३ : पत्रकार हेमंत जोशी

दोन पुस्तके ३ : पत्रकार हेमंत जोशी 

आपले किंवा आपल्या मुलांचे विवाह वर्ष दोन वर्षे जरी लांबलेत तरी आपल्यावर जणू आभाळ कोसळले आहे असे आम्हा सर्वांना वाटत असते, थोडे थांबा, विचार करा, संघ स्थापनेपासून तर आजतागायत ज्या तरुणांनी संघ प्रचार प्रसार आणि विस्तारासाठी आयुष्यातली महत्वाची वर्षे कुठलेही करिअर न करता अविवाहित राहून जे योगदान दिले आहे, असे कधी कुठे घडत असेल अजिबात आढळले नाही, दूरदूरपर्यंत दिसतही नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे अनेक तरुण उच्च शिक्षित आणि श्रीमंत घरातलेही, पण रा. स्व. संघात पूर्ण वेळ प्रचारक होणारे अविवाहित असावेत हि प्रमुख अट असते तरीही आम्हाला पूर्ण वेळ प्रचारक व्हायचे आहे तेथे सांगणाऱ्यांची रीघ असते. अर्थात हा 

त्यागी प्रकार ख्रिश्चन, बौद्ध, जैन इत्यादी धर्मात देखील आढळतो हेही येथे नमूद करणे आवश्यक वाटले…

संघ प्रचारक अविवाहित राहतात किंवा उशिरा करिअर आणि लग्न करतात हे फॅड डोक्यात ठेवून संघाकडे पाठ फिरवावी हेही योग्य नाही, आपल्या मुलांना संघ शाखेत पाठवतांना हे असले काहीतरी डोक्यात घेऊ नको, सांगायला मायबापांनी विसरू नये. पण संघातले जे जे काय चांगले आहे ते घेऊन घरी परतणारे मला नाही वाटत हे राज्य विकायला काढतील जे १९८० नंतर इतरांनी केले आहे. मला नाही वाटत संघ शाखेत नियमित जाणारा स्वयंसेवक गटारीला अधिक महत्व देणारा असतो किंवा न चुकता लेडीज बार मध्ये बसून रांडांवर पैसे उधळणारा निघतो. तो घरी आल्यावरही बैठकीत बसून मुलांचा अभ्यास घेणारा असतो, मुले आतल्या खोलीत आणि हा चखण्यासंगे बाहेरच्या खोलीत, असे दृश्य जगभरातल्या कुठल्याही संघ स्वयंसेवकाच्या घरी अभावाने आढळते….

आपली पिढी यापुढे बरबाद होऊ नये यासाठी रा. स्व. संघाच्या मुशीतून जन्माला आलेल्या कोणत्याही संघटनेत शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात काही क्षण घालविणे, चुकीचे ठरेल, अपायकारक असेल असे नक्की वाटत नाही, एखाद्याला गाजवून सोडणारी पत्रकारिता करायची झाल्यास त्याने संघाच्या हिंदुस्थान समाचार मध्ये काही काळ काम करायला हरकत नाही किंवा स्त्रियांनी तरुणींनी राष्ट्र सेविका समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काही क्षण घालविल्यास त्यांचे व्यक्तिमत्व बाळबोध न ठरता राष्ट्राच्या उभारणीत भविष्यात त्यांचेही योगदान महत्वाचे ठरते अशी माझी माहिती आहे. वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, विवेकानंद केंद्र, विश्व हिंदू परिषद इत्यादी अशा संघाच्या कितीतरी विविध फांद्या, जेथे एकदा तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीला त्यांच्या आयुष्यातले काही क्षण घालविण्यास सांगावे असे माझे वैयक्तिक मत झाले आहे. मी दहावी पास होईपर्यंत संघ स्वयंसेवक होतो नंतर मात्र संघ स्वयंसेवक म्हणून कधीही पुढे व आजतागायत संबंध आला नाही पण अलीकडे काळ्या कमाईतून पुढे आलेल्या प्रत्येक मराठी कुटुंबाची जी घडी विस्कटली आहे, त्यावर संघात जाणे हा चांगला उपाय आणि पर्याय ठरू शकतो, अशा घरातली पुढली पिढी अति हिंसक होत असल्याने, त्यांना त्यापासून दूर करणे प्रत्येक मायबापाला प्रकर्षाने वाटते आहे म्हणून मला वाटते अशा पालकांनी हे एकदा करून बघायला हरकत नाही….

राष्ट्र सेविका समिती संघाची महिलांसाठी कार्य करणारी अफलातून संघटना. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्धा येथे लक्ष्मीताई केळकर महात्मा गांधी यांच्या शिष्य होत्या, त्यांना सहा मुले आणि दोन मुली. पुढे वर्ध्यात डॉ. हेडगेवार यांनी संघ शाखा सुरु केल्यानंतर केळकरबाईंची मुले शाखेत जायला लागली. तेथे जाऊ लागल्यानंतर आपले मुलगे अधिक विवेकी आणि प्रगल्भ बनले आहेत त्यांच्या लक्षात आले. हे पाहून त्या डॉ. हेडगेवारांना भेटून म्हणाल्या, मलाही शाखेत येण्याची इच्छा आहे पण स्त्रियांनी संघ शाखेत येण्याची पद्धत नसल्याने ते शक्य नव्हते पण केळकर बाईंची तळमळ आणि उत्साह बघून डॉक्टर देखील प्रभावित झाले आणि त्यांनी महिलांसाठी संघटना उभारण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले, १९३६ साली लक्ष्मी केळकर यांनी राष्ट्र सेविका समिती ची स्थापना करून एक नवीन इतिहास रचला…

मित्रहो, संघ स्वयंसेवक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद हे दोघेही ब्राम्हण नाहीत त्यामुळे हा वामन्या बामणांच्या संघाची बाजू घेतोय,असे कृपया काहीही बरळू नका. या राज्यातल्या माझा व्हास्ट जनसंपर्क, त्यातून काळ्या कमाईच्या जोरावर श्रीमंत झालेल्या कुटुंबाचे सध्या काय हाल आहेत, मला तंतोतंत ठाऊक आहे, बघूया हाही एक प्रयोग करून…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *