नाराज हिंदू निराश मराठी : पत्रकार हेमंत जोशी


नाराज हिंदू निराश मराठी : पत्रकार हेमंत जोशी 

एक गाय असते ती आपल्या गोठ्यात सुखाने रहात असते. एक दिवस खूप जोराचा पाऊस आला आणि एक कुत्रा रात्रीच्या वेळी भिजत भिजत गोठ्यात आला आणि गाईला म्हणाला, गोमाते, मी तुझ्या गोठ्यात थोडावेळ आश्रय घेऊ का ? एका कोपऱ्यात मी पडून राहीन. दया येऊन गायीने त्याला अनुमती दिली. काही वेळाने तेथे एक साप आला बहुदा तो पावसात खूपवेळा भिजला होता सारखा वळवळ करीत होता. तो आसरा मागण्यासाठी गायीची परवानगी मागणार तेवढ्यात म्हणजे गायीने काही बोलण्या अगोदर कुत्रा मधेच म्हणाला, तू पण ये ना, गोठ्यात भरपूर जागा आहे. वास्तविक हे ऐकून गायीला खूप राग आला होता पण स्वभाव शांत त्यामुळे ती गप बसली. त्यानंतर तिथे हळूहळू विंचू आला, डुक्कर आणि गाढव तर एकाचवेळी आश्रयाला आले. भरीस भर माकड देखील सामील झाले. चित्रविचित्र प्राण्यांची खिचडी, गिचडी, गर्दी वास्तविक सगळ्यांनाच त्रास होऊ लागला. आपण गायीला नेहमीच बिच्चारी गरीब गाय म्हणतो, त्यामुळे आपल्याच गोठ्यात तिला त्रास होत असतांनाही ती गप्प होती, शांत बसली. पुढे काय होते, एका रात्री सगळे नकारात्मक विचारांचे हे शरणार्थी जनावरे एकत्र येऊन विचार करतात कि, सगळ्यात जास्त जागा गायीला लागते, आपण या गायीलाच गोठ्याबाहेर काढले तर ? आणि ते सर्वजण एकत्र येऊन मग गायीला तिच्या स्वतःच्या मालकीच्या गोठ्याबाहेर काढतात, निर्वासित करून सोडतात. मित्रहो, काही वर्षांनी आपल्या या देशात विशेषतः आपल्या या मुंबईत आपल्या या राज्यात समस्त हिंदूंची समस्त मराठी जनतेची अवस्था त्या गायीप्रमाणे झालेली असेल, वेळ निघून गेलेली असेल…

ज्यांना अक्कल आहे असे बहुसंख्य हिंदू म्हणजे मराठी मतदार या राज्यात आहेत त्यांना नेमकी हीच चिंता खूप भेडसावते आहे. आपलेच नेते कपाळकरंटे, त्यातून हे झपाट्याने घडते आहे, काळजी करण्याचे काळजी घेण्याचे समस्त नेत्यांचे वागणे आहे. ते भाजपावाले सभागृहात १०५ असून सत्ताधाऱयांसमोर शांत आहेत हतबल ठरलेले आहेत आणि ज्यांच्याकडून मराठी मतदारांची मोठी अपेक्षा होती अपेक्षा आहे ते समस्त मराठींचे तारणहार सरदार हिम्मतवार उद्धव ठाकरे जे नेते पाक धार्जिण्यांचे आजतागायत पालनहार तारणहार म्हणून गाजले तसेच  नावाजले आहेत त्यांच्या हातात हात घालून सत्तेची फळे चाखताहेत. सेनेला भाजपाने समजून घेतले नाही मागल्या पाच वर्षात सतत उल्लू बनविले चुत्या बनविले त्यातून शिवसेना विशेषतः सरदार

कप्तान उद्धव ठाकरेच भाजपापासून चिडून जाऊन आणि वैतागून दूर गेले ते भाजपावाले आता हात चोळत बसले आहेत आणि पसंत नसलेल्या तरुणाच्या गळ्यात वरमाला घालून इच्छा नसतांना इच्छा होत नसतांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर संसार थाटून मोकळी झाली आहे. खरा धोका पुढे आहे, तुम्हाला माहित आहे काय, अलीकडे डोळे दिपविणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तोही मुंबईकर कार्यकर्त्यांचा जो भव्य दिव्य मेळावा पार पडला त्याचे आयोजन नियोजन कोणी केले होते, नसेल माहित तर सांगतो, त्याचे अत्यंत यशस्वी नियोजन आयोजन पार पाडले  मंत्री आणि मुस्लिमांचे वादग्रस्त मुस्लिमांचे प्रभावी नेते नवाब मलिक आणि त्यांच्या अनेक असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांनी…


www.vikrantjoshi.com

शरद पवार यांना दोष देऊन अजिबात फायद्याचे आणि उपयोगाचे ठरणारे नाही त्यांची ती सत्ता मिळविण्यासाठी अगदी सुरुवातीपासूनची पद्धती आहे कि जे जिल्ह्या जिल्ह्यात सुरेशदादा जैन किंवा गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासारखे फोड झोड आणि सत्ता मिळवा पद्धतीचे नेते आहेत ते एकत्र करायचे, गोळा करायचे आणि सत्ता मिळवायची, जे सुरुवातीला या राज्यात त्यांनी म्हणजे पवारांनी काँग्रेससंगे केले तीच नीती शरदरावांनी यावेळी देखील अवलंबिली आहे ज्याचा त्यांना त्यांच्या पक्षाला या मुंबईत या राज्यात झपाट्याने फायदा होतो आहे. उद्या याच शरद पवार यांचा चॉईस महत्वाचा नक्की ठरणार आहे कि नेमके कोणाला सोबत घ्यायचे आणि सत्तेत रमायचे अशावेळी ते प्रसंगी शिवसेनेला बाजूला सारून स्थान भाजपाला देखील देऊ शकतात. उद्धवजी, आम्ही मराठी या राज्यातले आम्ही तमाम हिंदू आई शपथ सांगतो, अक्षरश: नैराश्याकडे झपाट्याने वाटचाल

करू लागलो आहे आमच्या गोठ्यात आमच्या या मुंबईत आमच्या या राज्यात आम्हीच गरीब गाय म्हणून जगणार आहोत कि काय मनापासून प्रत्येकाला वाटते आहे, हे चित्र बरे नव्हे. शरद पवार यांनी नेमकी नस पकडलेली आहे त्यांना हे कळून चुकले आहे कि राज्यातला मुस्लिम त्यांच्यावर खुश आहे आणि इतर साऱ्यांवर नाराज आहे नेमका हाच धागा पकडून पवारांनी त्यांना जवळ घेतले आहे, मजीद मेमन यांच्यानंतर याच पवारांनी पुन्हा एकवार स्वसंगतीने मुस्लिमाला राज्यसभेत नेण्याचे ठरविलेले आहे, फौजिया खान हे ते नाव आहे. हसन मुश्रीफ, नवाब मलिक, श्रीमती फौजिया खान, मजीद मेमन असे प्रभावी मुस्लिम नेते त्यांचे  समर्थक आहेत, काळ झपाट्याने बदलतो आहे. आमची गरीब गाय होते आहे. पवारांचा त्यात अजिबात दोष नाही चूक हिंदुत्व मानणाऱ्या नेत्यांची होते आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *