फडणवीसांचे कारनामे २ : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीसांचे कारनामे २ : पत्रकार हेमंत जोशी 

देवेंद्र फडणवीस हे माझया पाह्ण्यातले असे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांचा राग, द्वेष, तिरस्कार त्यांचे शत्रूही करीत नाहीत, ते एक चांगले मुख्यमंत्री आहेत, त्यांची धडपड व्यक्तिगत नसून ती धडपड, त्यांची अहोरात्र मेहनत, त्यांचे अविरत कष्ट करणे अगदी १००% हे राज्य सुराज्य करण्यासाठी असते, हे जो तो म्हणतो मग तो कोणीही असो. त्यांना कामाचा अतिशय स्ट्रेस ताण असतो जो आजवरच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही, घेतला नव्हता. राज्याचा प्रमुख या नात्याने त्या त्या वेळेचे मुख्यमंत्री विविध कारणांनी नक्कीच तणावाखाली असायचे पण जेवढे मानसिक छळाखाली हे मुख्यमंत्री आहेत तेवढे अन्य कोणीही असल्याचे मला कधी जाणवले नाही. फडणवीसांच्या खालोखाल तणावा खाली असलेले मुख्यमंत्री होते सुधाकर नाईक. कदाचित माझे पुढले वाक्य वाचून तुमच्यातले अनेक डिस्टरब होतील पण वस्तुस्थिती सांगतो, देवेंद्र यांचे तणावाखाली दररोजचे असलेले आयुष्य यासाठी कि त्यांचे संपूर्ण नाव ‘ देवेंद्र फडणवीस पाटील ‘ असे नाही, एखादी जात, एखादा पंथ, एखादा धर्म एकवटला कि त्याची सुमधुर फळे त्याला किती चांगल्या पद्धतीने खायला मिळतात त्याचे भारतातले सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या या राज्यातले कठीण प्रसंगी हातात हात घेऊन चालणारे मराठे, त्यांचा हा गुणधर्म इतरांनी घेतला नाही, कधीकाळी अतिशय प्रभाबी ठरलेल्या नवबौद्धांनी, बौद्धांनी देखील आपली एकी टिकवली नाही आणि स्वतःचे मोठे नुकसान करवून घेतले, त्यांचे नेते आपापसात लढत बसल्याने बौद्धांचे, नवबौद्धांचे मोठे नुकसान झाले. असो, ज्यांच्याकडून मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, ठेवल्या आहेत ते मात्र मुख्यमंत्र्यांना थोडेफार सहकार्य करतातही पण सहकार्य करणे फार कमी, हे जवळ गेलेले किंवा देवेंद्र यांनी जवळ घेतलेले सारेच्या सारे फक्त आणि फक्त स्वतःची घरे भरवून घेण्यात मनस्वी आनंद घेताहेत. प्रसंगी अतिशय खुबीने धूळफेक करून केवळ आपले आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक पाठबळ किती अधिक पटीने वाढेल याकडेच त्या सर्वांचे लक्ष असते, मग हे असे लबाड संधीसाधू नागपुरातले असोत कि मुंबईतले, राज्यातले असोत कि भाजपा मधले किंवा नातेवाईकही, अगदी नाव आणि पुराव्यांसहित मला ते ठाऊक आहेत, काहींना मुख्यमंत्र्यांनी प्रसंगी कठोर होऊन दूरही केले आहे पण प्रत्येकाच्या बाबतीत त्यांना कठोर भूमिका घेणे शक्य नसते, त्याला विविध कारणे असतात. हि अशी माणसे माझ्यासमोर आलीत कि माझ्या तळपायाची आग मस्तकात जात असते पण आजवरच्या पत्रकारितेत काही बाबी थेट माहित असूनही मला त्या उघड करणे अवघड असते, खारीचा वाटा कदाचित आमचा, दरवेळी सत्तेत असलेल्या सरकारच्या बाबतीत काही माहिती गुप्त ठेवणे अत्यंत गरजेचे असते जे मी कायम आजतागायत करीत आलो आहे. आणि मी हे सारे यासाठी खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण मी पत्रकारितेत आल्यानंतर आजवरच्या प्रत्येक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची त्या त्या वेळेची वर्किंग स्टाईल मला इत्यंभूत माहित असते. किंबहुना पोलिसांचे इंटेलिजन्स खाते जेवढी इत्यंभूत माहित अमुक एखादयविषयी देऊ शकेल, नक्की त्याखालोखाल या राज्यातल्या कोणत्याही व्यक्तीचे नेमके आयुष्य केवळ आठ दिवसाच्या कालावधीत मी लिहून मोकळा होऊ शकतो, याची मला खात्री आहे. म्हणून वाईट वाटते, जेव्हा हे माननीय मुख्यमंत्री एखाद्याला आपले समजून जवळ घेण्याचा प्रयत्न करतात, ते सारेच्या सारे फक्त आणि फक्त आपले स्वतःचे भले कसे होईल याकडेच लक्ष केंद्रित करून मोकळे होतात. जणू हि फडणवीसांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांना बेवकूफ बनविण्याची शेवटची संधी आहे असेच या साऱ्याच्या सार्या लुच्चा लफंग्यांना वाटते. पण एक लक्षात घ्या, माझ्या दोन महत्वाच्या अवयवांवर तीळ आहे त्यातला एक जिभेवर आहे, दुसरा कुठे असेल हे वेगळे सांगणे तुम्हाला तरी गरजेचे नाही असे मला वाटते. खात्रीने मी येथे तुम्हाला सांगतो, देवेंद्र आज जे आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक ते भविष्यात आणखी खूप मोठे होतील, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात पद्धतीने मी हे म्हणतोय, अपवाद फक्त त्यांचे प्रकृती स्वास्थ्य आणि ते त्यांनी जपायला हवे, वेळोवेळी राज्याच्या हितासाठी अति भावनिक होणे त्यांनी टाळायला हवे. सर सलामत तो पगडी पचास. मुख्यमंत्र्यांना बघता बघता सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात येऊन अलीकडे तब्बल पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहेत, माणसे २५ वर्षानंतर अनेकदा स्वेच्छा निवृत्ती घेतात, तुमचे ते निर्व्यसनी उत्साही व्यक्तिमत्व, बघणाऱ्या नवख्याला त्या पतंगराव कदमांसारखे वाटावे म्हणजे त्यांना भेटले कि अनेकींना वाटायचे कि हे अद्याप अविवाहितच आहेत तसे तुमचे, बघणार्याला वाटावे हे फडणवीस काल पर्वा राजकारणात समाजकारणात उतरलेले आहेत कि काय, कारण तुमचा तो नवख्या कार्यकर्त्यासारखा सळसळता उत्साह, आणि तो कायम टिकून राहावा, प्रसंगी तुमच्या राजकीय विरोधकांनाही ते अगदी मनापासून वाटते, तुमचे वागणे सर्वांना मनापासून भावते, आवडते…


एक विषयांतर करतो, जे आपल्याला नक्की नेमके माहित नसते ते पत्रकारांनी इतरांना सांगू नये किंवा त्याची बातमीही करू नये. येथे याठिकाणी मी त्या वार्ताहराचे नाव घेण्याचे मुद्दाम यासाठी टाळतो कि त्याला वाटावे हे ‘ भाऊ ‘ उठसुठ पाठी लागलेले असतात पण वस्तुस्थिती अशी कि गेल्या महिन्या दीड महिन्यात लोकमत दैनिकातून एकाच वार्ताहराने किमान चार वेळा तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाची बातमी लिहून छापून आणलेली आहे, आपण कसे या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, हे भासविण्याच्या, दाखविण्याच्या नादात त्याचे हातून या अशा विनाकारण हवेतल्या बातम्या लिहिल्या गेलेल्या आहेत, असाव्यात. जोवर नेमके नक्की काय घडणार आहे, एखाद्या वार्ताहराला माहित नसते तोवर त्याने आपण कसे मोठे किंवा अमुक एखाद्याच्या जवळचे, भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, मुख्य म्हणजे लिहिणारे हे वार्ताहर महाशय वास्तविक तसे नक्की मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत, जवळचेही आहेत पण अतिउत्साहाच्या भरात स्वतःचे हसे करून न घेणे केव्हाही चांगले, त्यातून या राज्यात त्यांना वार्ताहर म्हणून मालकापेक्षाही अधिक लाभलेली लोकप्रियता विनाकारण वादात सापडते. खरी गम्मत पुढे आहे, ज्या मंत्रालय वार्ताहर संघातून, कोणतेही प्रभावी वृत्तपत्र हाती नसल्याने तेथे असलेले काही वार्ताहर प्रेस रूमच्या सरकारी फोनवरून जेव्हा, ‘ मी मंत्रालयातून अमुक अमुक पत्रकार बोलतोय ‘, समोरच्या व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी जेव्हा फोन करतात ते कानावर पडले कि एकीकडे रागही येतो आणि दुसरीकडे हसायलाही येते. गम्मत म्हणजे त्यांना पत्रकारितेतले काहीही कळत नसते त्यामुळे अमुक एखाद्या बातमीची त्यांच्या समोर केवळ पुडी सोडली तरी हे असे अर्धवट त्यावर काहीही माहित न घेता बातमी दाखवून किंवा लिहून जेव्हा मोकळे होतात तेव्हा शोले चित्रपटातल्या कान देऊन माहिती घेणाऱ्या केश्तो मुखर्जीची हमखास आठवण होते, होय! हे असे आमच्यातले खऱ्या अर्थाने केश्तो मुखर्जीच आहेत…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *