उडता महाराष्ट्र : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी


उडता महाराष्ट्र : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी 

अगदी आत्ता आत्ता पर्यंत फारतर मराठी पुरुष दारू प्यायचे सिगारेट ओढायचे तंबाखू गुटका खायचे नशा म्हणून फारतर दारू नक्की प्यायचे त्यापलीकडे काही नाही म्हणजे इतर नशा नाहीच नाही. पण आता ते मराठी कुटुंबातूनही पूर्वीचे वातावरण राहिलेले नाही स्त्रिया आणि पुरुष तसेच तरुण मुले व मुली अगदी उघड उघड वाट्टेल ती तशी नशा करतात आणि रस्त्यावर उभ्या राहून मराठी स्त्रिया सिगारेट्स ओढतात. मुंबई ची लोकसंख्या पुण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पण पुण्यातले पब्स मुंबईपेक्षा अधिक भरलेले असतात, पुणेकर मुले मुली स्त्री पुरुष दाटीवाटीने तेथे गर्दी करतात म्हणून मी अलीकडे म्हणालो होतो कि पुण्याबाहेरच्या मराठी माणसाला पूर्वी जे वाटायचे कि आपली मुले व मुली पुण्यात शिकली पाहिजेत जरआजही तेच तुमच्या मनात असेल तर ती पालकांची मोठी चूक आहे आपल्या हाताने ते पोटच्या मुलांचा व्यसनांच्या आहारी नेऊन सोडताहेत असे माझे स्पष्ट मत आहे… 

उडता पंजाब तसा उडता महाराष्ट्र एवढे हे राज्य अलिकडल्या काही वर्षात दारू आणि ड्रग्स च्या आहारी गेले आहे झपाट्याने वेगाने अधिकाधिक आहारी जाते आहे. विशेष म्हणजे मराठी तरुण पिढी मग ती कोणत्याही जाती धर्माची असेल, सारे एका छताखाली बसून विविध जहरी नशा करताहेत. ड्रग्स ची सुरुवात मुंबई आणि पुण्यात पोलिसांच्या सहकार्याने राज्याबाहेरच्या मंडळींनी आणि विशिष्ट धर्माच्या या देशावर कवडीचेही प्रेम नसलेल्यांनी केली आणि येथल्या मराठी तरुण पण नवश्रीमंत पिढीला बरबाद केले. १९९० नंतर जसजसा या राज्यात भ्रष्टाचार वाढला तसा ज्या मराठी लोकांच्या हाती विविध अँगल मधून सत्ता, त्यांच्याकडे झपाट्याने मोठा पैसा आला आणि हा असा अचानक आलेला पैसा साठवून साठवून किती साठवायचा त्यामुळे असे मराठी कुटुंब व्यसनांच्या विशेषतः ड्रग्स आणि लैंगिक विकृत आनंदाच्या आहारी गेले त्यात जसे या घरातले पुरुष होते तसे स्त्रिया व मुली पण होत्या त्यामुळे लग्नानंतर अनटच मुलगी हि पूर्वीची मराठी कन्सेप्ट केव्हाच इतिहासजमा झाली….

www.vikrantjoshi.com

 ड्रग्स आणि लैंगिक विकृतीचे वातावरणचे वातावरण सुरुवातीला मुंबई आणि पुण्यात पसरले निर्माण झाले त्यानंतर ते नागपूरपर्यंत केव्हाच पोहोचले आता ते अतिशय झपाट्याने अख्य्या राज्यात पसरते आहे ज्यांच्याकडे वाममार्गाने आलेला येणारा पैसा त्यांच्या घरात कुटुंबात व्यसने नाहीत लैंगिक व्यभिचार नाही ड्रग्स दारू  नाही, असे घर यापुढे या राज्यात औषधाला पण सापडणार नाही. असंख्य सरकारी अधिकाऱ्यांनी तर केव्हाच लाज सोडलेली पण आता तर मला असे आजी माजी मंत्री पुराव्यांसहित माहित आहेत कि जे स्वतः आणि काही तर अख्य्या कुटुंबासहित ड्रग्स दारू सिगारेट व लैंगिक विकृतीच्या आहारी गेलेले आहेत. सर्वसामान्य मराठी माणूस ज्यांच्याकडून सतत लुटल्या लुबाडल्या जातो आहे तो शापाचा व पापाचा पैसा हा असाच खर्च होणार यात तिळमात्र शंका उरलेली नाही. तुम्ही आम्ही सारेच येथे पाप फेडून वर जाणार आहोत हे नक्की आहे. जे सुसंस्कृत मराठी आहेत ज्यांना वाटत असेल आपले कुटुंब वाममार्गाला लागू नये त्यांनी या देशावर ज्या धर्माचे प्रेम नाही,अशा देशद्रोही लोकांच्या नादाला आपली मुले व मुली लागणार नाहीत याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी. 

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *