भय्यू महाराजांचे लग्न ३ : पत्रकार हेमंत जोशी

भय्यू महाराजांचे लग्न ३ : पत्रकार हेमंत जोशी 

एका छान आणि प्रत्यक्षात घडलेल्या चुटक्याने या लेखाची सुरुवात करतो,

 

फार पूर्वी पत्रकार गुरुदत्त वांद्र्याच्या 

चाळीमध्ये रहात होता…

त्याच्या शेजारची बबली हॉस्पिटल 

मध्ये ऍडमिट होती…

बबलीच्या बाबांचे मित्र नाना तिला 

भेटायला गेले…

काय झाले अचानक ? त्यांनी विचारले.

अरे सकाळी अंघोळ करतांना अचानक 

चक्कर येऊन ती बाथरूममध्ये पडली…

नशीब आमचे, 

शेजारचा गुरुदत्त बारीकशा भोकातून 

आमच्या घरातले बघत होता..

गुंड्याभाऊ इनोसंटली बोलून गेले.

एक चावट सत्य : 

वेगवेगळ्या कालखंडात ‘ सनी ‘ शब्दाची 

ओळख ही अशी होती, 

१९८० मध्ये गावस्कर, 

१९९० मध्ये देओल,

२०१० मध्ये लियॉन…

तिघांचेही काम एकच होते, 

फक्त ‘ ठोकाठोकीची ‘ पद्धत 

वेगळी वेगळी होती…!! 

आता भय्यू महाराजांच्या लेटेस्ट लग्नाकडे वळूया..अकोल्याचे विजय देशमुख उगवेकर म्हणतात, १९९० च्या दशकात बहुजन समाजात एका पारदर्शी, सेवाभावी, समाजपयोगी, मार्गदर्शी नेतृत्वाची फार मोठी उणीव भासत होती, मार्गदर्शकाच्या भूमिकेत कोणताही योग्य असा चेहरा बहुजनांना दिसत नव्हता. अशावेळी भय्यू महाराज आपणास उभ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मार्गदर्शक म्हणून स्वीकारले. सुरुवातीला आपल्या हातून घडणारे सामुदायिक विवाह, जलसंधारण किंवा कृषी विषयात आपण सुरु केलेले काम, आपल्या बद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण जसजशी सत्ता बदलत होती आणि सत्ताधीशांच्या तुम्हीही जवळ जात होता, तुमच्यातला तो बदल मग सामान्य बहुजनांना दूर नेत होता, अरे, हेही तसलेच, आमच्या ते लक्षात येत होते….

आपली वारंवार भांगणारी एकाग्रता आणि चुकीचे निर्णय, चंचल वागणे, आमची खात्री झाली, आपणही त्या तसल्याच मार्गावरले, काहीच फरक नाही, ते सत्ताधारी, अधिकारी आणि तुम्ही बुवा, एवढाच काय तो पेशा म्हणून फरक होता. मृत्यू हे सत्य आहे पण तुम्ही पत्नी आणि वडिलांच्या मृत्यूचेही आणि स्वतःवरील हल्ल्याचे देखील भांडवल केले. असे ऐकले होते कि कि सिद्ध पुरुष हे झालेला वार किंवा ओढवलेल्या संकटावर, दुःख्खावर आंतरिक ऊर्जेने मात करतात, पण जखम दाखवून आपण त्यावर कायम सिम्पथी मिळविण्याचा दर्जाहीन प्रयत्न केला. आणि आता तर तुम्ही कळस केला. अहो, तुम्ही समाजाचे पालक होता, मग तुमची आई, बहिणी, मुलगी पोरक्या कशा, मला वाटते नको त्या वयात तुम्ही लग्न केले, पण समाजाला पोरके केले, बहुजन पुन्हा एकदा पोरके झाले आणि तुमची निरागस मुलगीही….

ज्या सामुदायिक विवाहाची संकल्पना तुम्ही प्रत्यक्ष अनेकदा या महाराष्ट्रात राबविली, सतत २५ वर्षे तुम्ही हे सामुदायिक विवाहाचे कठीण असे व्रत अमलात आणले तेच तुम्ही आज जेव्हा नको त्या वयात दणदणीत विवाह करून मोकळे होताहेत, हा प्रकार मनाला आणि बहुजनांना अस्वस्थ करून सोडणारा. तुमचे कार्य आम्हाला आवडत होते म्हणून आम्ही तुम्हाला देवाच्या रूपात बघितले होते, पण भलतेच घडत गेले…

अत्यंत बुद्धिमान आणि भाषाप्रभू असलेल्या विजय देशमुख यांनी येथे नेमके बहुजनांच्या मनातले रेखाटले आहे असे वाटते. कसला तो पारिवारिक माहोल, ज्या संतांच्या भूमिकेत तुम्ही वावरत आहेत, तेथे या वयात असले वाजत गाजत लग्नाचे थेर भक्तांना विमनस्क अवस्थेत नेऊन सोडतात, नैराश्य आणतात, आपण समजलो होतो तसा आपला देव नाही किंवा नव्हता, एकदम चालू आणि सामान्य माणूस आपल्या उल्लू बनवून गेला, हे सत्य जेव्हा हळूहळू त्यांच्यासमोर उलगडतेय, उलगडेल, या धक्क्यातून त्यांना स्वतःला सावरणे मोठे कठीण होऊन बसणार आहे. वास्तविक तारुण्य निघून गेल्यानंतर म्हणजे तुमच्या वयाच्या या पन्नाशीला संयम पाळावा, शांतता पाळावी असे म्हटल्या जाते 

पण तुमच्या बाबतीत हे असे घडतांना दूर दूर पर्यंत दिसत नाही. हा लेख समाप्त करतांना एक महत्वाचे सांगतो. जेव्हा माधवी वाहिनी कुठल्याशा धक्क्याने अचानक गेल्या, श्रीमान भय्यू त्यादिवशी ढसाढसा रडत बसले असतांना त्यांच्याजवळ येऊन कुहू म्हणाली, बाबा आता आज का रडताहात,अहो जेव्हा कालपर्यंत माझी आई एकटी रडत बसलेली असायची, तुम्ही कधी तिचे अश्रू पुसतांना दिसले नाही….!! 

समाप्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *