जातीने ब्राम्हण आणि वृत्तीने रावण: भाग ३–पत्रकार हेमंत जोशी

जगभरातील माझे मराठी वाचक मित्रहो, आधी अत्यंत महत्वाची अशी सूचना तुम्हाला करतो तदनन्तरच पुढल्या लिखाणाला सुरुवात करतो. सूचना अशी कि, दिवसातून किमान आठ दहा माणसे मला अशी भेटतात कि जे मला त्यांच्या भ्रमणध्वनीवर टेप केलेले इतरांचे बोलणे पुरावा म्हणून ऐकवून दाखवतात. माझी आई मला सर्वश्रेष्ठ होती, तिची शपथ घेऊन सांगतो, सतत ३६ वर्षे मी या अशा आक्रमक पत्रकारीतेत आहे पण कधीही पुरावा म्हणून कुठल्याही व्यक्तीचे बोलणे मी टेप करून ठेवलेले नाही, अमुक एखादा तुमच्याशी अत्यंत विश्वास ठेवून बोलत असतो, आणि तुम्ही त्याचे बोलणे आधी टेप करून ठेवता आणि 

नंतर तेच बोलणे भांडवल म्हणून वापरता, हि अतिशय नीच अशी बाब आहे, एवढी खालची स्टेप तुम्ही गाठू नका आणि आपले बोलणे समोरचा नक्की टेप करून ठेवणार आहे, हे यापुढे ध्यानात ठेवा, स्वत:वर विनाकारण संकट ओढवून घेऊ नका, विशेषत: पत्रकार, नेते, अधिकारी, व्यापारी या अशा खालच्या पातळीवर उतरून तुम्हाला अगदी सहज जाळ्यात ओढतात, 

कृपया सावध राहा….

मैथिली जावकर प्रकरणात कौतुक त्या देवेंद्र फडणवीस यांचे नक्कीच करावे लागेल कारण मैथिलीची तक्रार त्यांच्याकडे येताच, त्यांनी क्षणाचा विलंब न लावता, मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या भ्रमणध्वनीवर बोलणे न करता सरळ मेसेज केला, पांडे यांचे कृत्य वाईट आहे, त्यावर कडक निर्णय घेऊन पांडे प्रकरणाचा छडा लावा….पक्षातली स्त्री सुरक्षित असली पाहिजे यावर नेहमी फडणवीस आग्रही असतात आणि त्यांना अगदी सहज शक्य असूनही, कुठल्याही लैंगिक विकृतीपासून ते कटाक्षाने चार हात लांब असतात, अमृता हीच पत्नी, प्रेयसी आणि मैत्रीण मानून तिचे कायम कौतुक करतात, स्त्री मग ती कुठल्याही वयाची असो, देवेंद्र जेथे तेथे ती सुरक्षित असते….काही संकेत पाळायचे असतात, जे गणेश पांडे यांनी अजिबात पाळले नाहीत. मैथिली प्रकरणात आपली पोल उघडली हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तो उठला आणि त्याने ‘ एबीपी माझा ‘ वाहिनी गाठली, तेथे त्याने मैथिलीचा फोटो हाती घेऊन जगासमोर दाखवला वरून तिचे नाव देखील जाहीर केले. वास्तविक पुढल्या काही दिवसात मैथिली राज्य कार्यकारणीवर येणार होती पण ऐनवेळी विनाकारण वादग्रस्त ठरलेल्या मैथिलीचे नाव ऐनवेळी वगळण्यात आले अशी माझी माहिती आहे. सध्या मैथिली खूप खूप भेदरली आणि घाबरलेली आहे, ती म्हणते, गणेश पांडे गुंड प्रवृत्तीचा नेता आहे, माझ्या जीवाला धोका आहे, असे मला वारंवार वाटते, मात्र मैथिलीचे काय सुरु आहे, त्यावर विचारपूस करायला भाजपामधल्या नेत्यांना वेळ नाही. स्वत:ला विकून जर तिला श्रीमंत व्हायचे असते तर २४ वर्षे चित्रपट आणि नाट्यसृष्टीत काम करणाऱ्या मैथिलीला से कमविणे सहज शक्य होते पण तिने आपले पाउल कधीही वाकडे पडू दिले नाही त्यामुळे ती आजही आई वडिलांच्या अगदी छोट्याशा सदनिकेत राहते आणि ४-२ लाख रुपयांच्या स्वस्त कारमधून फिरते, ज्या कारचे होर्न सोडून सगळे वाजते कारण त्या कारमध्ये मी बसलेलो आहे, मैथिली जेव्हा कार चालविते तेव्हा जीव मुठीत धरून बसावे लागते, शी इज अ वेरी फास्ट ड्रायव्हर…..!! 

वास्तविक मैथिलीला पांडे प्रकरण वाढवायचे नव्हते पण तिने केलेली लेखी तक्रार जाणूनबुजून व्हायरल केल्या गेली त्यानंतर पांडे याने वाहिनीवर तोंड उघडले आणि केवळ माफिनाम्यावर मिटू शकणार्या प्रकरणाचे विनाकारण गांभीर्य वाढविण्यात आले.

पांडे म्हणतो तिला त्याचा राजकीय विरोधक संजय पांडे याने पैसे देऊन प्रकरण उघड करण्यास मदत केली पण मला नाही वाटत, मैथिली अशी खालची स्टेप गाठून स्वत:ला बदनाम करून सोडेल, आणि गणेश पांडे म्हणतो ते खरे असेल तर उद्या मैथिली मग त्याच्याकडून देखील पैसे घेऊन केलेली तक्रार मागे घेईल. भविष्यात समजा मैथिलीने केलेली तक्रार मागे घेतली तर आम्ही काय म्हणायचे कि तिने गणेश पांडेकडून पैसे घेतलेत….पुन्हा सांगतो, ती हि अशी असती तर केव्हाच श्रीमंत होऊन भारी किमतीच्या कार्समधून फिरली असती आणि महागड्या बंगल्यात राहायला गेली असती….एक मात्र बरे झाले ज्यांचा नेते म्हणून भाजपशी दुरदुरपर्यंत संबंध नव्हता अशा युवकांना सामील करून गणेश पांडे याने जी ७० लोकांची कार्यकारणी केली होती,आता ती कार्यकारणीच बरखास्त करण्यात आली. यापुढे आशिष शेलार यांनी नवी कार्यकारणी तयार करतांना सावधगिरी बाळगावी….जे या राज्यातल्या कॉंग्रेसचे झाले म्हणजे तीव्र इच्छा असूनही असंख्य स्त्रिया बहुसंख्य लैंगिक विकृती असलेल्या नेत्यांमुळे कॉंग्रेसपासून दूर राहणे पसंत करीत होत्या, नजीकच्या भविष्यात भाजपाचे देखील तेच होईल, पांडे, महाजन, मुंडे, चव्हाण अशी फक्त चार दोन प्रकरणे उजेडात आलीत, इतर येत नाहीत किंवा आली नाहीत पण पूर्वीसारखे भाजपामध्ये देखील तरुण स्त्रियांना काम करतांना सुरक्षित वाटत नाही, संघ संस्कारातून तयार झालेल्या भाजपमध्ये हे असे विकृत वातावरण तयार होताकामा नये कारण सुशिक्षित, उच्चशिक्षित, घरंदाज स्त्रिया, तरुणी मोठ्या प्रमाणावर या पक्षात कार्यरत आहेत, पण अलीकडे त्या द्विधा मन:स्थितीत वावरतांना दिसतात, पांडे प्रवृत्ती हि अशी फैलता कामा नये, आगे धोका है….आम्ही मराठी कमालीचे गांडू कारण हा गणेश पांडे कधी पोलिसांवर हात उगारतो तर कधी शालीन, कुलीन मराठी तरुणीला लैंगिक विकृतीच्या जाळ्यात ओढायला बघतो, मैथिलीच्या जागी एखादी लेचीपेची तरुणी असती तर ती सरेंडर झाली असती किंवा आत्महत्या करून मोकळी झाली असती. मराठी पोलिसांना सोडले नाही, मराठी तरुणीला सोडले नाही उद्या हा पांडे मराठी पत्रकारांवर देखील हल्ले करायला कमी करणार नाही, वरून त्यालाच पोलिसांचे चोवीस तास संरक्षण आहे. पांडे हा ब्राम्हण आहे, असे ब्राम्हण बघितलेत कि मनाला वाटते, का जन्म घेतला ब्राम्हण म्हणून….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *