मिशन मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

मिशन मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 

जेव्हा एखादा नेता राज्य किंवा राष्ट्रहित साधण्या मोहीम हाती घेतो, मिशन राबवतो, तेव्हा ज्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची धग्धग उपजत असते त्यांनी त्या नेत्याच्या पाठीशी वैचारिक मतभेद जात पात पंथ पक्ष वय पैसा स्पर्धा सारे काही बाजूला ठेवून ठामपणे अगदी उघड धैर्याने निर्भीडपणे इतरांच्या टीकेची पर्वा न करता उभे राहायचे असते जे मी या विधानसभा निवडणुकीनिमित्ये केले आहे, मिशन क्लीन महाराष्ट्र राबविणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी एक सामान्य पत्रकार म्हणून उभे राहायचे ठरविले आहे. मागेही एकदा तुम्हाला सांगितल्याचे आठवत असेल, माझे त्यांच्याकडे कोणतेही काम नाही नसते किंवा ते त्यांच्या लहानपणापासून माझ्या ओळखीचे आहेत,आमच्या विदर्भातले आहेत, रा.स्व. संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत किंवा त्यापुढे जाऊन असे म्हणता येईल कि ते ब्राम्हण आहेत म्हणून मी तुटपुंजी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करतो आहे असे अजिबात नाही त्यांच्याआधी हेच मिशन जेव्हा मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी हाती घेतले होते तेव्हा तर एकदाही त्यांना न भेटता देखील त्यांच्या ठायी यासाठी लेखणी झिजवत होतो कि ते देखील त्यांच्या पक्षातल्या आणि राष्ट्र्वादील्या अतिशय भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध शड्डू ठोकून उभे होते, दुर्दैवाने त्यांना एक नेते म्हणून भ्रष्ट यंत्रणेने मोठ्या खुबीने नोव्हेअर करून ठेवले आहे जे संकट एकेकाळी त्याच नीच यंत्रणेने दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्यावरही आणून ठेवले होते…

२१ तारखेला होणाऱ्या ठरलेल्या विधानसभा निवडणुकीतले आता साऱ्याच पक्षाचे ठरलेले उमेदवार जोमाने जोरात प्रचाराला लागलेले आहेत. त्यात्या पक्षाच्या उमेदवार यादीवरून जर नजर फिरविली तर असे लक्षात येते कि शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा सोडल्यास इतर कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवार निवडतांना अवस्था उशिरा लग्न करणाऱ्या जोडप्यासारखी झालेली दिसते म्हणजे तिला नवा मिळत नव्हता आणि याला बायको मिळत नव्हती त्यामुळे काहीही न बघता जसे काही जोडपे लग्न करून मोकळे होतात तसे बहुतेकांचे यावेळी झाले होते म्हणजे ज्यांची कधी नेते म्हणून आम्ही नावे गावे देखील बघितलेली नव्हती अशा बहुसंख्य उमेदवारांना काँग्रेस सहित त्या साऱ्यांनी उमेदवारी दिल्याचे स्पष्ट चित्र दिसते. शिवसेनेने फारसे बदल उमेदवार निवडतांना केले नाहीत, जी नावे अपेक्षित होती त्यांनाच नेमकी उमेदवारी मिळाली, शिवसेनेत फारसे अनपेक्षित घडले नाही, सेनेच्या बाबतीत देखील काही ठिकाणी निवड चुकीची केली कि जाणूनबुजून कळायला मार्ग नाही जसे मुंब्र्यात जणू जितेंद्र आव्हाड यांना सेनेने विचारूनच समीर दीपाली सय्यद नावाचे कच्चे लिंबू दिले असे वाटले. राष्ट्रवादीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, त्यांना नेमकी ज्या ज्या नेत्यांना उमेदवारी द्यायची होती ते नेमके त्यांना असे सोडून गेले कि ऐन अक्षता पडण्यापूर्वी मंडपातून वधूने प्रियकराबरोबर पळ काढावा तरीही त्यांच्याकडे सोडून गेलेल्या उमेदवारांच्या जवळपास तोडीचे उमेदवार असल्याने, त्यांची मोठी फजित झाली नाही पण खरी धमाल भाजपाने उडवून दिली…


www.vikrantjoshi.com


आणि यालाच मिशन शाह , फडणवीस आणि मोदी असे म्हणतात. ज्यांना आमदार,नामदार म्हणून सांगितले होते कि नेमके समाजकार्याला वाहून घ्यावे आणि त्यातल्या ज्यांनी हे सांगणे लाइटली घेतले त्यांना त्यांची नेमकी जागा दाखवून देण्यात आली, बेशिस्त, भ्रष्ट असे काहीही खपवून घ्यायचे नाही हे या तिघांनी ठरविले होते तसे ते त्यांच्या प्रत्येक मंत्र्याला राज्यमंत्र्याला आमदारांना वेळोवेळी एखाद्या हेडमास्तरसारखे फडणवीसांनी निक्षून सांगितलेले होते पण ज्यांनी त्यांना लाइटली घेतले, त्यांना आता पश्चाताप करण्यापलीकडे हाती काहीही निदान सध्यातरी उरलेले नाही, स्वपक्षाच्या नेत्यांची जे बेशिस्त खपवून घेत नाहीत ते इतरांना ताळ्यावर आणतांना नजीकच्या काळात अजिबात काळजी चिंता पर्वा करणार नाहीत अशी माझी पक्की माहिती असल्याने मी तुम्हाला वारंवार ओरडून बेंबीच्या देठापासून सांगतो आहे कि मिशन फडणवीस तुम्ही आम्ही सर्वांनी राज्य हितासाठी तुमच्या आमच्या भल्यासाठी राबविले पाहिजे, देवेन्द्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *