उडता राजदीप पडती रिया : पत्रकार हेमंत जोशी

उडता राजदीप पडती रिया : पत्रकार  हेमंत जोशी 

आज हा लेख लिहीत असतांना ३१ ऑगस्ट आहे उद्या गणपती विसर्जन आणि माझी खात्री आहे रिया चक्रवर्ती व तिच्या अन्य साथीदारांना २-३ तारखेला नक्की अटक करण्यात येईल. गणपती विसर्जनाच्या दिवशी उगाच गोंधळ नको म्हणून रिया व तिच्या साथीदारांची अटक २-३ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे असे दिसते. माकडचाळे करणारा पत्रकार राजदीप सरदेसाई दुल्हे राजा सिनेमातल्या माकडछाप जॉनी लिव्हर सारखा मला तंतोतंत हुबेहूबत्या रिया चक्रवर्ती ची आज तक वर मुलाखत घेतांना वाटला भासला त्या सिनेमात कादर खानला जसे शेवटपर्यंत हे लक्षात ध्यानात येत नाही कि त्याचा मॅनेजर जॉनी लिव्हर नेमका त्याचा माणूस आहे कि कादर खानचा शत्रू असलेल्या हिरो गोविंदाचा माणूस आहे, अर्थात जॉनी जसा त्या सिनेमात ज्याची रोझी रोटी खातो त्या बॉसच्या विरोधकाचा म्हणजे गोविंदाचा खास माणूस असतो आणि वेळोवेळी तो कादर खान यालाच अडचणीत आणत असतो तो जॉनी लिव्हर आणि आमच्या पत्रकारितेतील जॉनी लिव्हर राजदीप सरदेसाई या दोघात मला काडीचाही फरक जाणवलेला नाही, अर्थात तुमचेही तेच म्हणणे असेल कारण ज्या रियासठी व तिच्या गुप्त पाठिराख्यांसाठी राजदीप सरदेसाई या वादग्रस्त पत्रकाराने मुलखात घेण्याचे कुभांड रचले त्यात या राजदीपने एकाचवेळी दुल्हे राजा सिनेमातल्या माकडचाळे करणाऱ्या जॉनी लिव्हर या विनोदी पात्रासारखे रियासहित अनेक मित्रांना अडचणीत आणून ठेवलेच पण अतिशय गलिच्छ त्यातून काही घडले असेल तर गेली अनेक वर्षे दर्शकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विश्वास जपण्यासाठी ज्या आज तक हिंदी वाहिनीने अनेक परिश्रम घेतले त्या वाहिनीचा रियाची मुलाखत घेऊन आणि दाखवून जगभरात बट्ट्याबोळ केला… 

केवळ रिया चक्रवर्तीच्या एका नाठाळ भंपक उथळ पोरकट वात्रट नीच हलकट बाष्कळ मुलाखतीपायी आज तक हिंदी वाहिनीने क्षणात क्षणार्धात गमावलेली लोकप्रियता आणि विश्वासाहर्ता पुन्हा कमावण्यासाठी त्यांना यापुढे म्हणजे राजदीप सरदेसाईच्या या घृणास्पद मुलाखतीमुळे हि वाहिनी जागेवर आणण्यासाठी अनेक वर्षे शंभर टक्के खर्ची घालावे लागणार आहे विशेष म्हणजे अगदी विनाकारण आज तक च्या या उथळ भूमिकेतून आक्रस्ताळ्या अर्णब गोस्वामी व त्याच्या वाहिनीला टीआरपी बाबत मोठा फायदा झाला आहे. अर्णब सत्याची बाजू घेतो विकल्या न जाता न घाबरता सत्याला सामोरे जातो अशी आता त्याची इमेज बनल्याने रिपब्लिक वाहिनी एका झटक्यात किती तरी पुढे निघून गेली आहे. तेच राज्यातल्या बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांचे. आज तक वर अख्खे जग राजदीप सरदेसाई याने मॅनेज केलेली रिया चक्रवर्ती ची मुलाखत बघत असतांना त्या मुलाखतीचा काही भाग मोठ्या खुबीने त्यांच्याकडे ज्या पीआर एजन्सीने मराठीकरण करून पाठवला होता, कदाचित कोणाला घाबरून कि क्षणिक मोहाला बळी पडून दाखवण्याची काय गरज होती ? ते मराठीकरण कोणीही सिरियसली तर घेतले नाहीच पण तद्दन बातम्या दाखवणार्या मराठी बातम्यांची मात्र जगभरातल्या मराठी दर्शकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाचक्की छी थू झाली. त्यादिवशी एरवी मला बऱ्यापैकी सुसंस्कृत वाटणारा मुच्छड राजीव खांडेकर थेट बदनाम राजदीप सरदेसाईच्या शेजारी बसल्यासारखा भास झाला. राजीव तुलाही दोन देखण्या तरुण मुली आहेत अशा जबाबदार पित्याने तरी बेजबाबदार वागू नये,  काय झाले ढुंगणावर झाड उगवले तर उलट सावली झाली अशी बेशरम भूमिका घेऊ नये, तू काय उमेश कमावत आहेस काय ? 

थोडक्यात काय तर आगाऊ राजदीप सरदेसाई याने घेतलेल्या पोपट पंची मुलाखतीमुळे आज तक या सुप्रसिद्ध हिंदी बातम्या देणार्या वाहिनीने जणू त्यादिवशी आत्महत्या केली. हत्येला आत्महत्या दाखवण्याच्या लोभापायी शेवटी आज तक या वाहिनीने आत्महत्या केली. राजदीप सरदेसाई याने रिया चक्रवर्तीच्या घेतलेल्या मुलाखतीमुळे सीबीआय नार्कोटीज आणि ईडी या तिन्ही सरकारी यंत्रणेचे काम अतिशय सोपे झाले म्हणून मी राजदीपला जॉनी लिव्हर नावाचा विदूषक म्हटले ठरविले आहे. अर्थात जर राजदीप सरदेसाई यासी मुलबाळ नसेल कि नाही त्यामुळे त्याला एखाद्या बापाचे एकुलते एक पुत्र गेल्यानंतरचे दुःख काय असते कसे कळेल ? एक मात्र सध्या प्रकर्षाने जाणवते आहे कि राज्य सरकार जे अगदी उघड सीबीआय ईडी नार्कोटीज न्यायालये व केंद्र सरकार विरुद्ध उघड पंगा घ्यायला निघाले होते ज्यातून त्यांनी विनाकारण स्वतःच्या पायावर मोठा धोंडा पडून घेतला ते राज्य सरकार बरेचसे खूपसे बॅक फूट वर आलेले दिसते कारण ज्या सीबीआयच्या मुंबईत आलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई महापालिका आयुक्त अगदी उघड म्हणजे मीडियासमोर सांगत होते कि आम्ही त्यांनाही सात दिवसानंतर विनय तिवारी यांच्यासारखे विलग्नवास (quarantine) करू ते मात्र करण्याची त्यांची मुदत संपल्यानंतर देखील हिम्मत झालेली नाही आणि त्यांनी ती केली नाही बरे झाले, काही वेळा हार पत्करणे फायद्याचे ठरते. उद्दाम भाषा आणि मुद्दाम मुलाखती काहींना अधिकाधिक अडचणीच्या ठरणार आहेत ठरतील हि काळ्या दगडावरची रेघ आहे… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *