पुन्हा एकवार फक्त आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी

पुन्हा एकवार फक्त आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी 

मी ज्या सांताक्रूझ पश्चिम परिसरात राहतो, आमदार म्हणून आत्तापर्यंत नामदार आशिष शेलार प्रतिनिधीत्व करीत होते, या विधानसभेलाही ते पुन्हा एकदा येथे निवडून येतील आणि पुन्हा एकदा मंत्रीही होतील, हे आमच्या विधानसभा मतदार संघातले शेम्बडे पोर देखील सांगेल. आशिष नामदार झाल्यानंतर आणि आमदार होते तेव्हाही ते साऱ्या मतदारांच्या कायम टच मध्ये असायचे. आशिष शेलार हे कधीही एखाद्या निष्णात जादूगारासारखे वागले नाहीत आणि वागणारही नाहीत, कि विधानसभा आली म्हणजे मतदारांना भेटायचे दिसायचे हसायचे बोलायचे निवडणूक संपली कि गायब व्हायचे पुन्हा पाच वर्षेनंतर भेटण्यासाठी. त्यांना हे असे मतदारांपासून लांब पळणे घरी बसून दाराची काडी लावून शांत झोपायचे, नो, ना त्यांना कधी जमले म्हणजे अगदी विद्यार्थी परिषदेचे नेते होते तेव्हापासून किंवा आत्ता आत्ता मंत्री झाले तेव्हाही…


राज्यातल्या बहुतेक बहुसंख्य आमदारांच्या कामाची पद्धत मी बघत असतो असे बोटावर मोजण्याएवढे आमदार असतात ज्याच्या मतदारसंघात त्यांना तगडा, प्रभावी चर्चेतला विरोधक नसतो किंवा स्पर्धक नसतो त्यामुळे अमुक एखादे आमदार मतदारांना भेटले किंवा दिसले नाही तर मतदार थेट त्यांना जो आमदाराऐवजी पर्याय उपलब्ध असतो ते त्याच्याकडे जातात म्हणजे जळगाव जिल्ह्यात मतदारांना सुरेशदादा जैन उपलब्ध झाले नाहीत कि ते थेट एकनाथ खडसे यांना गाठायचे भेटायचे आणि अडलेले काम पूर्ण करून मोकळे व्हायचे. पुढे पुढे त्यांना कामाच्या व्यापात अडकलेले एकनाथ खडसे जेव्हा एखाद्यावेळी भेटायचे नाहीत आणि सुरेशदादा जैन तर तुरुंगात होते मग हे जिल्ह्यातले सारे जेव्हा केव्हा त्यांचे अमुक एखादे काम अडकले कि थेट गिरीश महाजन यांना गाठायचे भेटायचे पुढे मतदारांच्या जिल्ह्यातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहिल्याने घडले असे कि सुरेशदादा संपले एकनाथ खडसे मागे पडले आणि गिरीश महाजन झपाट्याने एवढे पुढे गेले कि आज या राज्यातले महत्वाच्या रांगेतले एक घटक आहेत…


www.vikrantjoshi.com

विषयांतर झाले, येथे आज मन त्या आशिष शेलार यांच्याविषयी मोकळे करायचे आहे, ज्या भावना गेली पाच वर्षे मनात दाटून ठेवल्या होत्या त्याच तुम्हाला येथे सांगायच्या आहेत. तर, आशिष शेलार हे आमच्या मतदार संघातले असे एकमेव नेते आहेत कि त्यांना आमच्या या बांद्रा पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोणीही स्पर्धक नाही, एखादा तगडा विरोधक त्यांच्यासमोर तयार झाला नाही. कधीकाळी त्या बाबा सिद्दकीला काही मतदार भेटायचे पण तेथे त्याच्याकडे जेव्हा बिल्डर लॉबी पडीक असते किंवा आमच्या विधानसभा मतदारसंघात बाबा सिद्दीकी जेव्हा विशिष्ट समाजाचे तेवढे थोडेफार भले करतांना दिसायचे, लोकांनी बाबा सिद्दीकी यांचा नाद कायमसाठी सोडला, या तरुण तडफदार नेतृत्वाला कायम साथ देण्याचे ठरविले. यापुढे केवळ आशिष शेलार हेच आमचे प्रतिनिधी असतील, आमदार असतील ही मतदारांनी मनाशी शपथ घेऊन ठेवलेली आहे….


यावेळी नाही म्हणायला आशिष शेलार यांच्यासमोर बाबा सिद्दीकी यांचे त्यांच्याच पद्धतीने वागणारे चिरंजीव निवडणूक लढविणार आहेत पण मतदारांशी कवडीचाहीसंबंध नसलेले झिशान म्हणजे आमच्या परिसरात एकदम वरच्या वर्तुळात रमलेले उमेदवार, त्यांनी त्यांचे डिपॉझिट जरी वाचविले तरी आम्ही काही मतदार त्या डिपॉझिट वाचवण्यावर सत्यनारायणाची पूजा घालून मोकळे होणार आहोत. थोडक्यात आमच्या या मतदार संघात आशिष शेलार यांच्यासमोर तगडे आव्हान अजिबात कोणाचेही नाही, अमुक एखाद्याकडे शेलारांचा प्रतिस्पर्धी म्हणून बघावे असे कोणी तयार झाले नाही किंवा नजीकच्या भविष्यात त्यांना पर्याय ठरेल असे दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नाही. म्हणून जेव्हा केव्हा मतदारांचे नागरिकांचे लोकांचे व्यक्तिगत किंवा अन्य सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न सोडवायचे असतात, हे सुद्न्य मतदार फक्त आणि फक्त आशिष शेलार यांना जाऊन भेटतात त्यांना अन्य इतर कोणालाही भेटायचे गाठायचे नसते.त्यांना फक्त आणि फक्त आशिष शेलार यांच्या कडूनच काम करवून घ्यायचे असते…


अत्यंत महत्वाचे म्हणजे अमुक एखाद्या मतदाराने तमुक एखादे काम आणले कि काम आणणाऱ्यालाच अंधारात ठेवून त्याच्या कामावर स्वतः डल्ला मारून दरोडा घालून मोकळे व्हायचे हा आधीच्या आमदाराकडून आलेला जो आम्हाला अत्यंत वाईट अनुभव होता, असे कर्नाऱ्यातले, हलकट स्वार्थी वागण्यातले आशिष शेलार अजिबात नसल्याने प्रश्न मग ते कोणत्याही स्वरूपाचे असोत, मतदार शेलारांकडे बिनधास्त बिनदिक्कतपणे आपले काम सांगून, मन मोकळे करून मोकळे होतात. शेलार यांच्या सभोवताली सतत जसा मराठी मतदारांचा गराडा पडलेला असतो त्याच विश्वासाने त्यांच्याकडे आमच्या या परिसरातल्या बहुसंख्य ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांचा देखील कायम ओढा असतो. असे कधीही झाले नाही कि शेलार यांना भेटायला गेल्यानंतर मोठ्या संख्यने त्यांच्याकडे ख्रिश्चन किंवा मुस्लिम मतदार देखील गर्दी करून बसलेले नाहीत. हे असे मी माहीम परिसरात आमदार असतांना सुरेश गंभीर यांच्याबाबतीत बघितले आहे म्हणजे त्यांच्यासभोवताली जी मुस्लिम मतदारांची गर्दी जमायची, बघणारे चकित व्हायचे. हे असे शेलारांकडे गेले भेटले कि बघायला मिळते, तेथे कोणताही भेदभाव न करता समान न्याय देतांना, आम्हा सर्वांसाठी धावून जातांना आशिष शेलार यांना बघितलेले आहे…

क्रमश: हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *