गल्लीत गोंधळ दिल्लीत वेंधळे : पत्रकार हेमंत जोशी

गल्लीत गोंधळ दिल्लीत वेंधळे : पत्रकार हेमंत जोशी 

जे मला जवळून ओळखतात त्यांना हे चांगलेच माहित आहे कि ते जर कुठे चुकत असतील तर मी त्यांच्या रागालोभाची चिंता पर्वा न करता त्यांची चूक त्यांच्या नजरेस आणून देतो ज्यांनी ऐकले त्यांचा फायदा झाला ज्यांनी ज्यांनी ऐकले नाही मग ते बडे नेते असतील मोठे अधिकारी असतील जवळचे घरातले स्नेही विशेषतः नातेवाईक असतील मित्र व पत्रकार असतील व्यावसायिक मित्र असतील व्यवसायातले भागीदार असतील कुटुंब सदस्य असतील पुढे माझे न ऐकल्याने त्यांचे नक्की मोठे नुकसान झाले स्वतःचे त्यांनी अतिशय नुकसानच करवून घेतले हीच वस्तुस्थिती आहे. या समाजात वावरतांना जे जे मला खटकले त्यांना ते ते मी तेथल्या तेथे सांगून लिहून मोकळा झालो त्यातून माझे नुकसानही झाले असेल काही जवळचे आप्त नातेवाईक त्यांनी मला त्यांच्या चुकांवर बोट ठेवले म्हणून दूर केले असेल माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला असेल चुका काढल्यानंतर कधी कधी कुटुंब सदस्य किरकोळ वादही घालत असतील पण ज्यांनी माझे ऐकले माझे ऐकतात ते उत्तम आयुष्य जगताहेत किंवा जगून मोकळे झाले. ज्या अनेक नातेवाईकांचा खोटा मुखवटा माझ्या दोन्ही मुलांवर काहींनी बिंबवला होता तेच प्रत्यक्षात कसे व्यसनी, करप्ट, स्त्रीलंपट जेव्हा माझ्या मुलांना ती वयाने आणि शिक्षणाने मोठी झालीत जेव्हा त्यांना कळले त्यांच्या तळपायाची आगमस्तकात जाणे स्वाभाविक होते पण मी मात्र त्यांना कधीही माझ्या आप्तांविषयी नातेवाईकांविषयी वाईट सांगितले नाही उलट आदर कायम ठेवा असेच सांगितले…

स्पष्ट सत्य नेमके सांगितल्याने माझे व्यक्तिगत नुकसान कमी झाले फायदाच अधिक झाला. अनेक नेत्यांना अधिकाऱ्यांना पत्रकारांना नातेवाईकांना कुटुंब सदस्यांना मित्रांना थोडक्यात साऱ्यांना माझे कायम हेच सांगणे असते किंबहुना मी त्यावर आधी लिहिले पण आहे कि तुम्ही नेमके जसे आहात तसेच समाजाला सामोरे जा म्हणजे तोंडात विष्ठा ठेऊन श्रीखंड चघळतो आहे असे दांभिक भंपक खोटे कधीही इतरांना भासवु नका सांगू नका तरीही तुमच्या सभोवतालचे तुम्हाला नक्की डोक्यावर घेऊन नाचतील, जसे आहात तसे लोकांना सांगा उगाच त्यात कृत्रिमता आणू नका त्यातून तुमचे शंभर टक्के जगणे सुसह्य होईल. येथे उदाहरण दिवंगत भय्यू महाराजांचे देता येईल, ते माझे मित्र होते त्यांना मी असेच वारंवार अमुक गंभीर चुका करू नका म्हणून अगदी त्यांचे पुरावे समोर ठेवून सांगत असे पण त्यांनी ऐकले नाही परिणाम काय झाला त्यांच्या घरातल्या त्यांच्या भरवशावर असलेल्या पाच स्त्रिया उध्वस्त झाल्या व महाराजांना त्याच चुका केल्याने पुढे आत्महत्या करावी लागली. जे घडले ते अतिशय हृदयद्रावक असे होते. आजही या मित्राचे अचानक जाणे मला अस्वस्थ करते. आजकालच्या बहुसंख्य व्यसनी चंचल मुलामुलींचे लग्न जुळवितांना त्यांचे मायबाप अतिशय खोटी माहिती देतात व्यसने वाईट सवयी इत्यादी लपवून ठेवतात हे केल्यानेच घटस्फोटाचे मोठे प्रमाण वाढलेले आहे….

असे कितीतरी प्रसंग पण त्यातला एक येथे सांगतो. माझ्या परिचयातली एक ब्राम्हण तरुणी, विविधांगी व्यक्तिमत्व असलेली हि तरुणी दिसायला सुंदर बुद्धिमान उच्चशिक्षित गोड गळा स्टायलिश लोभस स्वभाव मनमिळाऊ अतिशय भावनाशील अवखळ नटखट थोडक्यात नावे ठेवावीत असे तिच्यात काहीही नसल्याने ती माझ्या पारिचीत कुटुंबातली असल्याने वास्तवात मलाच तिला धाकटी सून करवून घ्यायचे होते पत्रिका न जुळल्याने ते जमले नाही अर्थात पुढे माझ्या मुलाचे उत्तम योग्य जुळून आले आणि ती देखील लग्न करून मुंबईत आली. वर्षभरातच तिला मूल झाले पण यादरम्यान तिच्या लक्षात आले इम्प्रेस होऊन तिने ज्या तरुणाशी लग्न केले त्याच्यात अनेक दुर्गुण आहेत त्याने लग्न जुळवतांना खोटी माहिती दिली आहे त्याचे आई वडीलही अनेक बाबतीत खोटी माहिती पुरवून मोकळे झाले आहेत. लग्न होण्यापूर्वी अतिशय उत्साही आनंदी अशी हि तरुणी जेव्हा तिचे वडील तिला माझ्याकडे घेऊन आले तेव्हा क्षणभर तर मी सुद्धा ओळखले नाही मग त्यांनी वस्तुस्थिती सांगितल्यावर मी तिला एवढेच म्हणालो यापुढे तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि हि जी माणसे तुझा मानसिक आर्थिक शारीरिक छळ करताहेत त्यांना तू कशी व किती पराक्रमी आहेस दाखवून दे. त्यानंतर ती ज्या क्षेत्रात शिकलेली होती त्यात तिने करिअर करायला सुरुवात केली. मित्रहो, आता केवळ वर्ष जेमतेम संपतांना हेच तिच्या घरातले केवळ तिच्याकडे आलेले अधिकार व पैसे बघून त्यांनी प्रसंगी तिच्या पायाशी पण लोळण घेणे आवडीचे मानले आहे. तिला मध्यंतरी भेटल्यानंतर एवढेच म्हणालो त्यांच्याशी वाईट वागू नको पण त्यांच्या लबाड हलकट वृत्तीला यापुढे निदान बळी तरी पडू नको कारण चुकून तुझ्यावर पूर्वीचे वाईट दिवस ओढवले तर हेच सासूसासरे आणि नवरा तुझा पार खिमा करून मोकळे होतील. मिळवते आहेस ते राखून ठेव, गोड बोलून पैसे मागणाऱ्या हलकट हेकट स्वार्थी व्यसनी लाडावलेल्या बबड्याच्या खोट्या नीच वागण्याला निदान यापुढे सावध राहून उत्तरे दे. आता तरी ती सुखी आहे, बघूया पुढे काय लिहून ठेवले आहे ते… गल्लीत गोंधळ दिल्लीत वेंधळे या खमंग विषयाला पुढल्या भागात फोडणी…

अपूर्ण : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *