वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी 

हे असे प्रत्येक देशात निदान एकदा तरी घडायला हवे, त्याचे असे झाले, बायकोला म्हणालो, आपल्याला दुबईला जायचे आहे, तेथल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही केलेली आहे, त्यावर ती चक्क ‘ नाही ‘ म्हणाली…अर्थात माझे हे वाक्य गंमतीने घ्यावे, एखाद्याचा जीव जावा आणि आपले भले व्हावे असे विचार डोक्यात येणेही चुकीचेच…तिने आता आमच्या बाथरूम मधला बाथटब देखील तातडीने काढून टाकला आहे, माझ्या खालच्या माळ्यावर एक शासकीय अधिकारी राहतात, त्यांनी तो चांगली किंमत देऊन विकतही घेतला…


श्रीदेवी गेली त्यादिवसापासून मी गोंधळात पडलोय कारण वाहिनी मग ती कोणतीही असो, दिवसभर सारेच्या सारे श्रीदेवीची गाणी, डान्स आणि तिच्या आयुष्याची बारी वाईट वाटचाल दाखविण्यात गुंतलेले आहेत, उद्या समजा सनी लिओनी गेली तर…बापरे! भारतातल्या कोणत्याही रस्त्यावरून त्यादिवसात पुरुष मंडळी दिसणारच नाहीत…ज्यांच्या लेखणीत दम आहे, श्रम आहेत, अभ्यास आहे, नियमितता आहे, व्यासंग आहे, मला नाही वाटत अशांचे वृत्तपत्र केवळ शासकीय जाहिराती मिळाल्यात तरच जगेल. तमाम अजिबात दर्जा नसलेल्या वृत्तपत्र मालकांनो, अहो, आपले राज्य, आपला देश हा दानशूरांचा आहे, तुमच्या चांगल्या लढ्यात या देशातले तमाम दानशूर मनापासून साथ आणि दाद देतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्हाला ते कशातही कमी पडू देत नाहीत. म्हणूनच कैलास म्हापदी सारखे लढवय्ये निर्भय लेखणीबहाद्दर पत्रकार नियमितपणे त्या ठाण्यातून दैनिक चालवून, काढून मोकळे होतात पण जिद्द कशी, तर कैलाशला केव्हाही फोन करा, तो फक्त आणि फक्त वर्तमानपत्राशी संबंधित पोटतिडकीने बोलत असतो, आणि या अशा पराक्रमी मराठी पत्रकारांसमोर कुठलाही शेटजी टिकाव धरणे अशक्य असते, लोकमत सारख्या दैनिकांना पुढारी देशोन्नती सामना किंवा सकाळ सारखी दैनिके पुरून उरतात आहेत, जिद्द मोठे काम करते. पन्नास पन्नास वर्षे साप्ताहिके दैनिके पाक्षिके काढणाऱ्यांची वर्तमानपत्रे हातात देखील घ्यावीशी वाटत नाहीत, हे त्यांचे मोठे अपयश आहे, संध्यकाळच्या दारूची सोय झाली, मास मच्छी फुकटात खायला मिळाली, घरी नेण्या शे पाचशे रुपये दिले कि संपली यांची पत्रकारिता वरून या तद्दन भंगार वृत्तपत्रांनी संबंधितांना चिरीमिरी दिली कि वर्षानुवर्षे शासकीय जाहिराती मिळतात, ते उत्पन्न वेगळेच. या पत्रकारांना काहीही करायचे नसते फक्त लाचार भिकारी होऊन शासनाच्या जाहिरातींवर आणि संधी मिळेल तेथे ब्लॅकमेलिंग करून अतिशय भिक्कार पद्धतीने जगायचे असते, बरे झाले किंवा बरे होईल या अशा पत्रकारितेतले कवडीचीही ज्ञान नसलेल्यांच्या शासकीय जाहिराती बंद केल्या गेल्या तर….


एक मात्र शासनाने अवश्य करावे, या तमाम मंडळींना एक संधी द्यावी, वृत्तपत्र नेमके कसे असावे याचे नॉर्म्स ठरवून त्या पद्धतीने जी जी वृत्तपत्रे निघतील, त्यांच्या शासकीय जाहिराती सुरु ठेवाव्यात, कदाचित काहींचे डोळे उघडतील आणि त्यांच्यातले चांगले पत्रकार उफाळून पत्रकारितेचा देशभक्तपर लढा सुरु करतील, बदमाशांच्या नाकात दम आणून सोडतील, पण आज तरी हे असे चित्र धूसर आहे, उकडले तिकडले पाहून दैनिके तीही वेगवेगळ्या जिल्ह्यातून काढायची, शासनाच्या सवलती, जाहिराती लुटायच्या, पर्यायाने जनतेला आणि शासनाला कायम उल्लू बनवायचे, आम्ही पत्रकार आहोत, सांगून, सच्चा पत्रकारांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, प्रतिष्ठा मिळवायची, त्या प्रतिष्ठेच्या आडून पित्तपत्रकारिता करायची, हे असले उद्योग यापुढे चालू न देण्याचे मोठे काम या शासनाने हाती घेतले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन फक्त हे सारे करतांना आमच्यातले सच्चे, कडवे, साधे, श्रेष्ठ पत्रकार किंवा वृत्तपत्रे मरणार नाहीत याचीही काळजी खबरदारी शासनाने अवश्य घ्यायला हवी….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *