मुसलमानांवर बहिष्कार : पत्रकार हेमंत जोशी

मुसलमानांवर बहिष्कार : पत्रकार हेमंत जोशी 

लॉक डाऊन मुळे मुंबईत कधी नव्हे ती स्मशानवत शांतता अनुभवतो आहे, एरवी आमच्या घरावरून दर तीन मिनिटांनी एक विमान धावते पण दचकायला होत नाही, यादिवसात मात्र दिवसातून जेमतेम एखादे जरी विमान गेले तरी दचकायला होते. मी सहाव्या माळ्यावर राहतो, पर्वा रात्री दोन वाजता चवथ्या माळ्यावरचे अंकल लागोपाठ दोन वेळा पादल्यानंतर अंगावर एखाद्याने सुतळी बॉम्ब फोडावा तसा मी जागा झालो. माझ्या शेजारच्या सदनिकेत नव्याने लग्न झालेले जोडपे राहते, रात्री त्यांच्या बेड रूम मधून निघणारा प्रत्येक आवाज ऐकून ऐकून आता मलाही वाटायला लागले आहे कि पुन्हा आपणही लग्न करायलाच हवे. समोरच्या सदनिकेतल्या आंटीची आक्रमकता त्याचवेळी तिच्यासमोर हात जोडून, मला झोपू दे, विनवण्या करणारे हतबल अंकल, उद्या पोलीस स्टेशन मध्ये, हि मला जबरदस्ती करते, अशी त्या अंकल ची लेखी तक्रार आल्यास मला त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही कारण मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघतोय कि अंकलला कोरोना पेक्षा  आंटीचे आक्रमक रूप जास्त भीतीदायक वाटते. या रिकाम्या दिवसात आंटी दिवसा नको त्या निळ्या फिल्म्स बघतात आणि रात्री अंकलचा थेट ससा होतो…

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मला मित्रांचे फोन येतात त्यावरून जे काय धक्कादायक राज्यात घडते आहे ऐकून मी यासाठी अस्वस्थ झालो कि या राज्यात जे काही मूठभर असतील कि हातभर राष्ट्रप्रेमी मुसलमान आहेत त्यांच्यावर आम्ही हिंदू कळत नकळत अन्याय करणार आहोत कि काय कारण या देशात विशेषतः या राज्यात ज्या काही पाकवेड्या मुसलमानांनी कोरोना पसरवून ठेवलाय त्यातून आलेल्या रागाचे रूपांतर हिंदूंनी त्यांच्यावर बहिष्कार टाकून एकप्रकारे त्यांच्या आपल्याला  कायम त्रास देण्याच्या वृत्रीचा जणू अप्रत्यक्ष बदला घेतला आहे. अलीकडे तर माझ्या गावातले मुसलमान प्रांताधिकाऱ्यांना भेटून म्हणाले कि आमच्यावर अप्रत्यक्ष टाकलेला बहिष्कार त्यातून आमचे जे व्यावसायिक नुकसान होते आहे, नुकसान होणार नाही असे काहीतरी करा. त्यावर प्रांताधिकारी हेच म्हणाले कि आम्ही लोकांना तुम्ही अमुक माणसाकडून तमुक घ्या किंवा अमुक जातीच्या माणसालाच तुमच्याकडे रोजगार द्या, जबरदस्ती करणे आम्हाला शक्य नाही. प्रत्येक गावातले जे पाकवेडे काही मुसलमान असतात त्यांच्यावर या देशातल्या राज्यातल्या हिंदूंनी अलीकडे कोरोना संकटांनंतर जो अप्रत्यक्ष प्रत्येक बाबतीत बहिष्कार टाकला आहे त्याचे मी कदाचित समर्थन करणार नाही किंवा असा बहिष्कार टाकणे कितपत योग्य त्यावर मला मत व्यक्त करण्याइतका मी मोठा माणूस नाही पण या देशातल्या राष्ट्रप्रेमी प्रत्येक व्यक्तीला जर मनापासून खरोखरी बहिष्कार टाकायचा असेल तर तो त्यांनी सर्वात आधी चीनच्या प्रत्येक वस्तू वर टाकून ज्या पद्धतीने महात्मा गांधी यांनी स्वदेशी चळवळ राबवून इंग्रजांना जेरीस आणले होते त्याच पद्धतीने चीनच्या माजलेल्या वृत्तीचे मनापासून भारतीयांनी खच्चीकरण करायला हवे…

ज्यावर मेड इन चायना लिहिलेले असेल अशी वस्तू प्रसंगी हरामखोर चिन्यांनी आम्हा हिंदुस्थानी जनतेला फुकट जरी दिली तरी ती आम्ही त्यांच्या तोंडावर फेकून मारू असे जेव्हा तुमचे सर्वांचे मन आणि तन ठरवेल तेव्हा आपण चिन्यांविरुद्ध अर्धी लढाई आजच जिंकलो असे म्हणता येईल. मी कधीही चीनमध्ये जाणार नाही आणि मी कधीही चायना वस्तूला हात लावणार नाही अशी शपथ घेण्याची हिच योग्य वेळ आहे. आता प्रश्न उरला या देशातल्या काही आगाऊ वृत्तीच्या मुसलमानांचा, त्यांना मला वाटते यापुढे मुख्य प्रवाहात सामील होण्याची हि शेवटची संधी असेल. मुख्य प्रवाहात सामील न होता जर काही किंवा बहुसंख्य पाकवेडे मुसलमान अरेरावी करीत असेच  राष्ट्रविरोधी भूमिका घेण्यात स्वतःला धान्य समजणार असतील तर या देशातल्या हिंदूंनी मनातल्या मनात मनापासून ठरविले असेल कि जेथे असे पाकधार्जिणे मुसलमान तो रस्ता ओलांडून पुढे निघून

जायचे थोडक्यात त्यांच्याविरुद्ध असहकार पुकारायचा. एक मात्र नक्की या देशात एक मोठा वर्ग राष्ट्रप्रेमी मुसलमानांचाही आहे, ओल्याबरोबर सुके जळले तर माझ्यासारख्या अनेकांना त्यावर वैचारिक धक्का बसेल. कोणत्याही प्रचार किंवा प्रसाराशिवाय गावोगावी हा बहिष्कार प्रयोग सुरु झाला आहे त्यावर आवर घालणे आता कायद्यालाही शक्य होणार नाही असे दिसते…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *