लोकसत्ता आणि लोकमत ३ : पत्रकार हेमंत जोशी

लोकसत्ता आणि लोकमत ३ : पत्रकार हेमंत जोशी 

फार पूर्वी ऐकलेला एक चुटका सांगतो…पुण्यातल्या सदाशिव पेठेत लेले आणि दामले एकमेकांचे शेजारी असतात. एके रात्री अचानक दामलेंकडे पाहुणे येतात म्हणून दामले काका शेजारच्या लेल्यांकडे जाऊन विचारतात, काकू, आमच्याकडे अचानक काही पाहुणे आल्याने तुमच्याकडली आजच्या रात्री एखादी खाट मिळेल का ? फटकळ काकू लगेच म्हणतात, दिली असती हो, शेजारधर्म म्हणून, पण नेमके काय झाले आहे, आमच्याकडे फक्त दोनच खाटा आहेत, पैकी एका खाटेवर मी आणि माझी सून झोपतो आणि दुसऱ्या खाटेवर आमचे हे आणि आमचे चिरंजीव झोपतात. त्यावर दामलेंचं उत्तरही एकदम कडक, म्हणतात, काकू भलेहि खाट देऊ नका पण व्यवस्थित झोपत तर चला…

दैनिक लोकमतला माझे हेच सांगणे, व्यवस्थित लिहीत तर चला, म्हणजे वाईट माणसाविषयी भलेहि वाईट लिहू नका पण चांगले लिहून निदान आम्हा मराठींवर वाट्टेल ते लादू तर नका. आम्हाला ठाऊक आहे, प्रफुल्ल पटेल तुमचे कौटुंबिक मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर भलेहि वाईट लिहू नका पण देशाचे, पक्षाचे, राज्याचे वाटोळे करणाऱ्या नेत्यांचे उदात्तीकरण करताना जनाची नसेल पण मनाची. लोकमत चे समूह संपादक दिनकर रायकर जेव्हा प्रफुल्ल पटेलांना सर्वांचा विकासाभिमुख मित्र आणि देशाला हवाई उड्डाणात झेप घेण्याचे बळ देणारे नेते म्हणतात, या वाक्यावर हसून हसून पुरेवाट होतांना चांगल्या मराठी लोकांच्या वाचकांच्या डोळ्यात आपोआप अश्रूही तरळतात. आणि त्याच दरम्यान लोकसत्तामधून लबाड हलकट प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत सात हजार कोटींच्या वादग्रस्त विमान खरेदी प्रकरणी सिबीआय कडून तीन गुन्हे दाखल झाल्याची बातमी झळकते, आपोआप आम्हा मराठीच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचते…

बघा पवारसाहेब तुम्हाला राजकारणातून निवृत्त होण्याआधी जमले तर म्हणजे आर्थिक स्थिती नसतांना तब्बल सत्तर हजार कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी आणि एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे हिशेबी विलीनीकरण केल्याप्रकरणी तत्कालीन नागरी हवाई वाहतूकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांच्या मागे अलीकडे पुराव्यांसहित सिबीआय मागे लागल्याने आता त्या प्रफुल्ल पटेलांचा तुम्हाला दत्ता मेघे, गिरीश गांधी करता आला तर म्हणजे या देशाचे राज्याचे वाटोळे करणाऱ्या महाभ्रष्ट प्रफुल्ल पटेलांना कोपऱ्यात फेकणे जमले तर, तुम्हाला राष्ट्रपती व्हायचे आहे नंतर सन्मानाने राजकारणातून निवृत्त व्हायचे आहे, मग असली गटारे चार हात लांब ठेवून तुम्ही वेगळे नेते कसे, देशाच्या जनतेला, आम्हा सरळमार्गी मराठींना त्यातून अगदी सहज दिसेल. अर्थात मेघे किंवा गांधी हे तर कोणत्याही भानगडीत नव्हते तरीही तुम्ही याच पटेलांच्या कान फुंकण्यावरून त्यांना राजकारणातून दूर फेकण्याचा जणू विडा उचलला होता..

अपूर्ण :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *