उकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी

उकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी 

मागल्या अंकांत मुंबईतील ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेल मध्ये चार तास दोन दोन मुलींकडून बॉडी मसाज करवून घेणाऱ्या ज्या मंत्र्याविषीयी जे मी लिहिलेले आहे ते गिरीश महाजन नाहीत आणि दोनदा तुम्हाला त्या लेखातून ‘ राम राम ‘ केल्यानंतर जर नेमके नाव तुमच्या लक्षात आलेले नसेल तर तुमच्यासारखे तुम्हीच. ह्या मंत्राचा अलीकडे आणखी एक किस्सा माझ्या कानावर आलाय. झाले असे ह्या मंत्र्यांची ओरिजिनल बायको एक दिवस सकाळी त्यांनी पाळलेल्या कुत्र्याला जेव्हा चौपाटीवरून घेऊन फिरत होती, तेवढ्यात समोरून दोन हवालदार आले, त्या दोघांनीही जागच्या जागी थबकून आधी कडक सॅल्यूट ठोकला, थोडेसे पुढे निघून गेल्यानंतर एका हवालदाराने दुसऱ्याला विचारले, साहेबांच्या कुत्र्याला आपण सॅल्यूट तर ठोकला पण ज्यांच्या हाती कुत्र्याची दोरी होती, त्या बाई मात्र कोण होत्या, लक्षात आले नाही.विशेष म्हणजे हे दोनही हवालदार काही महिने आधी त्या मंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात होते….


मंत्र्यांचे असे कितीतरी भन्नाट किस्से सांगता येतील. आघाडीच्या काळात शिवाजीराव मोघे हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते, त्यांचा एक स्वीय सहाय्यक नामे प्रशांत अल्याडवार त्याची शिवाजीराव मोघेंवर एवढी प्रचंड दहशत होती कि नेमके मंत्री कोण म्हणजे प्रशांत अल्याडवार आणि त्या प्रशांतचा दलाल ललवाणी कि शिवाजीराव मोघे हे नेमके नवख्यांच्या ध्यानातच येत नव्हते. आता त्याच ललवाणी याने फडणवीस मंत्री मंडळातील एका अतिशय प्रभावी मंत्र्याला हाताशी धरून त्या मंत्र्यांचा अक्षरश: आज मितीला ‘ शिवाजीराव मोघे ‘ करून सोडलेला आहे, ज्यादिवशी या लालवाणीचे शंभर अपराध भरतील, मी त्याची सारी लफडी तुमच्यासमोर मांडून मोकळा होईल, मला त्या भामट्या, भ्रष्ट, राज्यविक्या, दलाल, हरामखोर ललवाणी विषयी कवडीची आस्था नाही, काळजी त्या मंत्र्याची वाटते, ज्याचे राजकीय भवितव्य अतिशय उज्वल ठरू शकते…


अत्यंत महत्वाचे म्हणजे शिवाजीराव मोघे मंत्री असतांना ते मुंबईत असोत अथवा नसोत, हा सडका प्रशांत अल्याडवार त्यांची कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवर, पत्रांवर, नस्त्यांवर स्वतः हुबेहूब सही करून मोकळा होत असे, पुढे तर असे झाले कि प्रशांत अल्याडवार याने शिवाजीराव मोघे यांची केलेली सही संबंधित अधिकाऱ्यांना खरी वाटायची आणि खुद्द मंत्र्यांची सही त्यांना खोटी आहे कि काय, अशी शंका त्यांना येई. त्या प्रशांत अल्याडवार याची त्यावेळेचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख श्री 

प्रवीण दीक्षित यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींवरून गंभीर चौकशी सुरु केल्यानंतर हा लफंगा प्रशांत काही महिने मुंबईतून पळून गेला होता, दक्षिणेतल्या शिवाजीराव मोघे यांच्या राजकीय गुरूंच्या आश्रमात म्हणे त्याने आश्रय घेतला होता, विशेष म्हणजे श्रीमान प्रवीण दीक्षित लाचलुचपत खात्यातून बदलून गेल्यानंतर या अल्याडवार याला नेमकी कशी आणि कोणी क्लीन चिट दिली, हे नेमके आज जाणून घेण्याची खूप खूप गरज आहे किंवा गलगली, शिरोडकर, घाणेकर, वेलणकर इत्यादी प्रभावी आरटीआय आक्टिविस्ट मंडळींनी माहिती घेणे अत्यावश्यक वाटते. वाईट याचे वाटते अल्याडवार किंवा ललवाणी हि व्यक्ती नव्हे तर अशा पद्धतीची विकृती प्रत्येकवेळी विविध मंत्री एखाद्या विषारी सापासारखे जवळ का बाळगतात, या अशा मंडळींची क्षणिक फायद्या साठी आमचे दलाल म्हणून ओळख का करून देतात, न उलगडणारे हे कोडे आहे. ललवाणी यांची दलाली करण्याची नेमकी पद्धत कशी, तो बसतो कुठे, सरकारी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना किंवा काम करवून घेणाऱ्यांना त्याच्या स्वतःच्या कार्यालयात बोलावून पैसे खाण्याची पद्धत कशी समजावून सांगतो, ते सारे प्रकार, त्यावर लवकरच तुम्हाला लिखाणातून नेमक्या पुराव्यांसहित सांगणार आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *