गोंधळात गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी

गोंधळात गोंधळ : पत्रकार  हेमंत जोशी 

युतीला वाटते आपण पुढल्यावेळी सत्तेत येणार नाही किंवा सत्तेत येण्यासाठी जेवढे लुबाडता येईल तेवढे लुबाडून मोकळे व्हा आणि आघाडीच्या चाहत्यांना, समर्थकांना वाटते, पुढल्यावेळी आजचे सत्तेत नक्कीच येणार नाहीत, पूर्वीचे एकदा पुन्हा सत्ता मिळवून मोकळे होणार आहेत, असे काहीसे गोंधळाचे राजकीय वातावरण या राज्यात निर्माण झालेले आहे. मुख्यमंत्री, फारतर आणखी चार दोन मंत्री धावपळ करतांना दिसताहेत, बाकीचे बहुतेक सारे, दिवसभरात काय मिळविता येते तेवढे मिळवून सावटुन मोकळे व्हा, असे काहीसे दृश्य बघायला मिळते आहे. कीटकनाशक फवारणीतून तिकडे यवतमाळ मध्ये अनेक शेतकरी बेशुद्ध पडले, मृत्यू पावले, हळव्या मनाच्या मुख्यमंत्र्यांनी कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांना त्यातून धारेवर धरलेले आहे, या गंभीर प्रकाराला जबाबदार कीटकनाशक कंपन्याच जबाबदार असल्याने त्यांना वठणीवर आणण्याची एकप्रकारे फडणवीस यांनी शपथ घेतलेली असतांना ‘ सदा ‘ पैसे खाण्यात गुंतवून घेणाऱ्या त्या राज्यमंत्र्याने कीटकनाशक कंपन्यांना त्यांचे उत्पादन पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी त्यांच्या संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांना म्हणे थेट दीडशे कोटी रुपये मागितले आहेत, हे ऐकून कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी या राज्यमंत्र्याचा हा अघोरी प्रयोग अक्षरश: हाणून पाडला. कौतुक नक्कीच भाऊसाहेब फुंडकर यांचे येथे करणे आवश्यक ठरते कारण हि मंडळी आधी थेट भाऊसाहेबांना जाळ्यात ओढत होती पण स्वतः शेतकरी असलेल्या फुंडकरांनी हि लाच झिडकारली, चालते व्हा सांगितले. मग हि मंडळी स्वतःला शेतकऱ्यांचा मसीहा समजणार्या त्या मंत्र्याकडे का राज्यमंत्र्यांकडे गेली. अजूनही त्यां दोघात वाटाघाटी सुरूच आहेत म्हणजे कीटकनाशक उत्पादकांची गाडी रुळावर आणण्यासाठी ते उत्पादक ५० कोटी द्यायला तयार आहेत आणि या महाशयांना, मंत्रिमहोदयांना १५० कोटी हवे आहेत. बघूया नेमका किती आकडा ठरतो ते…

हिंदी सिनेमातील खलनायकांना शोभणारे हे या राज्यमंत्र्याचे हलकट वागणे म्हणजे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या नावाने अश्रू गाळायचे, शेतकऱ्यांचा मी एकमेव मसीहा या थाटात वावरायचे आणि बंद खोलीत त्याच शेतकऱ्यांचे मृत्यू सत्र सुरु ठेवण्यासाठी पैसे मागायचे, लाच मागायची, कुठे चाललो आहोत आपण, ज्या मुख्यमंत्र्यांना जिवाच्या आकांताने हे राज्य सुराज्याकडे न्यायचे आहे, त्या मुख्यमंत्र्यांच्या वाटेत खोडा घालण्याचे काम त्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांवर, मंत्र्यांवर विश्वास टाकलेला आहे, त्यांनीच करून मोकळे व्हायचे, का हे असे हलकट हरामखोर वागणे….

२२ नोव्हेंबर ची हि घडलेली सत्य घटना, माझा एक व्यावसायिक मित्र एका मिटिंग साठी नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट या पंच तारांकित हॉटेलात गेला होता, बसला होता, तो बसला होता तेथून त्याने मराठवाड्यातल्या एका मंत्र्याला या हॉटेलमधल्या अतिशय महागड्या स्पा मध्ये जातांना बघितले, ह्या मित्राची परदेशातून आलेल्या एका कंपनीच्या शिष्टमंडळासोबत सतत सहा तास मिटिंग सुरु होती, त्याने पुढे सांगितले हे मंत्री महोदय तब्बल चार तासानंतर त्या स्पा मधून बाहेर पडल्यानंतर त्याने चौकशी केली असता, हे मंत्री महोदय नेहमीच एवढा वेळ मसाज घ्यायला आले कि घेतात आणि मसाज करायला त्यांना त्यांच्या आवडीच्या एक नव्हे तब्बल दोन दोन मुली लागतात. ‘ राम राम ‘ काय हे असे लोफर, उन्मत्त होऊन वागणे, तिकडे मराठवाड्यातला शेतकरी मृत्यूशी साक्षात झुंजतोय, या राज्याचा मुख्यमंत्री झपाटल्यागत दररोज रात्री तीन तीन वाजेपर्यंत तहान भूक विसरून सतत फक्त आणि फक्त राज्याच्या भल्यासाठी काम एके काम करतोय आणि हे असे अय्याशी मंत्री चार चार तास दोन दोन रंडीछाप मुलींकडून मसाज करवून घेण्यात विकृत आनंद घेऊन मोकळे होताहेत. विशेष म्हणजे या मंत्री महोदयांना या मसाज पार्लरने गोल्ड कार्ड दिलेले आहे, बहाल केले आहे कारण हे मंत्री महोदय त्यांचे नेहमीचे ग्राहक आहे. तसे बघितले तर या व्हीआयपी ग्राहकाचा त्या पार्लर मधल्या इतर ग्राहकांना अनेकदा त्रासही होतो कारण मसाज करवून घेतांना हे महाशय तोंडाने चित्र विचित्र आवाज काढतात, मध्येच त्यांचे जोराने हसणे शेजारच्या ग्राहकांना घाबरवून सोडते. फोनवरून मोठ्याने बोलणे इतरांना त्रासदायक ठरते. तुम्ही सध्या कुठे आहेत, हे त्यांना येणाऱ्या फोनवरून विचारल्यानंतर त्यांच्या उत्तरातून वेगवेगळ्या थापा, भन्नाट असतात, थोडक्यात रूम मधून चिखना चिल्लाना नेहमीचेच ठरलेले आहे…

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना जे म्हणाले तेच सत्य आहे, खुर्ची बदलून उपयोग नाही, माणूस बदलायला हवा, उद्या नेमके आम्हाला हेच लिहून मोकळे व्हावे लागणार आहे कि जे आधीचे होते ते तसेच आजचे देखील आहेत, ना त्या मंत्र्यांमध्ये फरक होता ना आजच्या, आणि या अशा बेधुंद वागण्याचा, क्षणिक फायदा घेण्याच्या वृत्तीचा पुरेपूर लाभ घेऊन मोकळे  होताहेत येथे काम करणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, त्यांना ना खर्च ना निवडणुका, या राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची झपाट्याने होणारी, झालेली श्रीमंती,आर्थिक उन्नती हि अतिशय चिंतेची बाब आहे, आपले राज्य खूपच रसातळाला चालले आहे….


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *