मीडिया : महाभयानक वास्तव : पत्रकार हेमंत जोशी

मीडिया : महाभयानक वास्तव : पत्रकार हेमंत जोशी 

मीडिया मग ती प्रिंट मीडिया असेल विविध भाषांमध्ये बातम्या देणाऱ्या वाहिन्या असतील किंवा इतर मीडिया, अलिकडल्या काही वर्षात सारीच मीडिया स्वतःला नेता किंवा लोकप्रतिनिधी समजायला लागलेली आहे कारण आम्हा मीडियाकडे जे शासन असते राज्यकर्ते असतात ज्यांच्या हाती सत्ता असते जे राजकारणात असतात जे सत्तेत बसतात असतात त्यांची प्रचंड नको ती माहिती उपलब्ध होत असल्याने हे सारे नको तेवढे मीडियाला घाबरून असतात नेमका त्यांच्या घाबरण्याचा मोठा गैरफायदा उचलतांना साऱ्याच प्रकारातली मीडिया दिसते आहे, धजावते आहे. आपण पारदर्शी असल्यास मीडियाला घाबरण्याचे काही कारण नसते जसे आजतागायत मी राज्यातल्या मीडियामध्ये जे हरामखोर आहेत नीच हलकट बदनाम बदमाश आहेत अशांच्या कितीतरी वेळा विरोधात लिहिले असेल त्यांच्यावर जहरी टीका तर पदोपदी क्षणोक्षणी मी करत आलो आहे कारण मी आमच्या मीडिया क्षेत्रात कायम माझ्या गुण दोषांसहित सामोरा गेलो आहे जातो आहे किंबहुना माझे दुःख माझ्या अडचणी माझ्या बऱ्या वाईट सवयी माझे यश माझे अपयश माझ्या भानगडी मी कायम सार्वजनिक केलेल्या आहेत त्यामुळे मला आमच्यातल्या रंडीछाप मीडिया मंडळींची ना कधी भीती वाटली ना कधी यापुढे देखील वाटेल पण शासनात सत्तेत राजकारणात काम करणाऱ्यांचे असे नसते त्यांचा जवळपास साऱ्यांचाच चेहरा आणि मुखवटा वेगळा असतो त्यांना तो तसाच वेगवेगळा ठेवायचा असल्याने या मंडळींना मीडियाची जबरदस्त भीती असते भीती वाटते नेमका त्यांच्या या घाबरण्याचा मोठा गैरफायदा आम्ही मीडिया क्षेत्रात काम करणारे किंवा मीडिया मालक घेत आले आहेत,  पुढेही हे असेच त्यांचे घाबरणे सुरु राहिले तर आणखी आणखी गैरफायदा घेणारच आहोत, दरदिवशी आमच्यातले महाबदमाश राजदीप सरदेसाई असेच जन्माला येणार आहेत… 

अलीकडे अनेकांनी पाठवलेला एक किस्सा येथे सांगतो. एका गाढवाला एका झाडाला बांधलेले होते. एका रात्री एका भुताने दोरी कापून त्या गाढवाला सोडले. गाढवच ते, त्याने जाऊन मग एका शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकऱ्याच्या मालकाच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. साहजिकच गाढवाचा मालक उध्वस्त झाला, प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला दगडाने ठेचून ठार मारले. पत्नीच्या मृत्यमुळे चिडलेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. त्यावर गाढवाच्या मालकाच्या मुलांना राग आला त्यांनी त्यानंतर शेतकऱ्याच्या घराला आग लावली. शेतकऱ्याच्या मुलांनी मग गाढवाच्या मालकाच्या मुलांना ठार मारले. शेवटी जेव्हा हे सारे बघून त्या शेतकार्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला कि, तुझ्यामुळे सगळे मेले. सांग, तू असे का केलेस ? त्यावर भूत उत्तरले, मी कुणालाही ठार मारलेले नाही मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले. तात्पर्य: आज अख्खी मीडिया आम्ही माध्यमे त्या भुतासारखे झालो आहोत. आम्ही दररोज असे एखादे किंवा अनेक गाढवे सोडतो आणि इतर सारे तुम्ही त्यावर एकतर प्रतिक्रिया देता किंवा एकमेकांशी भांडत बसता, वाद घालता, सारे कुठलाही कसलाही विचार न करता एकमेकांना दुखावतात. एकमेकांपासून दुरावतात. एकच सांगतो, मीडिया माध्यमे मग ती कोणतीही असोत, सोडलेल्या प्रत्येक गाढवावर प्रतिक्रिया न देण्याची, अपसेट न होण्याची जबाबदारी लोकांची, अर्थात तुमची. आपापसात चांगले सलोख्याचे संबंध ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे कारण आम्ही तमाशा घडवून आणतो, त्या भरवशावर पैसे कमावतो… 

आपले साऱ्यांचे नशीब चांगले कि बलवत्तर तो नालायक हरामी राजदीप सरदेसाई रेड हॅन्ड पकडल्या गेला अन्यथा त्याने सोडलेल्या बातमीवर केवढे रणकंदन माजले असते पुन्हा अनेकांचे जीव गेले असते वरून एखादा राजकीय पक्ष विशेषतः भाजपा आणि विविध नेते बदनाम झाले असते. मीडिया म्हणजे नेते नव्हेत, मीडिया म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हेत मीडिया आमदार नसते खासदार नसते केवळ योग्य ती माहिती जनतेसमोर उघड करणे आमचे काम असते, दलाली भडवेगिरी करणे हे मीडिया चे काम नाही. आजकाल मंत्रालय असो कि सरकारी निमसरकारी कार्यालये, महापालिका, लोकप्रतिनिधींपेक्षा मीडियाचा याठिकाणी यासाठी वावर असतो कि आमच्यातल्या बहुसंख्य असंख्य दलालांना मलिद्याची विविध असंख्य कामे करवून घ्यायची असतात, हे घडता कामा नये, मीडियाला उठसुठ घाबरणे योग्य नाही अर्थात काम करून देणारा स्वतः भानगडी करणारा नसावा पण असे सत्तेच्या बाजारात क्वचित खचित घडत असल्याने जो तो मीडियाला भयंकर घाबरतो त्यातून मीडियातले रंडीछाप दलाल कित्येक पटीने पैसे कमावून मोकळे होतात. असल्या फाल्तुक मीडियावर जरब बसवण्याची वाचक बसवण्याची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. मीडियाचे महत्व त्यातून मीडियाचा देशातील राज्यातील प्रत्येक मोठ्या माणसाशी प्रत्यक्ष संबंध येणे स्वाभाविक आहे असते, नेमका या ओळखीचा सलगीचा गैरफायदा मीडिया मोठ्या प्रमाणावर उचलतांना दिसते आहे जे अत्यंत घातक आहे… 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *