नाराज मराठी, निराश मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

नाराज मराठी, निराश मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 

या मास्कमुळे मोठी पंचाईत झाली आहे. अलीकडे एकाने त्याच्या प्रेयसीच्या घराचा पत्ता थेट आपल्या बायकोलाच विचारला विशेष म्हणजे त्यावेळी त्याची बायको तिच्या प्रियकराबरोबर होती पण मास्क लावूनच त्यामुळे ती बाल बाल वाचली. मागच्या पंचवार्षिक योजनेत एकही दिवस नव्हता अशी एकही संधी ज्याला असूयेची दुर्गंधी म्हणा विरोधकांनी सोडली नाही ज्यादिवशी माझ्या पाहण्यातला आजवरच्या केवळ चार दोन सर्वोत्तम सर्वांगसुंदर विचारांच्या प्रजेचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक  फडणवीस यांना मागच्या पंचवार्षिक योजनेत छळले नाही मानसिक त्रास दिला नाही सासुरवास केला नाही. फडणवीस यांची मानसिक कोंडी कुचंबणा अवहेलना करण्यात विरोधक आणि मित्र दोघांतही एकप्रकारे स्पर्धा लागली होती कि फडणवीसांना सर्वाधिक कोण छळून मोकळे होते ते. आणि तेच कालचे वटवट करणारे आज आम्हा साऱ्यांना अक्षरश: ज्यांनी मृत्यूच्या दाढेत आणून ठेवले आहे त्यांना कोणतेही दूषण द्यायला त्यांचे दोष चुका काढायला पुढे येत नाही. पाकिस्थांनची निर्मिती करून त्यावेळेच्या नेत्यांनी जशी कायमस्वरूपी हिंदी मुस्लिम द्वेष अशी जी खोल दरी  निर्माण करून ठेवली आहे ते तसेच येथे आज या राज्यात घडले आहे, फडणवीसांच्या सुविचारांचे नेते आणि इतर असे जातीचे पद्धतशीर गणित महाराष्ट्राची भविष्यातली चिंता केवळ सत्ता मिळविण्याच्या नादात काही दुष्ट नेत्यांनी वाढवून ठेवली आहे मोठी दरी  त्यातून निर्माण झाली आहे ज्यामुळे सुविचारी पण काहीशा दुबळ्या म्हणजे टगेगिरीत मागे असणाऱ्या नेत्यांना लोकांना कार्यकर्त्यांना मतदारांना त्याचा फार मोठा त्रास होणार आहे, मानसिक त्रास वाढत जाणार आहे. भुजबळ आणि ठाकरे यांनी निदान एकदा तरी या राज्यात वाहिन्यांच्या माध्यमातून जनतेला दाखवून द्यावे कि शिवभोजन थाळ्यांचे कंत्राट कोणाला देण्यात आलेले आहे आणि किती थाळ्यांचे कसे वाटप होते ते….

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये फारसा समन्वय नाही आणि येथे या राज्यात ऑडीट नसलेली फार मोठी रक्कम कोविड वर खर्च न होता अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या दलालांच्या मंत्र्यांच्या घरात खरेदीच्या नावाने जाते आहे जमा होते आहे हीच वस्तुस्थिती आहे थोडक्यात या महामारीत देखील सत्तेशी संबंधित संधीसाधू प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मग्न आहेत हीच वस्तुस्थिती आहे, पुन्हा तेच हतबल ठरलेल्या उद्धव ठाकरे यांनी राजाचे सिंहासन सोडून पंतप्रधानकी स्वीकारली आणि तेथेच सारे बिनसले, मी म्हणतो तेच खरे ठरले आहे कि वाघाने शेळीचे कपडे घालायचे नसतात दिलीपकुमारने अलोकनाथच्या अभिनयाची नक्कल करायची नसते मुकेश अंबानीने अंटालिया च्या खाली चहाची टपरी लावून निताबाईंनी भजी तळायची नसतात संदीप जोशींनी तुकाराम मुंडेंवर शिंतोडे उडवायचे नसतात साऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन कुर्निसात करायचा असतो तेथे बसलेल्या सिंहाधिपतीने कधीही इतर क्षुल्लक सिंहासनावर आरूढ व्हायचे नसते, सारेच गणित या राज्याचे बिघडले आहे सेना भाजपा दुराव्यामुळे राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी वाईट असा होत नाही पण कॉम्बिनेशन चुकले सेनाप्रमुख चुकीच्या पंक्तीला जाऊन बसले म्हणजे विहीणबाई त्यांच्या पंक्तीला न बसता बुफेच्या रांगेत जेवणासठी उभ्या आहेत असे ठाकरेंच्या बाबतीत घडले. प्रबोधनकार असोत कि बाळासाहेब आणि उद्धव असोत कि आजचा आदित्य, आम्हा निदान मराठींना तरी हे सहन होणारे नाही कि राजा इतरांसमोर झुकतो आहे म्हणजे उद्धव आणि आदित्य यांनी प्रबोधनकार व बाळासाहेबांची गादी पुढे चालवावी त्यांनी कैकयी होऊन रथाच्या खाली उतरू नये, मोठे नैराश्य मराठी माणसांमध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये या दिवसात पसरलेले आहे… 


www.vikrantjoshi.com

राज्यकर्त्यांच्या जीवघेण्या सत्ता स्पर्धेत विशेषतः आम्ही मुंबई आणि ठाणेकर वस्तुस्थिती सांगतो मृत्यूचे तांडव सहन करतो आहे, कोरोना संपता संपता तुम्ही आम्ही एकमेकांना बघणार तरी आहोत का असे आज या मुंबई टेरेटरी मध्ये भयावह धोकादायक चिंताजनक काळजी करण्यासारखे वातावरण नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयातून निर्माण झाले आहे त्यात केवळ राज्याची नव्हे तर राष्ट्र हाकणाऱयांची पण मोठी चूक आहे, राज्यकर्त्यांनी कोरोना महामारीत घेतलेले चुकीचे निर्णय मित्रांनो एवढेच लक्षात ठेवा आपल्या साऱ्यांचे प्राण कंठाशी आहेत केव्हा कोणाकडे काय घडेल सांगता येत नाही असे बिघडलेले वातावरण या राज्यात विशेषतः मुंबई टेरेटरीमध्ये आहे. काही पुरावे मांडून मला तुम्हाला आणखी आणखी घाबरवून सोडायचे नाही पण एकही क्षण बेसावध न राहता कोरोनाशी आपण स्वतःच मुकाबला करायचा आहे सरकारी सहकार्य तुटपुंजे आहे त्या भरवंशावर फारसे विसंबून न राहता आपणच आता आपले रक्षण करावे. अलीकडे मला काँग्रेसचे एक फार मोठे नेते जे म्हणाले ते ऐकून काँग्रेसच्या मनात गोटात देखील मोठी खदखद आहे जी अधून मधून बाहेर पडत असते किंबहुना या खदखदीचा एक दिवस नक्की स्फोट होणारच आहे. ते म्हणाले आमच्या व सेनेच्या मंत्र्यांची आणि राज्यमंत्र्यांची अवस्था या सरकारमध्ये एखाद्या चपराश्यासारखी झालेली आहे हे राज्य अजोय मेहता व त्यांचे  भोसले छाप साथीदार आणि शरद पवार जे ठरवतील त्यापद्धतीने हाकले जाते आहे जे चित्र अत्यंत निराशजनक आहे पण कोरोना महामारीत उघड विरोध करणे त्यातून आमचे मोठे राजकीय नुकसान होईल म्हणून आम्ही मूग गिळून गप्प बसलो आहोत. माझे त्यावर असे म्हणणे आहे कि निदान शंभर टक्के तरी शरद  पवार अजोय मेहता यांनी कोरोना महामारीत हाती छडी घेऊन हे राज्य हाकावे कारण कोणत्याही संकटात पवार कमी पडणारे नाहीत हे या राज्याने अनेकदा अनुभवलेले आहे आणि मेहता यांची देखील अत्यंत वाकबगार प्रशासकीय अधिकारी म्हणून ख्याती आहे. पवार मेहता कॉम्बिनेशन अजिबात वाईट नाही पण त्या दोघांमध्ये तरी तणावाचे संबंध नसावेत आता निदान त्यांनी आम्हाला वाचवावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *