घेवारे ला आवरारे २ : पत्रकार हेमंत जोशी

लुच्चा सरकारी अधिकारी दिलीप घेवारे गेल्या २२ वर्षांपासून मीरा भायंदर येथे नगररचनाकार म्हणून ठाण मांडून बसलेला आहे. तो फक्त दरवेळी नव्याने येणाऱ्या नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून घुसतो. अमुक एखाद्या राज्यमंत्र्याचा कार्यकाळ संपला कि पुन्हा मीरा भायंदर गाठतो. आधी भास्कर जाधव तदनंतर त्याने उदय सामंत या दोन्हीही राज्यमंत्र्यांकडे काम केल्यानंतर अलीकडे राज्यात युतीचे सरकार सत्तेत आले आणि विदर्भातल्या अकोल्याचे डॉ. रणजीत पाटील हे फडणवीस मंत्रिमंडळात नगरविकास खात्याचे राज्यमंत्री झाल्यानंतर घेवारे याने त्यांच्याकडेही विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून घुसण्याचा आटोकाट प्रयत्न केले. त्याने डॉ. पाटील यांना विविध माध्यमातून लालूच दाखविण्याचा आधी प्रयत्न केला नंतर ते गळाला लागत नाहीत बघून सामावून घेण्यासाठी त्याने राज्यमंत्र्यावर विविध मार्गांनी दबाव देखील आणला पण उदय सामंत यांचे एक विश्वासू सहकारी नेमके अकोल्याचे होते त्यांनी घेवारे नेमका प्रकार काय आहे, तो तुमच्या अंगावर फक्त शिते फेकतो आणि अख्खा भात कसा स्वतः गिळंकृत करतो, पटवून दिले त्यामुळे जंग जंग पछाडून देखील घेवारेला रणजित पाटील यांच्या कार्यालयात स्थान मिळाले नाही अन्यथा त्यांनाही बेवकूफ बनवून घेवारे मोकळा झाला असता. मुख्यमंत्री महोदयांना या लेखानिमित्ते आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा सांगू इच्छितो कि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्याआधीच्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या त्यांच्या कार्यालयात विविध पदांवर म्हणजे काही खाजगी सचिव तर काही विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून, काही स्वीय सहाय्यक तर काही इतर पदांवर जे अनेक वर्षे ठाण मांडून बसले होते, त्यांची मूळ खात्यात हकालपट्टी करण्याचा महत्वाचा निर्णय केवळ घेतला नाही तर घेतलेला निर्णय त्यांनी इम्प्लिमेंट देखील केला, आधीच्या मंत्र्यांकडे ठाण मांडून बसलेले अतिशय भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी माननीय मुख्यमंत्र्यांनी मूळ खात्यात पाठवून दिले पण त्यांनी घेतलेला हा अविस्मरणीय निर्णय जेमतेम पुढली सहा महिने टिकला असावा कारण फडणवीस मंत्री मंडळात आता असा एकही मंत्री किंवा राज्यमंत्री नाही कि ज्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावलेला स्टाफ घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मला नेहमीप्रमाणे मांत्रिकायालयातल्या पूर्वीच्या महाबिलंदर स्टाफ विरुद्ध पुरावे मांडण्यासाठी तयारी करावी लागणार आहे, विशेष म्हणजे पूर्वीच्या मंत्र्यांना वेश्यावृत्तीचा स्टाफ आवडायचा हे त्रिवार सत्य होते पण फडणवीस मंत्री मंडळातील बहुतेक सर्वच मंत्री आणि राज्यमंत्र्यांना देखील अशी वेश्यावृत्तीची माणसे सतत जवळ बाळगायला आवडतात बघून जो तो मंत्री होती तो केवळ पैसे कमावण्यासाठीच कि काय, असे वाटू लागले आहे.अनुभवी स्टाफ मंत्री राज्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयात असणे वाईट नाही. क्लिष्ट कामे करवून घेणे सोपे जाते पण नेमके ते घडत नाही. ज्या ज्या मंत्री कार्यालयात आधीच्या मंत्र्यांकडे काम केलेला स्टाफ घेण्यात आलेला आहे, त्यांना हेच सांगण्यात येते कि तुम्ही चार पैसे मिळवायला हरकत नाही पण महिन्याकाठी तुम्ही तुमच्या मंत्र्याला ठराविक रक्कम कमवून द्यायलाच हवी. थोडक्यात आधीच्या मंत्र्यांनी जसे लुटले तीच पद्धत फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास साऱ्याच मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी नक्कल केल्याचे आता सिद्ध झाले आहे म्हणजे मागल्या मंत्रिमंडळात शिवाजी मोघे सारखे लुटारू होते, या मंत्रिमंडळात ‘ कदम कदम ‘ पर तेच दृश्य आहे, बघून डोळ्यात अश्रू येतात.

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *