चौधरी चाचा ४२० : पत्रकार हेमंत जोशी

चौधरी चाचा ४२० : पत्रकार हेमंत जोशी 

मुंबईत आणि मंत्रालयात नवीन, पत्रकारितेत नवखा, विविध तथाकथित मान्यवर पत्रकारांचा त्याकाळी मंत्रालयाला विळखा, मंत्रालयात येणाऱ्या पत्रकारांची त्याकाळी संख्या देखील जेमतेम, आजच्यासारखे पत्रकारितेचे भरमसाठ पीक त्याकाळी आलेले नव्हते, वाहिन्यांचा, इलेक्ट्रॉनिक मीडिया चा जन्म देखील नुकताच झालेला, त्यामुळे मंत्रालयात वावरणारे वार्ताहर आचार्य अत्रे, लोकमान्य टिळकांचे, आगरकरांचे पत्रकारितेतले जणू आम्ही वारसदार या थाटात वास्तवात अक्कल अगदीच जेमतेम असूनही हे पत्रकार अशा मस्तीत वावरायचे, माझ्याकडे तर अनौरस नालायक पोर पद्धतीने बघायचे, तोंडावर तोंड पडले कि असे काही तोंड वाकडे करून घ्यायचे कि जणू काही मी त्यांची पोरगी अंगाखाली घेतली आणि घातली आहे, अर्थात हा अपमान सुरुवातीला मन आणि तन अस्वस्थ करून सोडायचा, मग एक केले, या मंडळींचे चालू धंदे उजेडात आणायला सुरुवात केली, आणि येथल्या पत्रकारितेतल्या बड्या धेंडांवर मी थेट तुटून पडतो, थेट पत्रकारांच्याच भानगडी बाहेर काढायला सुरुवात केली..

हे येथे मुंबईत नवीन होते त्यामुळे आमचे लिखाण वाचल्यानंतर मी हळूहळू आपोआप चर्चेचा विषय ठरायला लागलो. मला त्याकाळी अतिशय पाण्यात पाहणारे एक पत्रकार होते, आता ते हयात नाहीत, पण हेमंत म्हणजे जणू गुंड आणि मवाली आणि आम्ही म्हणजे पत्रकारितेतील संत तुकाराम, या पद्धतीने त्यांचे माझ्याशी अतिशय हलकट बोलणे बघणे आणि वागणे असायचे. पण असे अजिबात नव्हते, तेच घडले, माझ्याकडे बोट दाखवणारे हे महाशय, पुढे त्यांच्या घराचे जे तीन तेरा वाजले, त्यांच्या हयातीतच पोटच्या मुलांनी त्या नवरा बायकोवर जी वृद्धाश्रमात राहायची वेळ आणली, बघून मला फार वाईट वाटले, या ब्राम्हण पत्रकाराच्या मुलीने पुढे एका पाकड्याशी म्हणजे धर्मांध मुसलमानांशी लग्न केले विशेष म्हणजे त्या पाकड्याने पुढे जाऊन त्यांच्या सूनेचेही मूल आपलेच आहे, असे म्हणे भर कोर्टात सांगितले. या पत्रकाराच्या आयुष्यात त्यांच्यासमोरच आणखी काय काय घडले मी येथे सखोल सांगत नाही पण हेच सांगतो, कोणाचा विनाकारण दुस्वास करू नका, उलट आपल्या क्षेत्रात येणाऱ्याला मनापासून सहकार्य करा, त्याला प्रेमाने जवळ घेऊन शक्य असेल ती मदत करा. अर्थात येथे ते दिवंगत पत्रकार हा विषय नाही, विषय आहे, आपले ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून! आणि याच मुद्द्यावर मी आयुष्यभर ढोंगी मान्यवरांच्या विरोधात लढतो आहे. बघा, वाईट घटना ह्या तुमच्या आमच्या कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात, फक्त 

सांगणे हेच, विडी फुंकतांना एखाद्या आंधळ्याला मी शंख फुंकतोय, असे खोटे सांगू नका…

भारतीयांना दुसऱ्यांना ज्ञानाचे डोस पाजताना आपले काळे धंदे किंवा दोष किंवा व्यसने किंवा शारीरिक विकृती लपवून ठेवण्याची जी घाणेरडी सवय जडलेली आहे, तीच या राज्याला किंवा या देशाला अत्यंत घातक आहे, नेमक्या या अशाच लोकांविरुद्ध लढतांना मी कायम आनंद घेत आलो आहे, हि अशी पत्रकारिता मनापासून एन्जॉय करतो आहे. हे सारे येथे यासाठी कि अलीकडे मुंब्र्याचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकातून युवा समाजसेवक विश्वंभर चौधरी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते वाचून मी खुपसा अवाक यासाठी झालो कि मी त्यांच्यात उद्याचे अण्णा हजारे बघतो आहे नेमके चौधरी हे कसे लफडेबाज, आव्हाड यांनी सांगितल्याने शॉक झालो आहे, पुन्हा तेच, हव्या त्या मार्गाने चौधरी यांनी आपला, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पैसे मिळवावेत पण आमचे नेहमीचे सांगणे कि तोंडात विष्ठा ठेवून श्रीखंड चघळतोय, सांगत सुटू नये. होय, मी अमुक मार्गाने पैसे मिळवितो तरीही मला तमुक लढ्यात उतरायचे आहे हे विश्वंभर चौधरी यांनी सांगून टाकावे, आम्ही मराठी आमच्या नेत्यांना त्यांच्या गुण दोषांसहित स्वीकारतो तयामुळे विश्वंभर चौधरी यांना जर असे वाटत असेल कि आपले खरे स्वरूप बाहेर आल्यानंतर माणसे आपल्याला झिडकारतील तर येथे तसे अजिबात घडत नाही, पण लपवून ठेवलेत तर ते आज ना उद्या बाहेर पडेल जे काम आज विश्वंभर यांच्या बाबतीत आव्हाड यांनी केले आहे, तर मात्र अशांची लोकप्रियता आणि विश्वासाहर्ता झपाट्याने खाली येते आणि मान्यवरांचा मग निखिल वागळे होतो. 

ज्यांना विश्वंभर चौधरी गुरुस्थानी मानतात, आरोप त्या अण्णा हजारे यांच्यावर युती सरकार सत्तेत असतांना शशिकांत सुतार किंवा सुरेशदादा जैन यांनीही मोठ्या प्रमाणावर केले होते, काळाच्या ओघात जैन आणि सुतार संपले, बाजूला फेकल्या गेले, सार्वजनिक जीवनातून उध्वस्त झाले पण अण्णा हजारे यांचे महत्व आजही तेवढेच कायम आहे कारण अण्णांच्या ज्या चुका या दोघांनी काढल्या होत्या, अण्णांनी केलेल्या त्या चुका व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हे तर राळेगण सिद्धीच्या भल्यासाठी आणि समाजहित साधतांना त्यांच्या हातून नकळत घडल्या होत्या, त्यामुळे या समाजाने तरीही अण्णा हजारे परमेश्वराच्या रूपात बघितले आणि ह्या दोन बलाढ्य नेत्यांना कोपऱ्यात फेकून दिले….

काल आज नव्हे तर थेट १९९८ दरम्यान आमचे मित्र, अत्यंत सरळमार्गी, भाषाप्रभू, उत्तम संस्कारातून पत्रकारिता केलेल्या श्री सारंग दर्शने यांनी लिहिलेले ‘ दुसरा गांधी अर्थात राळेगणचे अण्णा ‘ हे छोटेखानी पुस्तक जर कुठे मिळाले तर अवश्य वाचून मोकळे व्हा, अण्णा नेमके कसे, त्यांनी त्यातून उत्तमरीत्या रेखाटले आहे. आणि याठिकाणी मला विश्वंभर चौधरी यांना तेच सांगायचे आहे, आम्ही तुमच्याकडे उद्याचे अण्णा हजारे म्हणून बघतो आहे कारण अण्णा आता अगदीच थकले आहेत, त्यांचे कार्य जर चौधरी यांना पुढे सुरु ठेवायचे असेल तर त्यांनी आयुष्यतले काहीही न लपवता समाजाला सामोरे जाणे गरजेचे आहे अन्यथा विविध वाहिन्यांवरून जे अनेक उथळ आणि ढोंगी दरदिवशी दरक्षणी विविध चर्चेतून ऐकायला बघायला मिळतात, त्याच रांगेतले तुम्ही एक, असे चित्र निर्माण होईल आणि तुम्ही थट्टेचा आणि टीकेचा विषय ठरून लोक उद्या तुम्हाला हसण्यावारी नेतील, असे अजिबात घडायला नको….

त्या जितेंद्र आव्हाडांना एकदा का विनाकारण धुरी दिलेल्या मिरच्या झोंबल्या कि मग हा बाबा कोणाचाही नसतो, थेट उठतो आणि आपल्या विरोधकांवर तुटून पडतो, मला नेमका विषय माहित नाही पण अटक झालेल्या देव गायकवाड नामें व्यक्तीशी विश्वंभर चौधरी यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव जोडले आणि आव्हाड चिडले, लिहून मोकळे झाले कि चौधरी यांचे वागणे कसे, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, पद्धतीचे आहे, आणि हे वाचूनच आमच्यावर शुद्ध हरपण्याची वेळ आली, असे वाटले आता विश्वास तरी कोणावर ठेवावा, जिला प्रेयसी म्हणून स्वीकारले, तिच्या जवळ जाताच, तिला जवळ घेताच तिनेच सांगावे कि मी यापूर्वी दोन तीनदा गर्भपात करून घेतला आहे, हे असे आम्हाला आव्हाड वाचल्यानंतर चौधरी यांच्या बाबतीत वाटले. 

उर्वरित पुढल्या भागात…

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *