उद्धवसेना ४ : पत्रकार हेमंत जोशी

उद्धवसेना ४ : पत्रकार हेमंत जोशी 

एक बरे झाले कि उद्धव किंवा राज ठाकरे या दोघांचाही रेडकू झाला नाही, त्या दोघांच्याही बायकांनी दिवंगत मीनाताई ठाकरेंना फॉलो केले म्हणजे नाही म्हणायला अनेकदा किंवा कित्येकदा आपापल्या नवर्यांसंगे पण त्या एखाद्या म्हशीसारख्या पुढे आणि नवरा रेडकू होऊन इकडे तिकडे जत्रेत हरविल्यासारखा भीत भीत मागे मागे, असे राज किंवा उद्धव दोघांच्याही बाबतीत घडले नाही, तशा त्या दोघीही म्हणाल तर आपापल्या नवर्याच्या राजकीय पक्षात अनेकदा आघाडीवर पण मर्यादा पाळून, शर्मिला ठाकरे व रश्मी ठाकरे दोघीही त्यांच्या नवऱ्यासाठी अनुक्रमे राज आणि उद्धव यांच्या साठी महत्वाच्या असेट्स, त्या दोघींचेही अप्रत्यक्ष योगदान त्यांच्या नवऱ्याला मनापासून कौतुक वाटावे असे, म्हणून त्यांच्याविषयी त्या मीनाताईंसारखेच ‘ फील गुड ‘ वाटते म्हणजे आदर करावासा वाटतो, कौतुक करावेसे वाटते…


वादग्रस्त अशोक शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना आम्ही पत्रकार एकत्र असलो बसलो कि हमखास म्हणून मोकळे होत असू कि अशोकजी त्यांच्या पत्नीसमोर नुकतेच जन्माला आलेले रेडकू वाटतात कारण मिसेस चव्हाण पुढे पुढे आणि हे चालले इकडे तिकडे नको त्या ठिकाणी नजर टाकत टाकत मागे मागे…


एक मात्र नक्की म्हणणारे म्हणतात किंवा सांगणारे सांगतातही कि रश्मीवहिनींना जसे इतर बहुतेक स्त्रियांचे असते, त्यांनाही आपल्या माहेरच्या नातेवाईकांचे खूप आकर्षण आहे, कौतुक आहे आणि मिलिंद नार्वेकर हे त्यांचे म्हणाल तर तसे दुरून दुरून नातेवाईक पण माहेरकडून म्हणून ते मिसेस ठाकरे यांना एवढे सक्ख्या भावा सारखे कि नार्वेकर पर्व सुरु झाल्यानंतर जसे भास्कर जाधव किंवा देवेंद्र साटम किंवा तत्सम दिग्गज नेते केवळ नार्वेकरांच्या म्हणाल तर हुकूमशाहीला कंटाळून बाहेर पडले तसे कदाचित उद्धव ठाकरे यांचेही होऊ शकते पण मिलिंद नार्वेकर यांना मातोश्रीवरून हलविणे म्हणजे घराच्या मधोमध नको असलेल्या पिलरला हलविण्यासारखे, मध्येच आलेला पिलर सर्वांना डोकेदुखी असतो पण पिलर हलविला तर इमारत जमीनदोस्त होते, असेच चित्र जणू मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीत उभे केले गेल्याने सेनेतून बाहेर पडणे प्रसंगी कोणावरही हे बितु शकते पण पिलर हलणे हलविणे कोणालाही शक्य नाही दस्तुरखुद्द उद्धवजींना देखील, असे मी नाही अनुभव घेतलेले सांगतात. नार्वेकरांशी तेथे पंगा घेणारा आता तो एकटा उरला आहे, हर्षल प्रधान, बघूया तो जिंकतो कि त्याचाही इतरांसारखा ‘ गेम ‘ होतो…


बाळासाहेब ठाकरे यांच्याही मनात मिलिंद नार्वेकर यांचे लुडबुड करणे खटकणारे होते, ते म्हणायचे हा अजगर अख्खी शिवसेना एक दिवस गिळंकृत करेल पण त्यांचे हे असे राग व्यक्त करणे तेवढ्यापुरते असायचे, लेकीसमान रश्मी ठाकरेंना दुखावणे त्यांनाही उद्धवजींसारखे शक्य झाले नाही, जर कधी असे घडले कि नार्वेकरांनी आदित्य आणि तेजस या दोघांमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या दोघांची आई नक्की चवताळून उठेल आणि चालता हो, म्हणेल पण तोपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल. तेजस देखील आदित्य यांच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याचे नक्की झाले आहे, देवाला मनापासून प्रार्थना ठाकरे घराण्याची भाऊबंदकी त्या दोघांच्या देखील राजकीय आयुष्याला नजर न लागणारी ठरो. रश्मी ठाकरे यांचे माहेरचे 

आडनाव पाटणकर, ते डोंबिवलीतले. मीनाताई होत्या तेव्हा मातोश्रीवर त्यांच्या भावाचा म्हणजे चंदूमामा वैद्य यांच्या नावाचा बोलबाला होता. अलीकडे रश्मी ठाकरे यांच्या माहेरच्या माणसांचा दरारा म्हणाल तर दबदबा तेथे आहे. त्यांचे बंधू किंवा भाचा शौनक पाटणकर तसे वादग्रस्त पण जबरदस्तही. पाटणकरांचे कार्यालय बांद्र्यात थाटले गेलेले आहे, तेथे मुंबई महापालिकेशी संबंधित अनेकांचा राबता असतो.धुमाकूळ घालणाऱ्या या अशा महापराक्रमी नातेवाईकांच्या सत्य कथा येथेच संपणाऱ्या नाहीत फक्त त्या तमाम नातेवाईकांना एकच सांगणे, अनेक कठीण वाईट प्रसंग उद्धव ठाकरे यांच्यावर आले पण त्यांच्यामागे अतिशय कणखरपणे रश्मी ठाकरे मोठ्या हिम्मतीने उभ्या होत्या, उभ्या आहेत, उभ्या राहतील, त्यांचे माहेरच्या माणसांवर असलेले प्रेम चुकीचे आहे, असे म्हणणे अयोग्य फक्त त्या तमाम नातेवाईकांनी निदान त्या माऊलीची फसगत करून सर्वसामान्यांची शिवसेना बदनाम करू नये किंवा अडचणीत आणून ठेवू नये, या लिखाणातून इतर कोणतेही वेगळे अर्थ काढू नयेत…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *