संजय ताप कि उद्धवजी बाप : पत्रकार हेमंत जोशी

संजय ताप कि उद्धवजी बाप : पत्रकार हेमंत जोशी 

पिंट्याला ताप आहे दवाखान्यात घेऊन गेलो होतो पण समोर डॉक्टर बसले होते आणि कंपाउंडर हणम्या आला नव्हता मग आल्या पावलीच परतलो. पुढला जोक, रुग्णांसाठी विशेष सूचना : येथे रुग्णांची तपासणी तद्न्य डॉक्टरांकडून केली जाते. आमच्याकडे कंपाउंडर नाही. ज्या रुग्णांना कंपाउंडारकडून तपासणी करून घ्यायची असेल त्यांनी कृपया आत येऊ नये. आदेशावरून. पुढला जोक, देशपांडेंच्या मुलीने डॉक्टर असलेल्या स्थळाला नाकारले कारण ती शंकर कंपाउंडरच्या आकंठ प्रेमात बुडाली आहे. डॉक्टर ऐवजी कंपाउंडर जावई त्यामुळे देशपांडे दाम्पत्यानेही मुलीला लग्नाची आनंदाने परवानगी दिली आहे. पुढला जोक, डॉक्टर मंडळींना काय समजते हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिल्याने यावर्षी बहुतेक मेरीटस स्टुडंट्सचा कंपाउंडर होण्याकडे ओढा. पुढला जोक, बाबा उठा कंपाउंडर तुम्हाला बघायला आले आहेत. पुढला जोक, तुम्हाला डॉक्टर कडून तपासून घ्यायचे असेल तर फी १०० रुपये आणि कंपाउंडर कडून तपासून घायचे असेल तर ३०० रुपये मोजावे लागतील. पुढला जोक, डॉक्टर, कंपाउंडर दिग्या आहे का, नसेल तर उद्या येतो. संजय राऊत एका वाहिनीला मुलाखत देतांना वाट्टेल ते बोलले आणि सोशल मीडियावरून लाखो जोक्स त्यांच्यावर केवळ दोन दिवसात टाकण्यात आले. मी जे लिहिले होते नेमके तेच घडले राऊतांना त्यांची चूक उमगली ते चार पावले मागे आले त्यांनी पत्रकारांसमोर युक्तीने चूक मान्य केली प्रकरण लगेच शमले….

उद्धव ठाकरे यांना राजकारणातले काही कळत नाही, संजय राऊत यांच्यामुळे त्यांची बदनामी होते आहे त्यांचे मोठे राजकीय नुकसान होते आहे, ठाकरे यांनी त्वरेने संजय राऊत यांना बाजूला करायला हवे अन्यथा उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत आणि त्यांचे राजकीय गुरु शरद पवार दोघे मिळून राजकीय खात्मा करून मोकळे होतील असे एक ना अनेक पद्धतीने राऊत व उद्धवजी या दोघांबद्दल यादिवसात सतत सर्वत्र खमंग चर्च सुरु आहे ज्या चर्चेला काहीही अर्थ नाही. एक लक्षात घ्या या कठीण कालखंडात अगदी उद्धवजी यांच्यासहित सारे शिवसेना नेते व मंत्री अक्षरश: मूग गिळून बसलेले असतांना एकटे संजय राऊत साऱ्यांना बेधडक अंगावर घेताहेत वाट्टेल ते बोलून मोकळे होताहेत आणि उद्धवजी त्यांना थांबवत नाहीत तुम्हाला काय वाटते उद्धव हे बोळ्याने दूध पितात का, राऊत हे राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा प्रभावी ठरले आहेत का कि त्यांना राज्याच्या राजकारणातले झिरो कॉलेज आहे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे सारे म्हणताहेत त्या म्हणण्याला कवडीचाही अर्थ नाही उलट याचा सरळ अर्थ आहे जे हे असे बोलताहेत त्यांना उद्धव ठाकरे अजिबात समजलेले कळलेले नाहीत. एवढेच सांगतो एकवेळ महाखतर्नाक शरद पवार परवडले पण कडक निर्णय घेण्यात उद्धव त्यांच्या शंभर टक्के पुढे आहेत. जे संजय राऊत यांच्यापेक्षा राजकारणात ताकदवान, प्रचंड अनुभवी, महाबेरकी होते त्या अनेकांना ज्या उद्धव यांनी बाहेरचा रस्ता दाखवून त्यांचे प्रचंड राजकीय नुकसान करून ठेवले आहे आणि तुम्ही म्हणताहेत कि शरद पवार आणि संजय राऊत उद्धवजींना राजकीय खात्मा करून मोकळे होतील…. 

मागेही एकदा मी जे लिहून ठेवले आहे तेच पुन्हा येथे रिपीट करतो कि संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलल्याशिवाय ना कधी अमुक एखाद्या नेत्याला भेटतील किंवा कोणतेही स्टेटमेंट करून मोकळे होतील. आणि हे ज्या दिवशी घडेल  लिहून ठेवा उद्धव ठाकरे यांचे नव्हे तर संजय राऊत यांचे मोठे राजकीय नुकसान झालेले असेल. जंग जंग पछाडून जे संजय राऊत त्यांच्या आमदार असलेल्या भावाला म्हणजे सुनील राऊत यांना मंत्री कारू शकले नाहीत उलट त्यावेळी त्यांनी आवंढा गिळत गप्प राहणे पसंत केले ते राऊत उद्धव यांना बायपास करून म्हणजे उद्धव यांना न विचारता काहीही जाहीर बोलणे शक्य नाही, अशक्य आहे. उद्धव यांची फक्त एकच चूक झाली ते मातोश्रीच्या बाहेर पडून थेट मंत्रालयात घुसले म्हणजे ज्यादिवशी राजा प्रधान झाला थेट वाघाने मांसाहार सोडून सात्विक थाळी जेवायला घेतली तेथेच सारे संपले. यापुढे पूर्वीची म्हणजे उद्धव हे मुख्यमंत्री होण्यापूर्वीची जी शिवसेना होती तिच्या पुनर्बांधणीसाठी उद्धव यांना पुढले अनेक वर्षे खर्ची घालावे लागणार आहेत. मला तर वाटते जर काय महामारीनंतर महाआघाडी सरकार चुकून कोसळणार नसेल तर उद्धव यांनी मुख्यमंत्री म्हणून पायउतार व्हावे आणि एकनाथ शिंदे यांच्यासरख्या एखाद्या समोर  मग कोणीही असो अंगावर घेण्याची ताकद ठेवणार्या नेत्याला मुख्यमंत्री करून मोकळे व्हावे. शिवसेनेची तसेच पोटच्या मुलाची जी राजकीय घडी सध्या विस्कटलेली आहे त्यात त्यांनी लक्ष घालावे सेनेला व आदित्यला पुन्हा 

राजकारणात सुगीचे  दिवस आणावेत……

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *