धनंजय मुंडे : पत्रकार हेमंत जोशी

धनंजय मुंडे : पत्रकार हेमंत जोशी 

कुठल्याशा एका पार्टीत एका अधिकाऱ्याने मुद्दाम अगदी समोर येऊन आपल्या देखण्या बायकोशी तावडेंची भेट घालवून दिली.

ओळख करवून देतांना तो म्हणाला, हि माझी बायको…

मी ओळखतो हिला, आमचे एकत्र झोपणे…

अनेकदा पकडल्या गेलो त्यामुळे आमचे 

झालेले अपमान..

कसेतरी तावडेंना थांबवत, काहीशा रागानेच तो 

अधिकारी म्हणाला, काय बोलताय हे..

त्यावर तावडे म्हणाले, हो, जे काय मी म्हणतोय, 

शंभर टक्के सत्य आहे, वाटल्यास तुमच्या सौंना 

विचारा..ती आणि मी एकाच वर्गात होतो आणि 

इतिहासाच्या, गणिताच्या तासाला आम्हाला 

दोघांनाही हमखास डुलकी लागायची..

वाचक मित्रहो, मराठीतले शब्द हे असे हलकट असतात, विशेषतः द्विअर्थी शब्द तर अतिशय जपून वापरायचे असतात. विशेषतः निदान मराठीत शिकविणाऱ्या शिक्षकांनी शुद्ध मराठीत बोलणे, त्यांच्याकडून अपेक्षित असते, पण ते फार कमी शाळांमधून घडते, शिक्षकच अशुद्ध बोलायला लागले तर विद्यार्थ्यांकडून शुद्ध मराठीतून बोलण्याची अपेक्षा देखील ठेवणे चुकीचे. जसे लहान मुलांना तोतरे बोलायला आपणच शिकवतो असे माझे मत आहे कारण आपण त्यांच्याशी लाडाने तोतऱ्या शब्दात बोलतो, आणि त्यांनी मात्र तोतरे बोलू नये, अपेक्षा ठेवतो…नियम्स, अचानकली असे चुकीचे इंग्रजाळलेले शब्द वापरणारे देखील आम्हीच किंवा पिवळा पितांबर, मुलींची कन्याशाळा, केसांची हेअरस्टाईल, गाईचे गोमूत्र, राईटला उजवीकडे, थंडा कोल्डड्रिंक, गरम हिट बाहेर पडते, वटवृक्षाच्या झाडाखाली, त्याच्याखाली अंडरलाईन, संडेच्या दिवशी, रायटिंगमध्ये लिहून द्या, सरळ स्ट्रेट जा, गोल सर्कलच्या बाजूची इमारत, शेवटी एन्ड मस्त केलाय…इत्यादी कितीतरी हमखास चुकीचे शब्द वापरणारे, भले भले म्हणजे स्वतःला मराठीप्रभू, भाषाप्रभू समजणारे…एकदा का आपल्या शिक्षकांनीच मातीची फक्की तोंडात टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी का म्हणून तोंडात साखरेची फक्की घ्यावी, थोडक्यात जशी खाण तशी माती किंवा जसेजसे शिकविणारे तसे शिकणारे…


नेमक्या विषयाकडे वळतो, धनंजय मुंडे थोडेसे थंड पडले, वरमले, सावध झाले, शांत झाले अलिकडल्या दोन महिन्यात मला ते अनेकदा जाणवले आणि त्यांचे हे असे अचानक सावध पावित्रा घेणे, काहीसे सावध होऊन वागणे व बोलणे निदान मला स्वतःला तरी वाटते तेच योग्य आहे, त्यांनी चार पावले मागे येणे पसंत केले नसते तर नक्की ते त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनाच अडचणीचे ठरले असते. आपल्या नेत्यांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जायचे नसते हे गावकरी, बेधडक, थेट धडक देणार्या, लोकांवर नेता म्हणून अगदी सहज छाप मारणारे धनंजय मुंडे मधल्या काळात हे विसरले होते आणि हरणाच्या वेगाने ज्या पद्धतीने ते पुढे पुढे वेगाने धावत होते तेव्हाच राजकीय बुजुर्गांच्या लक्षात आले होते कि त्यांच्यातल्या बारामतीकर वाघांना, वाघा पुतण्यांना नक्की ते सहन होणारे नव्हते, नाकापेक्षा मोती जड, हि म्हण तेथे त्या बारामतीमध्ये चालत नाही, नेत्याचा हमखास आदिक गोविंदराव होतो, वाघाचा बोका होतो किंवा खली चा थेट प्रमोद हिंदुराव होतो…


जे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत दोन अडीच महिन्यांपूर्वी घडले ते सारे अतिशय पूर्वनियोजित होते हे नक्की आहे म्हणजे मे मध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी धनंजय मुंडे यांनी सुचविलेल्या उमेदवाराने म्हणजे रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेणे त्यानंतर सुरेश धस निवडून येणे हा वरकरणी जरी पंकजा मुंडे यांचा व्यक्तिगत विजय आहे, वाटत असले तरी ते तेवढेसे सत्य नाही, राष्ट्रवादीत, सभागृहात, राज्यात अलीकडे सोलो नेता म्हणून श्री धनंजय मुंडे यांचे वाढलेले महत्व, महत्वाचे कारण होते आणि परळीच्या पोराला डोक्यावर, कडेवर बसवून घेतल्यावर ते थोड्या थोड्यावेळाने आपल्याच खिशात मुतून ठेवते आहे हे बारामतीच्या वाघा काकांना नक्की सहन होणारे नव्हते, नेमके मग तेच घडले म्हणजे वेगाने लयबद्ध धावून प्रजेला आकर्षित करू पाहणाऱ्या धनंजय नामक हरणावर त्या दोघांनी झडप घातली आणि क्षणार्धात धनंजय मुंडे राजकारणातून मागे खेचले गेले, महत्व कमी करण्यात आले…


रमेश कराड यांनी विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज मागे घेणे, तेथे राष्ट्रवादी नव्हे तर धनंजय मुंडे तोंडघशी पडले, फजित झाले, खजील झाले म्हणाल तर अपमानित झाले, महत्वाचे म्हणजे बारामतीकर पुतण्याने म्हणे आपल्या जिवलग मित्राला म्हणजे सुरेश धस यांनाच हाताशी धरून एकाच दगडाने अनेक पक्षी मारले आहेत, पुतण्याची हि अलीकडली अत्यंत यशस्वी ठरलेली आणि स्वतःचे राजकीय महत्व अबाधित ठेवणारी अशी हि खेळी ठरलेली आहे, निदान यापुढे तरी काका पुतण्याच्या पुढे आणि गाढवांच्या मागे जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांना शंभरवेळा विचार करावा लागणार आहे…एकमात्र नक्की स्वर्गीय गोपीनाथजी यांचे कट्टर अनुयायी समजले जाणारे आणि ज्या रमेश कराड यांनी पंकजा मुंडे यांना आपली बहीण मानली आहे, ते आपल्याकडे कसे म्हणून टिकतील, किंवा बिधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादीतून का म्हणून स्वीकारतील, हि एकूणच खेळी त्यांच्या लक्षात अजिबात आली नाही आणि धनंजय यांचे अतिशय योजनाबद्ध पंख छाटण्यात आले, एका हरहुन्नरी नेत्याला त्याच्याच मंडळींनी किंवा नेत्यांनी मोठ्या युक्तीने खालसा केले, यापुढे धनंजय यांना मोठ्या खुबीने पुढे जाणे सोयीचे ठरणार आहे म्हणजे त्यांचा भुजबळ किंवा आदिक होणार नाही, ते पुढे पुढे सरकत जातील पण हे असे बारामतीकर नेत्यांच्या पुढे जाणे किंवा पुढे जाण्याचा नकळत प्रयत्न त्यांच्याकडून होणे नक्की धनंजय यांना तोट्याचेच ठरेल, ते अडचणीत देखील येतील..

तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *