नो राष्ट्रहित मुतून हागुन ठेवले चड्डीत : पत्रकार हेमंत जोशी

नो राष्ट्रहित मुतून हागुन ठेवले चड्डीत : पत्रकार हेमंत जोशी 

पैसा खा वाट्टेल ते धंदे करून मोकळे व्हा पण किमान काही वेळ काही प्रमाणात तर देशसेवा करा राष्ट्रप्रेम ठेवा या राष्ट्राचे भले करण्याचे स्वप्न बघा पण राज्यातल्या ज्यांच्या हाती कळत नकळत सत्ता आहे त्यांच्या असे काहीही अजिबात मनात नसते, राष्ट्रसेवा राष्ट्राचे भले करणे गेले चुलीत हे असेच ज्याच्या त्याच्या मनात असते, आधी माझे व माझ्या कुटुंबाचे भले त्यानंतर काही उरलेच तर राष्ट्राचे, असेच जो तो करतो आहे आणि याच राष्ट्र प्रेमाच्या पोट तिडकीतून, मोदी व शाह पुढे किमान दहा वर्षे तरी जागावेत सत्तेत असावेत असे वाटत राहते. देवेंद्र व पृथ्वीराज या राज्यात मुख्यमंत्री म्हणून नवीन होते अन्यथा जसे शंकारराव चव्हाणांच्या मनात राष्ट्रप्रेम ओसंडून वाहायचे तेच या दोघांचे मुख्यमंत्री म्हणून वागणे होते, मला खात्री आहे यापुढे पुन्हा जेव्हा केव्हा हे दोघे सत्तेत येतील असतील मागच्या चुका पुढे न करता ते हे राज्य चांगले घडविण्याचा नक्की प्रयत्न करतील. देवेंद्र व पृथ्वीराज या दोघांच्या चुका कोणत्या, असे जर मला कोणी विचारले तर हेच सांगेन किंवा त्यांनाही तोंडावर सांगेन कि देवेंद्र यांनी काही चुकीची माणसे नको तेवढ्या जवळ केली आणि पृथ्वीराज यांनी नेमके देवेंद्र यांच्या उलट केले, ते अतिशय माणूसघाणे होते, या दोघांनीही व्यवस्थित माणसे निवडून जवळ बाळगणे खूपच गरजेचे होते पण दोघांच्याही राष्ट्र व राज्य प्रेमाला तोड नाही, हे सारे येथे आठवले ईडी चौकशा सुरु झाल्याने… 

माझी माहिती अशी कि आमदार प्रताप सरनाईक किंवा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी किंवा एकनाथ खडसे हि तर सुरुवात आहे किंवा ईडी चौकशांचा हा तर पाया आहे खरी मजा पुढे येणार आहे जेव्हा ईडी चौकशांचा कळस रचल्या जाईल, केंद्रात सत्तेत असलेले सरकार हळूहळू का होईना कोणालाही शंभर टक्के सोडणार नाही प्रसंगी या राज्यातल्या काही अति करप्ट भाजपा नेत्यांना देखील ते सोडणार नाही आणि माझे हे सांगणे खोटे असेल तर नितीन गडकरी यांना विश्वासात घ्या, मी म्हणतो ते कसे खरे आहे ते स्वतःचे उदाहरण देऊन सांगतील. ज्या नितीन गडकरी यांच्या मनात जसे काही प्रमाणात का होईना आधी राष्ट्रप्रेम नंतर पैसे मिळविणे हे असे असते त्यांना जेथे जोडगळीने सोडलेले नाही अर्थ हाच कि प्रसंगी ते आपल्याच पक्षातल्या नेत्यांना किंवा अन्य कोणालाही सोडणार नाहीत सोडत नाहीत. उद्धवजींच्या मंत्री मंडळात एक अत्यंत महत्वाचे खाते सांभाळणारे मंत्री तर असे आहेत कि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फारतर चार दोन वेळा सोडले तर स्वतःच्या मतदार संघाचे तोंड देखील बघितले नाही, मुलांना त्यांनी सांगून ठेवले आहे, तुम्हीच आमदार आहेत पद्धतीने मतदार संघाकडे लक्ष द्या इकडे दिवसरात्र मला पैसे जमा करू द्या उरल्या वेळेत तुम्हीही अय्याशी करा मी पण तरच करतो. मोदी शाह देवाच्या कृपेने जगले वाचले तर या राज्यातल्या बदमाशांचे नक्की काहीही खरे नाही, मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे… 

आयकर खाते किंवा ईडी सारख्या महत्वाच्या खात्यातील प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे, कोणाकडे किती व कसे साचले त्यावर तंतोतंत माहिती घेण्याचे महत्वाचे काम सोपविण्यात आलेले आहे, असे नाही कि, अमुक एक नेता त्रास देतो का मग लावा त्याच्या मागे ससेमिरा, असे अजिबात नाही, सरनाईक राऊत खडसे हा केवळ योगायोग आहे पण ज्यांनी फक्त आणि फक्त सरकारी तिजोरीवर दरोडे घालून हवे तेवढे पैसे मिळविले आहेत मग ते मीडियावाले असोत वा अधिकारी, दलाल असोत वा व्यापारी, नेते असोत वा आजी माजी मंत्री, इत्यादी टॉपच्या भ्रष्ट मंडळींची या चौकशा करणाऱ्यांनी यादी तयार केली त्यानंतर त्यांची आर्थिक माहिती केव्हाच गोळा करणे सुरु झालेले आहे, एकही बदमाश त्यातून सुटणार नाही मग असे बदमाश कोणत्याही पक्षाचे अथवा विचारांचे असलेत तरी. राज्याच्या हिताकडे कोणाचेही अजिबात अजिबात लक्ष नसते, सत्तेत मग ते कोणीही आले तरी त्यांना आधी स्वसाठीच ओरबाडून खायचे असते म्हणून मध्यांतरी मी मोहन भागवत यांनाही याठिकाणी तेच म्हणालो होतो कि अमुक एखादा जोपर्यंत संघ स्वयंसेवक असतो त्याच्यात राष्ट्रप्रेम ओतप्रोत भरलेले असते पण तोच स्वयंसेवक जेव्हा सत्तेत येतो त्याच्यातला देवेंद्र फडणवीस नाहीसा होऊन तो थेट प्रमोद महाजन होण्या खात सुटतो आणि हे तुमचे मोठे अपयश आहे. बघूया, भागवत पुढे राजकारणात शिरणाऱ्या स्वयंसेवकाला कसे ताळ्यावर ठेवतात ते. पण का कोण जाणे ज्यापद्धतीने मी सभोवतालचे बदलते वातावरण व राजकारण बघतो आहे, बदल घडणे नक्की अपेक्षित आहे, देवाकडे देखील तेच मागुया… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *