पवारांचे भोग : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे भोग : पत्रकार हेमंत जोशी 

असे आहे वाचकांनो, सिंह जाळ्यात अडकला कि कोल्हा सुद्धा सिंहाला वाईट अर्थाने डोळा मारून मोकळा होतो. वाघीण खड्ड्यात पडली कि माकड देखील तिच्या ओठांची पप्पी घेऊन मोकळे होते. अस्वलास बांधून ठेवा अशावेळी बोका देखील त्यासी गुदगुदल्या करून मोकळा होईल. एखाद्या पहिलवानाला जख्खड म्हातारपण आले कि टपरीवर चहा देणारा पोऱ्या देखील त्याच्या ऑर्डरकडे दुर्लक्ष करून मोकळा होतो, साखळदंडाने जर गोरिला बांधून ठेवला तर माकडीण देखील त्याच्या ओठांची पप्पी घेऊन मोकळी होईल. तुमच्या ते लक्षात आलेच असेल कि हे वर्णन सध्या शरद पवारांना तंतोतंत लागू पडते. जेथे कट्टर मुस्लिम हसन मुश्रीफ भाजपाकडे निघाले आहेत तेथे कोण केव्हा येईल, भरवसा नाय….


आमचे मुख्यमंत्री जयंत पाटील असतील खुद्द पवारांनी सांगितल्याने जयंत पाटलांचे हिंदी सिनेमातल्या नायकासारखे झाले आहे म्हणजे नायकाचे प्रेम भलत्याच नायिके वर असते पण मुखिया मधेच येऊन जाहीर करतो कि त्याच्या मुलीचे लग्न नायका सांगे त्याला करवून द्यायचे आहे. जयंत पाटलांना हा असा जबरदस्तीचा राम राम करावा लागतो आहे, त्यांचे प्रेम तर फार आधीपासून भाजपा नावाच्या प्रेयसीवर जडलेले पण गावच्या मुखियाने चतुराईने हा गोंधळ घालून ठेवला आहे. पवारांची ती नेहमीची पद्धत आहे म्हणजे सुनील तटकरे राष्ट्रवादी सोडून जाताहेत पवारांच्या कानावर येताच त्यांनी थेट तटकरेंनाच प्रदेशाध्यक्षपदी बसविले होते नेमके हे असे जयंत पाटलांच्याही बाबतीत घडले आहे, सध्यातरी जयंतरावांच्या नशिबी मासिक पाळी गेलेल्या बाईंसंगे लग्न झाल्यासारखे घडले आहे…आपण सारे पवारांना सोडून शिवसेनेत किंवा भाजपामध्ये गेलेल्यांना दोष देतोय, ज्यांच्या भरवशावर श्रीमंत झाले, लुटून मोकळे झाले त्याच पवारांना सोडून जाणे योग्य नाही, नव्हते, मतलबी आहेत, स्वार्थी हलकट संधीसाधू आहेत म्हणून मोकळे होतो आहे पण जे पवारांना सोडून बाहेर पडले पडताहेत ते तसे का करताहेत कधी त्यावर काहीही वाचण्यात येत नाही, राष्ट्रवादी व पवारांना सोडून जाणाऱ्यांचीही भूमिका समजावून घेणे येथे आवश्यक ठरते. प्रसाद लाड यांचे अतिशय जवळचे स्नेही मला म्हणाले कि कालपरवापर्यंत पवारांचे लाडके असलेले प्रसाद लाड आज मुख्यमंत्र्यांना जवळचे म्हणून त्यांच्यावर सतत माघारी टीका करण्यात येते पण याच प्रसाद लाड यांनी विधान परिषद निवडणुकीत तब्बल १८ कोटी रुपये खर्च करूनही त्यावेळी शरद पवारांनी सचिन अहिर यांना हाताशी धरून केवळ ४-५ मतांनी अगदी ठरवून पाडले होते जेव्हा लाड यांच्या हाती नेमके पुरावे आले तेव्हाच त्यांनी ठरविले होते कि पवारांपासून दूर पाळायचे….


राष्ट्रवादीच्या महिला नेत्या चित्रा वाघ भाजपामध्ये गेल्या तेव्हाही त्यांच्या नावाने हि अशीच बोंबाबोंब करण्यात आली पण चित्रा यांचे एक महिला नेत्या म्हणून वाढत चाललेले महत्व किंवा सुप्रिया सुळे यांच्याही पेक्षा त्यांना दिली जाणारी प्रसिद्धी हे 

पवारांना सहन होणे नक्की शक्य नव्हते मग काय ‘ वाघ ‘ यांच्या पाठीशी काही ‘ कोल्ह्यांना ‘ म्हणजे चतुरांना मानसिक त्रास देण्या सोडण्यात आले त्यात फौजिया खान, विद्या चव्हाण आणि सुरेखा ठाकरे कशा व किती आघाडीवर होत्या हे नेमके चित्र वाघ यांना विचारल्यास आधी त्या हंबरडा फोडून रडतील नंतर एक एक प्रसंग जेव्हा सत्यनारायणाच्या कथेसारखा सांगतील, बाहेर पडतांना, चित्राजी तुमचा पक्ष सोडण्याचा निर्णय योग्य होता, तुम्ही त्यांना तोंडावर सांगून मोकळे व्हाल…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र अजितदादा पवार हे देखील संघ दक्ष म्हणण्या केव्हाच तयार आहेत पण फडणवीसांनीच त्यांना सांगितले आहे, काळजी करू नका, तुमचे तुमच्या मनातले असे काहीही वाईट होणार नाही, थांबा, माझ्या निरोपाची वाट पहा. एकमेव नेता प्रफुल्ल पटेल ज्यांच्याविषयी ते गुजराथी असूनही शहा आणि मोदी यांना कवडीचीही आस्था नाही, प्रेम नाही आणि महाराष्ट्राचे असूनही थेट फडणवीसांना त्यांच्याविषयी आदर नाही त्यामुळे ते सोडून भाजपामध्ये उद्या दस्तुरखुद्द प्रतिभा पवार जरी आल्या तरी त्यांना लाल कार्पेट अंथरून स्वागत केले जाईल. शरद पवारांवर सर्वाधिक डिस्टरब आहेत, मनातून मनापासून खवळून चिडून संतापून आहेत श्री छगन भुजबळ. मी लुटले मी खाल्ले हे ते खाजगीत मान्य करतात पण मी एकट्यानेच खाल्ले का, राष्ट्रवादजींचे पवारांचे अवाढव्य आर्थिक गणित आम्ही कसे सांभाळले ते हेमंत टकले यांना विश्वासात घेऊन विचारावे, हादरवून सोडणारे असेल पण बरबाद तेही आम्ही सत्तेत असतांना आम्हालाच करण्यात आले, थेट तुरुंगात धाडले. मी यादी ती देखील पुराव्यांसहित देतो त्यांना का हो तुरुंगात टाकलेले नाही, त्यामुळे पवार गेले उडत, मला हिरवी झेंडी दाखविल्या गेली कि मी नक्की बाहेर पडतो आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी व्यथित होऊन भुजबळ म्हणे डोळ्यात पाणी आणून सांगून मोकळे होतात, दुःख व्यक्त करून मोकळे होतात…


तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *