बाळ उद्धव कि उद्धव बाळ : पत्रकार हेमंत जोशी


बाळ उद्धव कि उद्धव बाळ : पत्रकार हेमंत जोशी 

क्या चल रहा है, फॉग चल रहा है, पद्धतीने कोणी मला विचारलेच तर हेच सांगेल, राज्यात फक्त व फक्त अजितदादा राज चल रहा है, बघावे तेथे दादा आणि ऐकावे तेथे दादा, उद्धवजी म्हणजे उरलो आता केवळ नावापुरता, पदापुरता, मिरवून घेण्याकरिता मिरवून आणण्याकरिता म्हणजे हे तर असे झाले सार्वजनिक गणपती मंडपात दोन मुर्त्यांची स्थापना केली जाते पैकी मोठी मूर्ती फक्त लोकांना बघण्यासाठी असते आणि काम खरे लहान मूर्तीचे असते म्हणजे गणपती विसर्जन करेपर्यंत जी काय पूजा केली जाते किंवा मानसन्मान दिल्या जातो तो लहान मूर्तीलाच मिळतो. सध्या या राज्यात उद्धव ठाकरे म्हणजे मोठी मूर्ती कारण जे काय कोडकौतुक केल्या जाते किंवा करवून घेतल्या जाते ते फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांचेच त्यामुळे पुढल्या पंधरा दिवसांनंतर तर मी तुमच्यासमोर फक्त एवढेच मांडणार आहे कि दिवसभरात अजित पवार यांनी काय केले त्याचवेळी उद्धव ठाकरे कुठे होते आणि काय करत होते, सध्या अजितदादा बोले आणि मंत्रालयाशी सत्तेशी संबंधित जो तो प्रत्येक डोले असेच त्यांच्याविषयी म्हटल्या जाते….

निष्कलंक कामसू उत्साही धडाकेबाज याऐवजी निष्क्रिय मुख्यमंत्री हा डाग उद्धव ठाकरे स्वतःला लावून घेणार नाहीत अशी आजही शंभर टक्के खात्री वाटते. पण आज मात्र तेच चित्र आहे तशीच हवा आहे तसेच वातावरण आहे, मंत्रालयात भल्या पहाटे पासून सारेकाही फक्त आणि फक्त अजितदादा बघतात, प्रत्येकाच्या तोंडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच एकमेव नाव असते त्यांच्यासमोर सारे फिके म्हणजे राज्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी देखील. सारे काही अजितदादाच सांगतात आणि मुख्यमंत्री व एकजात साऱ्याच पक्षाचे मंत्री फक्त आणि फक्त अजितदादांचेच आदेश ऐकतात नव्हे त्यांना ऐकावेच लागतात त्यामुळे विशेषतः शरद पवार गटाचे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड असोत कि शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे मंत्री राज्यमंत्री आणि आमदार देखील मनातून मनापासून अतिशय अस्वस्थ आहेत चिडलेले आहेत अगदी चार दोन मंत्री किंवा राज्यमंत्री सोडले, इतर कोणालाही कधीही अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचे नव्हते पण उद्धव तुम्ही हे का हो भलते सलते करून ठेवले आहे, एकजात साऱ्यांनाच अजित पवार यांचेच आदेश पाळावे लागताहेत अशाने उद्धवजी तुमची पकड नाही किंवा पकड अगदी सुरुवातीलाच ढिली पडलेली आहे हे जो तो म्हणतो आहे जे चुकीचे घडते आहे…

                                                                www.vikrantjoshi.com

लोकांना मतदारांना हे असले राज्य म्हणजे काका पुतण्याचे राज पुढे काही वर्षे नको होते पण नेमके जे नको होते तेच जर उद्धवजी तुमच्या दुर्लक्षामुळे घडणारे असेल तर त्याचे दूरगामी परिणाम पुन्हा एकवार शरद पवार अजित पवार यांना फायद्याचे ठरणारे आणि तुमचे तुमच्या पक्षाचे फार मोठे म्हणजे भरून न येणारे नुकसान होणार आहे हे माझे वाक्य आजच अधोरेखित करून ठेवा. यासाठी का लोकांनी आमदारांनी नेत्यांनी साऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला कि हे राज्य काका पुतण्याच्या हाती सोपवायचे आणि पुन्हा एकवार राज्याचे मोठे वाटोळे करून ठेवायचे. फडणवीस मुख्यमंत्री असतांनाही तुम्ही नको त्या भ्रष्ट हलकट मंडळींना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री केले आणि आपले आपल्या पक्षाचे मोठे नुकसान करवून घेतले, यावेळी तर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झाले पण तुमच्या मंत्रिमंडळावरून एकदा तुम्ही डोळ्यात तेल घालून जर नजर टाकली तर तुमच्या हेच लक्षात येईल तुमचा पुन्हा एकवार मोठी संधी चालून आल्यानंतर देखील पराभव झाला आहे. तुमच्या एकंदर १३ मंत्र्यांपैकी तुमच्या हिताचे आणि राज्याला फायद्याचे मंत्री कोण व किती, तुमच्या हे नक्की लक्षात येईल कि तुमचा तो पहिला पराभव झाला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, चित्र असे दिसायला हवे कि काका पुतण्या तुमचे ऐकतो आहे आणि आदेश तुम्ही देताहेत, सध्यातरी चित्र नेमके उलटे आहे जे तुमच्या व राज्याच्या हिताच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *