लेखा जोखा : पत्रकार हेमंत जोशी

लेखा जोखा : पत्रकार हेमंत जोशी 

ज्या अमिताभला राजेश खन्ना किंवा तत्सम सुरुवातीला ‘ अनिल धवन ‘ समजले पुढे आजतागायत तोच अमिताभ सुपरस्टार झाला. एखाद्या आयटेमला उगाच तुम्ही तरुण उसाचे चिपाड म्हणून डिवचता पण पुढे तीच छोरी जेव्हा सेक्सबॉम्ब किंवा आयटेमगर्ल बनून तुमच्या तोंडात लाळ आणते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. एखाद्याला कमी लेखू नये, पश्चाताप करण्याची वेळ येते. शाळेत शिकत असतांना माझ्या वर्गातले घरातले काही सदस्य नातेवाईक मला अतिशय कमी लेखायचे, अपमानित व्हायचे रडू यायचे, मग एखाद्या हिंदी सिनेमातल्या हिरोसारखी शपथ घेतली या सर्वांच्या पुढे एक दिवस नक्की निघून जायचे आहे, अविरत कष्ट केले आणि इप्सित साध्य केले. गावातला शाळेतला वर्गातला नामवंत आणि श्रीमंत त्यांना करून दाखविले. लहानपणी मी खूप भित्रा होतो, जे मला त्याकाळी घाबरवायचे, पुढे माझी नजर जरी त्यांच्यावर पडली तरी ते घाबरून दूर पळतात, पळायचे….

जाऊ द्या, आज पहिल्यांदा तुमच्याशी एखाद्या गर्विष्ठासारखे बोललो, माफ करा. पण पेटून उठलो म्हणून नेमके ध्येय गाठता आले. या राज्यात किमान १०० पत्रकार हेमंत जोशी म्हणून तयार होतील, मग या राज्याला बुडविण्याची लुटण्याची एकाचीही हिम्मत होणार नाही. हे सारे मुख्यत्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या कामगिरी वरून आठवले. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा ज्यांनी त्यांना अंडरएस्टिमेट केले कमी लेखले काहीसे हिणविलें किंवा दुर्लक्षित केले त्या साऱ्यांचा एकनाथ खडसे किंवा शरद पवार झाला आणि ज्यांना फडणवीस नेमके कसे हे अगदी सुरुवातीला कळले ते चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी अनेकांसारखे मजेत राहिले, अजितदादांच्या पक्षांतर्गत सूचनांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले पण दादांनी हेच सांगितले होते कि गडी लै तयारीचा आहे, देवेंद्र यांना अजिबात कमी लेखू नका, अजितदादांनी नेमके तेच केले, त्यांनी फडणवीसांना विरोधक असतांनाही मान दिला, ऑफ द रेकॉर्ड सांगतो, दादा आणि फडणवीसांच्या छुप्या मैत्रीतून आजितदादांचे भले झाले, भले कसे झाले ते मात्र आज या ठिकाणी मला सांगणे अजिबात शक्य नाही, पुढे नक्की सांगेल…

www.vikrantjoshi.com

अलिकडल्या पाच वर्षातले अजित पवार तर मला एखाद्या हिंदी सिनेमातल्या वृत्तीत बदल झालेल्या केलेल्या नायकासारखे वाटले कारण ते तसेच वागले, बदलले. एखाद्या सिनेमात पूर्वार्धातील खलनायक उत्तरार्धात अचानक बदलून नायक होतो, नायिकेचे मन जिंकतो तसे दादांचे झाले आहे. यानंतरचे अजित पवार पूर्णतः वेगळे असतील हे नक्की सांगतो. फारसे आश्चर्य वाटणार नाही जर शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीनंतर अजितदादा सकाळी संघस्थानावर आणि दुपारी भाजपा मुख्य कार्यालयात ठाण मांडून बसलेले आहेत, हे दृश्य दिसले तरी. जळगाव जिल्ह्याचा राजकीय इतिहास तपासला तर ज्यांना गर्व झाला ते सारे नेते होत्याचे नव्हते झाले. ज्यांच्याकडे बघून त्यांचा राजकीय असत होणे शक्य नाही ते सारे संपले, जणू उग्र सूर्याचे मवाळ चंद्र झाले…

जळगाव जिल्ह्यात प्रतिभाताई पाटील या एकमेव अशा कि त्यांना त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा नेमक्या ठाऊक होत्या म्हणून त्या कायम जमिनीवर होत्या आणि आयुष्याच्या संध्याकाळी देखील सामान्य वकूब असलेल्या या नेत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या मात्र नेमके हेच जमिनीवर टिकणे मग ते दिवंगत मधुकरराव चौधरी असोत कि सुरवंशदादा जैन किंवा एकनाथ खडसे असोत कि अन्य अनेक, ज्यांना मीच तेवढा मोठा प्रभावी ताकदवान असा भ्रम निर्माण झाला हे सारे राजकीय अस्ताला गेले. नेमके हे असे यापुढे गिरीश महाजन यांचे होऊ नये असे त्यांना जर मनापासून वाटत असेल तर सभोवताली जमा झालेली माणसे स्टाफ मित्र किती आणि कसे बदमाश आहेत हे त्यांनी ओळखून त्यांना दूर करणे ठेवणे अति आवश्यक आहे आणि गर्व होऊ न देणे हा तर नेतृत्व टिकून ठेवण्यात उत्तम मार्ग आहे हेही त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे, अन्यथा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात होत्याचे नव्हते व्हायला एखादे वर्ष पुरेसे असते. या पंचवार्षिक योजनेत राजकीय दृष्ट्या प्रचंड ताकद ठेवणार्या एकनाथ खडसे यांनी आयुष्याच्या संध्याकाळी खूप काही केवळ मस्तीतून गमावले त्यावर वारंवार वाईट वाटते…

क्रमश :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *