नरेंद्र पुन्हा कल्याणकर : पत्रकार हेमंत जोशी

नरेंद्र पुन्हा कल्याणकर २: पत्रकार हेमंत जोशी 

काहींच्या बाबतीत हमखास अंदाज बांधले जातात पुढे ते खरेही ठरतात. मी दहावीची परीक्षा दिल्यानंतर पास होईल हा अंदाज साऱ्यांना आला होता पण मी प्रथम श्रेणीत पास झालो तर कर्ज काढेल पण हत्तीवरून गावात साखर वाटू वडील मला म्हणाले होते अर्थात त्यांना पुढे कर्ज काढण्याची वेळ आली नाही. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदाही कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून नरेंद्र पवार हेच आमदारकीची निवडणूक लढवतील आणि तेच निवडून येतील हे त्यांच्या मतदारांनी आजच ठरविलेले आहे अगदी पवारांच्या थेट विरोधात सनी लिओनीला जरी उभे केले तरी, लिओनीला उभे केले तर काही चावट मतदारांच्या भलेली तोंडाला पाणी सुटेल पण त्यांचेही हेच ठरलेले असेल कि नरेंद्र पवार यांनाच उभे करायचे आणि निवडूनही आणायचे…


अलीकडे भाजपा संघाच्या मुशीत तयार होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत नेमके कसे वातावरण आहे मला फारसे माहित नाही पण जेव्हा मी विद्यार्थी नेता म्हणून खूप ऍक्टिव्ह होतो तेव्हा आमचे प्रतिस्पर्धी म्हणून मी त्यांच्याकडे बारकाईने बघत असे त्यातून त्यांच्या अनेक पद्धतींचा अभ्यास करणे मला शक्य झाले. राज्याचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विद्यार्थी परिषद या राज्यात उंचीवर नेण्यात फार मोठे योगदान आहे किंबहुना संघटना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कशी बांधावी उभी 

करावी पुढे न्यावी हे जेवढे चंद्रकांतदादा यांना पाठ आहे मला नाही वाटत अलीकडच्या काळात संघटना पक्ष बंधू शकणारा असा त्यांच्या तोडीचा नेता भाजपा काय अन्यत्रही असेल, आढळेल…


www.vikrantjoshi.com


चंद्रकांत पाटलांना जेव्हा भाजपाने प्रदेशाध्यक्ष केले तेव्हा वरकरणी साधे बावळे वेंधळे दिसणारे चंद्रकांत, अनेक त्यांची थट्टा करून मोकळे झाले. पण मी सांगतो चंद्रकांत हे त्यांच्या पक्षातले आजवरचे सर्वाधिक यशस्वी प्रदेशाध्यक्ष ठरतील, भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवतील. पाटलांना अध्यक्ष करणे म्हणजे त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी उद्या देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावून घेतल्यानंतर या राज्याचा पुढला मुख्यमंत्री कोण असेल, त्यावर उत्तर दिलेले आहे आणि तेच सत्य आहे फक्त पाटलांनी व्यवहारात फियास्को करवून घेऊ नये, चांगली माणसे सतत सभोवताली ठेवावीत. नरेंद्र पवार, विनोद तावडे, आशिष शेलार, जळगावचे भरत अमळकर, वर्षा विनोद तावडे असे शेकडो विद्यार्थी दशेपासून भावी नेते म्हणून जे तयार झालेत त्यांना वाढविण्यात घडविण्यात ज्या चंद्रकांत पाटलांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना भाजपा पुढे नेण्यात अपयश येईल, अजिबात शक्य नाही…


मीच माझे सहकारी शिवसेनेत किंवा भाजपा मध्ये पाठवतो आहे अशी जी शरद पवार यांच्या गटातून कायम पुडी सोडल्या जाते त्याला अजिबात अर्थ नाही, अर्थ नसतो. हे पवारांचे पाप आहे म्हणून त्यांना त्यांच्यासमोरच अपयश येते आहे, अपयश आले आहे. चंद्रकांत पाटलांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगतो ते असे कि फडणवीसांचा ज्युनियर असूनही ते कधीही अपमान करीत नाहीत पण अमुक एखादा मुद्दा रुचला पटला नाही तर तो खोडून काढण्याची ते हिम्मत ठेवतात पण त्याचवेळी फडणवीस एक नेते व मुख्यमंत्री म्हणून अपमानित होणार नाहीत याचीही ते काळजी घेतात पण प्रसंगी त्यांना जे हवे असते ते मनासारखे करवून घेतात म्हणून चंद्रकांत पाटील हे फडणवीसांची म्हणाल तर असेट आहेत, आधारस्तंभही आहेत. नेमके हे असे एकनाथ खडसे चंद्रकांत पद्धतीने म्हणजे खुबीने युक्तीने वागले असते तर ते आज चंद्रकांतदादांच्या पुढे निघून गेले असते, फडणवीसांच्या तसे नक्की मनात होते पण खडसेंनी बोलून घालविले, दुर्दैवी ठरले….


विद्यार्थी परिषदेत जे घडले वाढले मोठे झाले नेते झाले त्यांनी एक एक मूल दत्तक घ्यायचे ठरविले होते आणि ते तसे करवून दाखविले. किरीट सोमय्या यांच्यासारखे कितीतरी नेते भाजपा मध्ये आहेत ज्यांनी मुले दत्तक तर घेतलीच पण जातपात न बघता त्यांनी विद्यार्थी परिषदेत काम करणाऱ्या तरुणींशी म्हणजे समविचारी मंडळींशी विवाह केले त्यातलेच एक आमदार नरेंद्र पवार, त्यांच्या पत्नीने कधी मनातही आणले नाही कि मी मराठा आहे आणि नरेंद्र हे मराठ्यांच्या तुलनेत दुर्लक्षित जातीतले आहेत. दोघेही विवाहबद्ध झालेत, व्यवस्थित संसार करताहेत कारण त्यांच्या विचारांची नाळ जुळलेली आहे त्या चंद्रकांत पाटलांसारखी, पाटलांच्या पत्नी अंजली खरे कोकणस्थ ब्राम्हण, अत्यंत यशस्वी चार्टरड अकाउंटंट, वास्तविक दादांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांना पुन्हा लग्न करायचे नव्हते पण अंजली खरे या देखील समविचारी, विद्यार्थी परिषदेतून घडलेल्या वाढलेल्या, त्यातून दोघे विवाहबद्ध झाले, आजही त्या दोघांकडे बघून असे वाटते, त्यांचे लग्न कालच झालेले आहे. दादांचे ते तसेच आज देखील अंजलीताईंकडे प्रथमच बघितल्यासारखे पाहणे, लाजून बोलणे, हसून वागणे…

क्रमश: हेमंत जोशी.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *