फडणवीस फंडा सेनेचा वांदा : पत्रकार हेमंत जोशी

 फडणवीस फंडा सेनेचा वांदा : पत्रकार हेमंत जोशी 

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले होते कि उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य वेळी फडणवीसांना लाथ मारली आहे, अलीकडे मंत्रालयात जो प्रकार घडला म्हणजे आदित्य ठाकरे ऐकत नाहीत म्हणून अबू आझमी यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देऊन जो गोंधळ घातला कि आदित्य आमचे ऐकत नाहीत एवढेच काय ते आमचा फोनही उचलत नाहीत म्हणजे ठाकरे यांच्या राजकीय खेळीचा आता फडणवीस यांच्याप्रमाणे अबू आझमी यांनाही फटका बसला आहे पण यात मला वस्तुस्थिती कमी राजकारणचा भाग अधिक वाटतो. तुम्ही म्हणता तसे आम्ही त्या हिंदू व मराठी विरोधी मुसलमानांपुढे त्यांच्या नेत्यांपुढे अजिबात झुकलेलो वाकलेलो नाही कदाचित हे असे दाखवण्यासाठी किंवा पुन्हा एकवार शिवसैनिकांची मराठी माणसाची सिम्पथी मिळविण्यासाठी सहानुभूती परत एकदा प्राप्त करून घेण्यासाठीचे हे कदाचित ठाकरे यांचे राजकीय नाटकही असू शकते. पण अबू आझमी यांना तेही आदित्य ठाकरे यांनी थेट फाट्यावर मारणे हे जर सत्य असेल नक्की घडलेले असेल तर उशीर झालाय खरा पण अंगावर घेतलेली हि काही जात्यंध बदमाश मुसलमान नेत्यांची झूल ठाकरे पिता पुत्राने जेवढी शक्य असेल लवकरात लवकर अंगावरून काढणे योग्य व फायद्याचे ठरेल, शिवसेनेचे भविष्यत होणारे आणखी नुकसान त्यातून त्यांना टाळता येणे शक्य होईल… 

पण ज्या पद्धतीने झिशान आणि बाबा सिद्दीकी, अबू आझमी, अब्दुल सत्तार, नवाब मलिक, नसीम खान, अस्लम खान इत्यादी महान मुस्लिम नेत्यांनी ठाकरे पिता पुत्राभोवती कधी मैत्रीतून तर कधी सत्तेच्या माध्यमातून ज्या अति खतरनाक पद्धतीने कोळ्यासारखे जाळे टाकले विणले आहे त्यात अडकलेले ठाकरे पिता पुत्र अलगद कसे यापुढे बाहेर पडतात त्यावर खरे तर राजकीय जाणकारांच्या नजरा खिळलेल्या आहेत. जो विषाचा ग्लास हाती घेतला तर नक्की नाश होणार आहे हे माहित असतानाही उद्धव ठाकरे या अत्यंत सावध व सफल नेत्याने या मंडळींच्या मदतीने सत्ता हाती घेऊन स्वतःच्याच पायावर मोठा धोंडा उगाचच मारून घेतला आहे हे नक्की आहे. ज्याएकमेव कारणासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा होता ते एक प्रमुख कारण म्हणजे या राष्ट्रावर ज्या काही मुसलमानांचे प्रेम नाही त्यांना कडाडून विरोध कारणे त्यांच्या थेट अंगावर धावून जाणे पण शरद पवार यांचे ऐकून आणि मुलाच्या मुसलमान मित्रांच्या पाठीवर कधी कौतुकाची तर कधी बक्षिसाची थाप मारून थेट सावध उद्धवही विरोधकांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी आपले व शिवसेनेचे फार मोठे नुकसान करून घेतले. चुकीच्या निर्णयांवर भलेही उद्धव ठाकरे यांचे पत्रकारांनी वाहिन्यांनी कौतुक करून त्यांना अधिक अडचणीत आणू नये पण जेथे त्यांचे उचललेले पाऊल योग्य असते त्याकडे संशयाने न बघता याही कठीण अवस्थेत त्यांचे अमुक एखाद्या ठिकाणी उत्तम निर्णय घेणे त्याकडे आपण साऱ्यांनीच कौतुकाने बघायला पाहिजे त्यावर संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये झालेली प्रदीर्घ भेट व बोलणे, हे तसे बोलके उदाहरण आहे मात्र  त्यातली नेमकी वस्तुस्थिती लोकांसमोर आली नाही हे दुर्दैवाचे ठरलेले आहे… 

शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, या भेटी निमित्ताने तेही थेट भाजपामध्ये व राज्याच्या विशेषतः मुंबईच्या भाजपा नेत्यांमध्ये आधी प्रचंड अस्वस्थता पसरली नाराजी पसरली त्यानंतर देवेंद्र यांच्या विरोधात मोठी कुजबुज पहिल्यांदा सुरु झाली थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांचे संजय राऊत यांना भेटणे अत्यंत चुकीचे असे हे घडले जो तो भाजपा नेता एकमेकांना सांगू लागला कारण चूक या नेत्यांची अजिबात नव्हती, खरे तर वस्तुस्थिती त्यांनाही माहित नव्हती एवढे हे भेटीचे राजकारण व प्रकरण गुप्त ठेवण्यात आले होते कारण ते थोडेसे जरी शरद पवार यांच्या राऊत व फडणवीस भेटी आधी कानावर गेले असते तर क्षणार्धात पवारांनी हे भेटीचे प्रकरण उखडून टाकले असते, पवार ते बिघडवून मोकळे झाले असते आणि नेमके हेच अगदी सुरुवस्तीपासून मी तुम्हाला अगदी लेखी सांगत आलेलो आहे कि उद्धव ठाकरे यांना अंडर एस्टीमेट कधीही करू नका. हे नक्की आहे कि मुख्यमंत्री होऊन शिवाय आदित्य यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन उद्धव ठाकरे यांच्या हातून कुठल्यातरी बेसावध क्षणी मोठी चूक झालेली आहे पण त्यात त्याआधी फडणवीसांकडून मानसिक कुचंबणा किंवा दुखावल्या जाणे हा महत्वाचा एक भाग होता हेही विसरून चालणार नाही. फडणवीस प्रत्येकच ठिकाणी योग्य होते असेही म्हणणार्यातला मी नाही हे वाचकांनो लक्षात घ्या… 
क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *