मुस्लिमांचे लांगुलचालन : पत्रकार हेमंत जोशी

मुस्लिमांचे लांगुलचालन : पत्रकार हेमंत जोशी 

काही गर्भश्रीमंत माणसे जर अचानक रस्त्यावर आलीत कि ते किमान घरखर्च चालविण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करतात. माझ्या ओळखीत काही घडलेली, मी पाहिलेली उदाहरणे देतो. एका ओळखीच्या खानदानी गर्भश्रीमंत ब्राम्हणांचे घर रस्त्यावर आल्यानंतर त्या घरातल्या प्रमुख तरुणाने एक दिवस ते जेथे राहत होते ते अख्खे घरच खणून काढले कारण कोणीतरी त्याला सांगितले होते कि तुमच्या या घरात तळघर आहे आणि तेथे तुमच्या पूर्वजांनी मोठ्या प्रमाणावर सोने पुरवून ठेवलेले आहे. १९८० च्या दरम्यान जळगावचे सुरेशदादा जैन परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असतांना त्यांचा स्वीयसहाय्यक होतो. एक दिवस आर्थिकदृष्ट्या देशोधडीला लागलेले माझ्या ओळखीचे एक गृहस्थ त्यांच्या विधवा देखण्या सुनेला घेऊन माझ्याकडे आले, म्हणाले आम्ही अतिशय आर्थिक अडचणीत आहोत, माझ्या या सुनेला तू मुंबईला घेऊन जा व तिला परिवहन महामंडळात नोकरीला यासाठी लावून दे म्हणजे तिला नियमित पगार मिळेल त्यातून मी नातू आणि सुनेचे जेवण निघेल. सुंदर सुनेला माझ्या एकट्याच्या भरवशावर तेही बाहेरगावी, मला रडू आले, उद्या जर असा प्रसंग माझ्यावर आला तर, मनात विचार आला, अंगावर काटा आला. पुढे एक दिवस सुरेशदादांना हे सांगितले, स्त्रियांच्या बाबतीत सुरेशदादा आदर करणारे, त्यांनी त्या स्त्रीचे भले केले, तिला सन्मानाने नोकरीला लावले…


www.vikrantjoshi.com

अर्थात असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. सांगण्याचा हेतू येथे काँग्रेस आणि त्यातले काही नालायक नेते आहेत. काँग्रेसचे श्रीमंत खानदानी कुटुंब रस्त्यावर आल्यानंतर पुन्हा श्रीमंत होण्यासाठी वाट्टेल ती पातळी गाठणाऱ्या हवालदिल कुटुंबासारखे झालेले आहे. वाट्टेल ते देऊ पण सत्ता हाती घेऊ त्यांच्या नेत्यांच्या या नीच हलकट भूमिकेला कडाडून विरोध करणे हे या राज्यातील या देशातील मतदारांचे निदान या निवडणुकीपुरते तरी नक्की कर्तव्य आहे. अत्यंत महत्वाचे आव्हान या राज्यातल्या चांगल्या वैचारिक मुस्लिमांनाही कि काँग्रेस केवळ मते मिळविण्यासाठी जे करायला निघाली आहे त्यावर तुम्ही देखील त्यांना कडाडून विरोध करा…


येत्या लोकसभेनंतर या देशात काही तत्वे मनाला खिशाला पटो अथवा न पटो, पुन्हा एकवार भाजपा व मित्रपक्ष सत्तेवर यावेत असे आता मनापासून या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाटू लागलेले आहे. देशद्रोह्यांना मांडीवर घेणाऱ्यांचे नव्हे तर त्यांना फासावर लटकविणाऱ्यांचेच सरकार या देशात पुन्हा एकवार सत्तेत यायला हवे नालायक काँग्रेस नेत्यांचे वागणे आणि करणी बघून ज्याला त्याला अगदी देशभक्त मुसलमानांनाही तसे वाटू लागलेले आहे. केवळ देशविघातक असणाऱ्या असंख्य मुस्लिमांचे मतदान पारड्यात पडून घेण्यासाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकण्यात येईल जेव्हा सांगितल्या जाते हे ज्याच्या डोक्यात आले त्याला आधी शंभर माराव्यात आणि एक मोजावी असे आता सर्वांनाच वाटू लागलेले आहे. देशद्रोहाचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसची मान्यता काढायला हवी हे जे अलीकडे उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांचे त्यावर मनापासून आपण सर्वांनी अभिनंदन करायला हवे. पैशांअभावी हवालदिल झालेल्या एखाद्या गर्भश्रीमंत माणसाचे जे होते ते तसे सत्तेअभावी या देशातल्या काही काँग्रेस नेत्यांचे झाले आहे असे वाटायला लागलेले आहे, हलकट आणि नीच कुठले…


आणि आता त्या पत्रकार नंतर खासदार झालेल्या सुमार उर्फ कुमार केतकर यांच्या विषयी. कुमार यांना भाऊ तोरसेकर जेव्हा तेव्हा सुमार म्हणायचे तेव्हा कधी कधी मनाला कसेसेच वाटायचे पण एकत्र पत्रकारिता सुरु केलेल्या भाऊ तोरसेकरांनी कुमार केतकरांची नेमकी मनोवृत्ती आणि पत्रकारिता करतांना त्यांचा काँग्रेसकडे असलेला कल, भाऊंनी नेमका ओळखला होता म्हणून भाऊंनी सुमार यांचा वेळोवेळी घेतलेला समाचार, आज ते आठवले, मनाला आनंद देऊन गेला. मला तर आता असे वाटायला लागलेले आहे कि ज्या विचित्र वाईट पद्धतीने कुमार उर्फ सुमार मुस्लिमांचे प्रचाराच्या भाषणातून लांगुलचालन करताहेत ऐकून बघून मनाला हेच वाटते आहे कि देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची नीच कल्पना देखील कुमार केतकरांच्याच डोक्यातून निघालेली दिसते…


अलीकडे सुमार केतकरांच्या प्रचार भाषणाची एक क्लिप कोणीतरी माझ्याकडे मुद्दाम पाठवली. ती क्लिप मी एकदा नव्हे तर अनेकदा कान देऊन ऐकल्यानंतर एक ब्राम्हण विद्वान मराठी पत्रकार वैचारिक दृष्ट्या किती खालच्या पातळीवर जाऊन विचार करतो, त्याची खात्री पटली. त्या क्लिप मध्ये कुमार यांनी चक्क या देशातल्या राष्ट्रभक्त हिंदूंची दोन चार उदाहरणे देऊन ज्यापद्धतीने सर्वाधिक गुन्हे करणाऱ्या मुस्लिमांचे लांगूल चालन केले आहे ते ऐकून कोणत्याही विचारांच्या राष्ट्रभक्त भारतीयांचे पित्त खवळल्या शिवाय राहणार नाही. कुठलीतरी हिंदूंची चार दोन उदाहरणे कुमारांनी सांगून आपल्या भाषणात हेच सांगितले आहे कि या देशातले खरे देशद्रोही हिंदूच आहेत अप्रत्यक्ष, या देशातला देशद्रोही कोणताही मुसलमान नाही हेच त्यांनी सांगितले आहे. केवळ मुस्लिमांची मते पारड्यात पाडून घेण्यासाठी तेही पत्रकारितेत वाचनात अख्खी हयात खर्ची घातलेला एक पत्रकार तेही ब्राम्हण केवढ्या हलकट विचारांचा असतो त्याची मनोमन खात्री पटते…


नरेंद्र मोदी जे सत्तेत आलेले आहेत तोच मुळात एक व्यापक कटाचा भाग होता हे त्या क्लिप मध्ये सांगणारे कुमार केतकर पुढे म्हणतात कि अमित शाह असोत कि नथुराम गोडसे, या देशातल्या नेत्यांची हत्या ज्या हिंदूंनी केली तेच खरे देशद्रोही असेही त्यात सुमार केतकर म्हणतात. महात्मा गांधी यांची हत्या नथुराम नावाच्या हिंदूने केली, इंदिरा गांधी यांची हत्या एका शीख माणसाने केली आणि राजीव गांधी यांची हत्या एका तामिळी स्त्रीने केली याचा अर्थ असा खरे देशद्रोही हिंदू आहेत आणि बदनाम निष्पाप मुस्लिमांना केल्या जाते. शी शी, या पद्धतीचे तेही कुमार केतकर यांचे भाषण ऐकून असे वाटते भेंडी बाजारातला एखादा पाक विचारांचा मुसलमान बरळतो आहे, घसा ताणून ताणून भाषण करतो आहे. कुठलेतरी चार दोन दाखले द्यायचे आणि या देशात काश्मिरी थैमान घालणार्या किंवा बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणार्या कसाबछाप विचारांच्या असंख्य देशद्रोही मुस्लिमांची बाजू केवळ मुस्लिम मते पदरात पाडून घेण्यासाठी सुमार केतकर यांचे वाट्टेल ते बरळणे किंवा देशद्रोहाचे कलम रद्द करण्यात येईल हे काँग्रेसने जाहीर करणे मला वाटते, मनाला इतर राजकीय पक्ष पटोत अथवा न पटोत पण कोत्या विचारांच्या नेत्यांची काँग्रेस या देशात कधीही सत्तेत येऊ नये असेच आता मला वाटते ज्या त्या देशभक्त भारतीयाला वाटायला लागलेले आहे. नरेंद्र मोदी यांना फार प्रचार करायची भाषणे ठोकण्याची आता गरजच उरलेली नाही, या देशात जे काय पाकविचारांचे अनेक मुसलमान आहेत त्यांचे लांगुलचालन करणारी हि भाषणे जरी मतदारांना योजनाबद्ध ऐकविण्यात आलीत तरी मला खात्री आहे सारेच्या सारे मतदार काँग्रेसपासून दूर पळतील. एक पत्रकार या नात्याने हिंदूंना शिव्या घालणार्या आणि असंख्य देशद्रोही मुस्लिमांची चुकीची घातक बाजू घेणाऱ्या कुमार नव्हे सुमार केतकर यांचा मी येथे जाहीर निषेध करतो…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *