उडता महाराष्ट्र : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी

उडता महाराष्ट्र : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

हिंदी सिरियल्स मी आजतागायत कधीही बघितलेल्या नाहीत आणि मराठी फारतर दोन तीन बघितल्या असतील. अगबाई सासूबाई यासाठी बघायला सुरुवात केली होती कि त्यात माझ्या परिचयाचे आमच्या विदर्भातले गिरीश ओक आहेत आणि माझी एकेकाळची अतिशय जिवलग मैत्रीण निवेदिता जोशी पण आहे. मालिके मध्ये गिरीश ओक प्रौढ विवाहित दाखवले आहेत किंवा ते प्रौढ आहेत यात काही चुकीचे नाही पण त्यांनी डोक्याचे केस रंगवून काळे दाखवले असते तर गिरीश म्हातारे आणि किळसवाणे दिसले नसते तसेही शेफ किळसवाणा असता दिसता कामा नये. विशेषतः कोरोना मध्ये बंद पडलेली हि सिरीयल पुन्हा सुरु केल्यानंतर मराठी कुटुंबात न घडणारे प्रसंग या मालिकेत या सिरीयल मध्ये दाखवून निर्माते आणि दिग्दर्शक या सिरीयलची वाढलेली लोकप्रियता झपाट्याने घालवून बसले आहेत. एक चिप मालिका असे निदान आज तरी या मालिकेचे वर्णन करता येईल. अशाने फार मोठे नुकसान होते ते त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे, दर्शकांना अशा चिप थर्ड ग्रेड थर्ड क्लास मालिका बघतांना त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा राग येत असतो अशावेळी त्यांना लेखक दिग्दर्शक निर्माते आठवत नसतात… अशोक पत्की यांचा मुलगा, तेजश्री प्रधान, गिरीश ओक आणि निवेदिता यांना या अशा दर्जाहीन मालिकांमधून काम करताना अभिनय करतांना नक्की फटका बसू शकतो किंवा बसेलही. एवढे अक्कलशून्य प्रसंग कसे दाखवू शकतात याचे राहून राहून आश्चर्य आणि वाईटही वाटते. वास्तवात गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांनी त्यांच्या असामान्य कुवतीनुसार जरी त्यात बदल सुचवले असते तरी मालिका बघणे दर्शकांना सुसह्य झाले असते. माफ करा, येथे विषय उडता महाराष्ट्र म्हणजे व्यसनी महाराष्ट्र असा असतांना मी भलतीकडेच वळलो म्हणजे हे तर असे झाले कि सिनेमा बघतांना अंधारात बायको ऐवजी भलत्याच बाईच्या खांदयावर हात ठेवला किंवा माझा टी शर्ट शेजारच्या भाभींना देऊन त्यांचे ब्लाउज घालून मी बाजारात गेलो. वाचकहो, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये म्हणजे या हिंदी सिनेमावाल्यांचे काय वाटोळे व्हायचे असेल ते आणखी होवो पण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि अमराठी व काही देशद्रोही हिंदुतर हरामखोरांच्या वाईट सवयींना बळी पडून आम्हा नवश्रीमंत मराठी कुटुंबे जे अख्खेच्या अख्खे बरबाद होताहेत, ते घडता कामा नये. वाईट त्याचे वाटते. 

यात त्या रिया चक्रवर्ती पेक्षा अधिक राग सुप्रसिद्ध कायदेतद्न्य मराठी सतीश मानशिंदे यांचा येतो कि ज्यांनी आधी देशद्रोही सलमान खान आणि बॉम्ब स्फोट मालिकेत मराठी माणसांचा बळी घेणाऱ्या संजय दत्त या मुसलमानांना वाचवले, आता ते पुन्हा एकवार अशाच काही देशद्रोह्यांना वाचवायला निघाले आहेत. आमच्याशी ज्यांचे अनेकदा सतत मित्र म्हणून बोलणे होते ते सांगतील कि सुशांत सिंग प्रकरण बाहेर पडल्या पाडल्या दिशा आणि सुशांत यांची हि आत्महत्या नसून हत्या आहे हे कसे घडले मी मित्रांना जसेच्या तसे सांगत होतो आणखी डिटेल हे कसे केव्हा घडले ऐकायचे असेल तर या प्रकरणी अतिशय व्यथित अस्वस्थ निराश झालेल्या पार्थ अजित पवार किंवा नितेश नारायण राणे यांना विचारावे विशेष म्हणजे नितेश तर जाहीर म्हणाले आहेत कि मला सीबीआय ने बोलवावे मी प्रकरण कसे घडले आणि कोणी कोणी घडवून जसेच्या तसे सांगू शकतो. अर्थात या अशा अस्वस्थतेतूनच पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती कारण मुंबई पोलीस काहीही करणार नाहीत हे पार्थ यांना आधीच कळले होते…. 

विशेष म्हणजे जेव्हा बिहार पोलीस रिया चक्रवर्तीची चौकशी करायला मुंबईत येऊन धडकले थडकले होते तेव्हा हीच रिया थेट अर्पिताच्या घरी राहायला गेली होती मला वाटते अद्याप हे अर्णब किंवा सीबीआयला कळलेले दिसत नाही, एखाद्याने त्यांच्या कानावर घालायला हरकत नाही. सतीशजी, एखाद्या हिंदी सिनेमा सारखे उद्या तुमचे देखील होऊ शकते त्यात कसे खलनायकाची गोळी चुकून पोटच्या मुलालाच लागते म्हणजे ज्या क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही वाचवताहात उद्या हीच माणसे ती व्यसने तुमच्या कुटुंबाला लावून मोकळी झालीत तर, नका घेऊ या नालायक देशद्रोह्यांचे वकीलपत्र आणि वाचवू नका या नालायकांना. रिया चक्रवर्ती माझ्या घरापासून केवळ तीन मिनिटांच्या अंतरावर राहते तिच्या शेजारच्या कंपाउंड मध्ये सुरेश वाडकर राहतात तर तिच्या इमारती समोर शाहरुख खानच्या पत्नीचे म्हणजे गौरीचे भव्य कार्यालय आहे किंवा सलमान खान संजय दत्त अशा नालायकांची किंवा विधू विनोद चोप्रा, अनिल कपूर यांची कार्यालये तर माझ्या गल्लीत आहेत त्यामुळे सतत या लोकांची आमच्या इमारतीच्या आसपास वर्दळ असते पण या अशा महाराष्ट्राला मुंबईला मराठी माणसाला बरबाद करणाऱ्यांकडे बघावेसे देखील वाटत नाही. वर जे म्हणालो ते रिपीट करतो कि म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण मुंबई पोलीस आणि सध्याचे महाआघाडी सरकार मधले काही केवळ लोभापायी पैशांच्या हव्यासापोटी बदनाम झाले आहे आणखी आणखी होते आहे त्याचे वाईट वाटते. ड्रग्स सारख्या पिढीच्या पिढी बरबाद करणाऱ्या मंडळींना जे मदत करताहेत पाठीशी घालताहेत त्यांच्याच घरात उद्या हेच ड्रग्स नक्की घुसणार आहेत किंवा यापूर्वीच त्यांना मदत केल्याने घुसले आहेत थोडक्यात तुम्हा साऱ्यांची देखील अवस्था हिंदी सिनेमातल्या खलनायकांसारखी होते आहे  म्हणजे तुम्ही आपल्याच हातांनी आपल्या कुटुंबाला पुढल्या पिढीला बंदुकीच्या गोळ्या घालताहात हे नक्की लक्षात घ्या… 

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *