चिरंजीव मन्मथ : पत्रकार हेमंत जोशी

चिरंजीव मन्मथ : पत्रकार हेमंत जोशी 


तो गेल्यापासून त्याच्यावर लिहावे, अगदी मनातले सांगून टाकावे, मनापासून वाटत होते पण लिहायला घेतले कि शब्द आठवत नव्हते आणि डोळ्यातून सारखे पाणी झिरपायचे, आताही तेच होतेय, हे लिहितांना, पण आज थांबणार नाही, लिहून मोकळे व्हायचे हिम्मत करून ठरवले आहे….

श्री मिलिंद आणि सौ. मनीषाताई म्हैसकर या माझ्या अतिशय आवडत्या आयएएस दाम्पत्याचा एकुलता एक मन्मथ अलीकडे अचानक सोडून गेला. मी तर जणू त्या कुटुंबाला आपलेच मानणार्यातला पण जगभरातल्या प्रत्येक मराठी कुटुंबात जशी विश्वास पाटलांची पानिपत कादंबरी हमखास असते ते तसे मन्मथच्या जाण्याने…म्हणजे म्हैसकरांना ओळखणारे किंवा न ओळखणारे पण या राज्यातले असे एकही घर नाही जे मन्मथ च्या दुर्दैवी मृत्यूमुळे हादरले नाही किंवा दुःखी झाले नाही, मग जे त्यांना आमच्यासारखे जवळून बघणारे किंवा ओळखणारे, आमची काय अवस्था झाली असेल, एवढेच सांगतो, शब्द नाहीत या अकल्पित घटनेविषीयी लिहिण्यासाठी…

प्रशासकीय अधिकाऱ्यात दोन अगदी उघड गट दिसून येतात, पहिला गट थेट आयएएस होणाऱ्यांचा आणि दुसरा गट खात्यामार्फत प्रमोट होत होत प्रशाकीय अधिकारी होणाऱ्यांचा. दोघांच्या वागण्या बोलण्यात राहण्यात विचारात प्रचंड तफावत असते, पहिले अतिशय  स्टायलिश बहुतेकवेळा काहीसे खडूस किंवा आखडू असतात आणि प्रमोट होणारे येथे रुळलेले आपल्यातलेच एक आहेत, आपल्याला वाटते. मिलिंद म्हैसकर तसे थेट आयएएस पण तरीही त्या आखडू परिवारातले नाहीत, एकदम मोकळे ढाकळे, कोणीही त्यांच्याकडे गेल्यानंतर हसत हसत त्याला मदत करणारे, मनीषाताई नवर्याच्या एकदम कॉन्ट्रास्ट, महिला प्रशासकीय अधिकाऱ्यातली जणू माधुरी दीक्षित, राहणे बोलणे दिसणे तिचे सारेच काही एकदम हटके, जो कोणी या दाम्पत्याच्या कुठल्याही मध्यमा तुन संपर्कात येतो, आपोआप म्हैसकरमय होतो, मनीषाताईंच्या माहेरच्या बाबतीत देखील तेच, निवृत्त प्रशासकीय अधिकारी अरुण पाटणकर असोत किंवा त्यांचे अत्यंत कर्तबगार आयआरएस चिरंजीव अभिजित पाटणकर असोत, सारे पाटणकर आजही एवढ्या यशानंतर देखील टिपिकल नागपुरी, कोठेही गर्व नाही, अगदी अघळपघळ, आपल्यातलेच एक वाटणारे, त्यामुळे म्हैसकर पाटणकर कुटुंबात घडलेली हि अत्यंत अत्यंत दुर्दैवी घटना, तन आणि मन अतिशय अस्वस्थ करून गेली, आजही अजिबात मी आणि माझे कुटुंब या दुःखातून सावरलो नाही, इतक्या सहजासहजी सावरणे शक्यही नाही…

आधी अरुणजी किंवा त्यानंतर मनीषाताई किंवा अभिजित किंवा मिलिंद, सारेच मोठ्या अधिकारपदावर, पण मनात कधी हा विचारही आला नाही कि वैक्तीतक घरोबा असलेल्या या कुटुंबाचा घ्या काहीतरी फायदा करून, एक मात्र नक्की, त्यांचे यश बघून सुखावणे हि आमच्यासाठी नित्याचीच एक बाब, त्यामुळे कुणा दुष्टाची लागलेली हि नजर, घरातलेच कोणीतरी गेले, एवढे प्रचंड दुःख मन्मथच्या जाण्याने झाले. त्या बेभरवशाच्या परमेश्वराला मी तेच नेहमी सांगतो, अरे, तू आमचे सर्वकाही हिरावून घे पण एखाद्याच्या घरात एखाद्याच्या तारुण्यात यमाला पाठवतांना कृपया शंभर वेळा विचार कर, पण तो काही ऐकत नाही, येथेही त्याने ऐकले नाही आणि एक आनंदी कुटुंब त्याने एका क्षणात उध्वस्त करून सोडले, या अफलातून दाम्पत्याला जीणे त्यानेच नकोसे केले….अति अति वाईट झाले..

आपल्या घरातले काही नोकरचाकर वर्षनुवर्षे आपल्याकडे काम करता करता जणू आपल्यातलेच एक होऊन जातात तरीही जेव्हा केव्हा आपल्याकडल्या एखाद्या समारंभाला सारे गणगोत जमते, नेहमीचे ते नोकरचाकर सहकुटुंब हजेरी लावतात पण एरवी आपल्यातलेच एक वाटणारे ते त्यादिवशी मात्र त्यांचा वावर काहीसा अलिप्त असतो किंवा आपल्यालाही त्यांचे ते तसेच वागणे अपेक्षित असते. माझाही पत्रकार म्हणून वावर अशा ओळखीच्या ठिकाणी बहुतेकवेळा घरातल्या या अशा नोकराचाकरांसारखा असतो कारण माझ्यात भिनलेली आक्रमक सडेतोड स्पष्ट पत्रकारिता त्यामुळे जरी प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध असलेत तरी विशिष्ट अंतर राखूनच घरोबा ठेवण्याची सवय लागली आहे आणि लोकांनाही ते तसेच अपेक्षित असते आपले वागणे एखाद्या अछूतासारखे पण चुकून जेव्हा एखाद्या कुटुंबात ते बंधन जाणवत नाही मग अशा एखाद्या पाटणकर म्हैसकर कुटुंबाला आम्ही आपोआप आपले सख्खे मानून मोकळे होतो. आता तुम्हीच कल्पना करा, चिरंजीव मन्मथच्या जाण्याने आमच्या मनाचे काय झाले असेल…

आणखी एक उदाहरण देतो, काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे सुप्रसिद्ध व्यवसायिक विवेक देशपांडे यांच्या मुलीच्या विवाहानिमित्ते तेथे गेलो होतो, मुद्दाम महाऊर्जाचे संचालक अभिजित देशपांडेंच्याही घरी गेलो, त्यांच्या वडिलांना म्हणजे जयंत देशपांडे यांना भेटायला, ते देखील या राज्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले त्यामुळे त्यांच्याशी जुना परिचय, पुढे अभिजीतमुळे कायम संबंध रूढ धृड झाले. त्यांच्या घरी गेलो, पुढ्यात पोहे आले, खूप खूप स्वादिष्ट होते, मी विचारले कोणी केले, अभिजित म्हणाले आमच्याकडे काम करणाऱ्या ताईंनी, त्या नवबुद्ध आहेत पण सारा स्वयंपाक अगदी ब्राम्हणी पद्धतीचा करून वाढतात, पोह्यांचे जाऊ द्या हो, पण एखाद्या नवबुद्धाला ब्राम्हणाच्या घरात थेट चुलीपर्यंत मानाचे, आई गेल्यानंतर आईसारखे स्थान, त्याक्षणी देशपांडे कुटुंब आभाळापेक्षा उंच वाटले. आम्हा आक्रमक पत्रकारांचे हे असेच, एखाद्या कुटुंबात, एखाद्या घरात थेट चुलीपर्यंत प्रवेश मिळाला कि अशा कुटुंबावर आपोआप जीव ओवाळून 

टाकावासा वाटतो, म्हणून मन्मथच्या जाण्याने मन सैरभैर झाले आहे, सावरता सावरत नाही…

मन्मथ तू हे असे का केले, चांगले नाही केलेस…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *