भाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी

भाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी 

बारा पैकी एकही मंत्री कामाचा असेल तर राजीनामा देईन, एकही मंत्री कामाचा नाही, आमची कामे करीत नाही फक्त वैयक्तिक कामे करवून घेण्यात बाराही मंत्र्यांना रस आहे, शिवसेना मंत्र्यांचे भाजपाशी संधान,शिवसेना नियोजनशून्य म्हणून अधोगतीला जातेय, शिवसेनेचा एकही मंत्री कामाचा नाही, मंत्र्यांना कार्यक्रमाला बोलाविले तर त्यांना यायला वेळ नसतो, स्थानिक निवडणुकांना एकही मंत्री प्रचाराला येत नाही, शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, युती झाली तर मी निवडणूक लढणार नाही, नागपूर अधिवशेषणाच्या दरम्यान विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी या असे आम्ही आमदार मंत्र्यांना विचारतो ते येत नाहीत, वेळ देऊनही येत नाहीत, पाठीशी एकही मंत्री उभा राहत नाही, विदर्भातल्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देतात,


आपले मंत्री वैयक्तित कामांसाठी विविध मतदार संघात येतात पण भाजपा विरोधी प्रचार करणे ते टाळतात, वैक्तिक कामे आपले मंत्री शासन दरबारी किंवा मुख्यमंत्री फडणवीसांकडून करवून घेतात पण आमदारांचे सामान्य शिवसैनिकांचे काम होत नाही उलट त्यांना सामान्य शिवसैनिक किंवा पदाधिकारी भेटायला गेले तर अपमानित करून म्हणतात, कोणाला विचारून येथे 


आलास, का आलास, साधी विचारपूस करणे दूर, वरून थकून भागून आलेला, पदरमोड करून आलेला सेनेचा पदाधिकारी डोळ्यात पाणी आणून आल्या पावली निघून जातो..


असे एक ना अनेक आरोप जे आमदार बाळू धानोरकरांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर केले, तेव्हापासून मी सेनेच्या अनेक आमदारांशी जेव्हा या संदर्भात बोललो, नावे न सांगण्याच्या अटीवर त्यांनी आणखी अनेक पुरावे या मंत्र्यांच्या संदर्भात मला सांगितले. बाळू धानोरकर तर म्हणाले, महसूल राज्यमंत्री संजय राठोड माझ्या शेजारच्या जिल्ह्यातले पण त्यांना नगरपालिका निवडणुका प्रचारादरम्यान किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमांसाठी बोलवावे तर ते यायलाच तयार नाही, काही महाभाग तर असे आहेत, कार्यक्रमासाठी येतो म्हणून सांगतात, आम्ही कार्यक्रम घडवून आणतो, जनता जमलेली असते आणि मंत्री येताच नाहीत, आमचा आमच्या मतदारांसमोर जाहीर अपमान होतो, विरोधकांना आयते कोलीत मिळते…


www.vikrantjoshi.com


कोल्हापूरचे एक आमदार मला म्हणाले कि माझ्या एका जवळच्या महत्वाच्या कार्यकर्त्याचे म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे एक काम आमच्या त्या वयस्क तापट फटकल मोस्ट व्हिमजिकल मंत्र्याकडे होते, काम साताऱ्यातले होते, पदाधिकाऱ्याला आमच्या या नेत्याकडे कम मंत्र्याकडे मुद्दाम कौतुकाने घेऊन गेलो, आधी स्वतःच्याच मूड मध्ये, माझ्याकडे साधे बघायलाही तयार नाहीत, एखाद्या मारक्या म्हशीसारखे माझ्याकडे काही वेळाने बघून त्यांनी विचारले काय काम आहे, मी काम सांगताच एकदम भडकले, म्हणाले तुम्ही तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार, साताऱ्याशी तुमचे काय देणे घेणे, मंत्र्याच्या बोलण्याचा सूर असा होता कि जणू मी त्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन काम करतोय, नंतर क्षणार्धात त्यांना भेटायला आलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याशी हेच मंत्री एवढ्या गोड गोड गप्पा मारीत बसले कि विचारू नका, मी आणि माझा सहकारी खजील होत, अपमानित होत एकमेकांकडे बघत बाहेर पडलो…


अभि नही तो इसके बाद कभी नाही, माझे हे लिखाण संपता संपता जर मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल झाले तरच काही प्रमाणात सेना किंवा भाजपामधली अस्वस्थता दूर होऊन सारे काही शांत होऊन मला वाटते त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल अन्यथा शरद पवार दबा धरून बसलेले आहेतच, त्यांचे एखाद्या भूमिगत राहून मोठे काम करणाऱ्या संघटनेसारखे शिस्तबद्ध पक्षाचेप्रचार कार्य सुरु आहे, आगामी निवडणुकांच्या ते केव्हाच तयारीला लागलेले आहेत, सेना भाजपाची ग्रामीण भागावर ढिली होत असलेली पकड आणि त्याचवेळी खुबीने शक्तीने युक्तीने पवारांचा पक्ष प्रचार, मोठा धोका ऐन निवडणुकांदरम्यान युतीला होण्याची अधिक शक्यता आहे. भाकरी परतवणे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक विधान परिषद सदस्याला दूर ठेवून जे जनतेतून काबाडकष्ट करून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत केवळ त्यांच्याकडे महामंडळे आणि मंत्रीपदे सोपविणे अधिक सोयीचे ठरेल असे माझा अनुभव सांगतो…

समाप्त :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *