भानगडी आवडे कार्यालय तावडे १ : पत्रकार हेमंत जोशी



भानगडी आवडे कार्यालय तावडे १ : पत्रकार हेमंत जोशी 

माझ्यावर आजतागायत एकही अब्रुनुकसानीचा दावा यासाठी झालेला नाही कि मी जो वाचकांवर दररोज अन्याय करत आलो आहे त्याचे हे मला बक्षीस आहे कि माझा अद्याप खून झालेला नाही आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल नाही. वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, मि जे तुमच्यासमोर मांडतो असतो ते एक,केवळ हिमनगाचे टोक असते आणि तेवढे तर या राज्यातल्या तमाम भ्रष्ट नेत्यांना मंत्र्यांना अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दलालांना विधान भवनाशी म्हणजे जनतेच्या या न्यायालयाशी निगडित असलेल्यांना, मीडियाला खपवून घ्यावेच लागते जर ते अमुक एखाद्याने खपवून घेतले नाही तर त्यांच्याविषयी माझ्याकडे नेमकी माहिती कोणती, आणि मी तीही न घाबरता कशी बाहेर काढू शकतो हे या राज्य बुडव्या हरामखोरांना मग त्यात सगळेच आलेत, तंतोतंत माहित असल्याने माझ्याबाबतीत नको तो आगावूपणा ते करीत नाहीत…

पैसे घेणारे वाटणारे कोण तेही माझ्या परिचयाचे, पैसे देणारे कोण तेही माझ्या परिचयाचे विशेष म्हणजे जेथे काळे पैसे गुंतविले जातात ती या राज्यातली माणसे देखील माझ्या परिचयाची, ज्यांनी परदेशात पैसे नेले आणि कुठे गुंतविले तेही मला जसेच्या तसे ठाऊक असतो, या सार्या प्रकारावर लढायचे तरी किती पण आपल्याला हेमंत जोशी त्यांच्या हातून उध्वस्त व्हायचे नाही हे अगदी वाहिन्या आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या मंडळींना देखील माहित असल्याने हे सारेच नीच आणि हलकट माझ्या वाटेला येत नाहीत. जसा अमुक एका माणसाचा जीव नेमका कुठे, अशा प्रकारच्या लहानपणी आपण ज्या कथा वाचलेल्या आहेत त्यापद्धतीने जर तुम्ही मला विचारले कि हेमंत जोशी तुमचा जीव कोण घेऊ शकतो, तुमची पत्रकारिता कोण संपवू शकतो तर तेही मला येथे सांगायचे आहे कि अमुक एखादा या गढूळ क्षेत्रात राहूनही निष्कलंक राहिलेला म्हणजे लोकसत्तेतल्या त्या उमाकांत देशपांडे सारखा माणूस, भानगडी न करणारा पृथ्वीराज चव्हाण सारखा नेता किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा अधिकारी मला नक्की संपवू अगदी सहज संपवू शकतो, अशा मंडळींना माझी सुपारी द्यायला हरकत नाही…


तसेही एकतर स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या हातांनी कफन बांधायचे नसते आणि बांधून घेतले तर मृत्यूला घाबरायचे नसते. माझ्या सभोवताली जमणारे आणि हेमंत जोशी नेमका कसा समजलेले माझ्यावर प्रसंगी जीव देखील ओवाळून टाकतात आणि 

तसेही जवळपास सारेच बरेवाईट प्रसंग आयुष्यात येऊन गेल्याने आता तशी संकटाची फार भीती देखील वाटत नाही. मला आठवते जळगावला असतांना एकदा एका गुंडाने माझ्यावर धारदार सुरीने हल्ला केला, क्षणाचाही विलंब न लावता तो खतरनाक वार मेहतर ज्याला हलकट माणसे भंगी म्हणतात त्या समाजातल्या माझ्या सहकारी मित्राने आनंद गोयर याने मध्ये पडून स्वतःवर झेलला. आनंद पैलवान होता म्हणून तो सुरा आरपार जाऊन देखील तो वाचला आणि मला तर त्याक्षणी नवीन आयुष्य मिळाले, जीवनदान मिळाले, असे प्रसंग आठवले कि अंगाचा नक्की थरकाप उडतो, जातपात कधी मानली नाही त्यामुळे त्याकाळी अख्खे मेहतर माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे, आनंद गोयर तर माझा कुटुंब सदस्य होता…


असाच एक प्रसंग मुंबईत देखील घडला होता तेव्हा कोणी वाचविले त्यावर माझ्या आत्मचरित्रात नक्की लिहीन. बंधुराज यदु जोशी आणि चिरंजीव विक्रांत जोशी या दोघांनाही जेव्हा मी पत्रकारितेत आणले तेव्हाच त्यांना सांगितले होते कि बदनामीला, 

संघर्षाला, मृत्यूला घाबरत असाल तर या क्षेत्रात पाऊल टाकू नका, तुम्ही असे आहात कि जेथे विहीर खोदाल तेथे पाणी काढाल, त्या दोघांनीही सरपे कफन बांधण्याचे वचन त्या त्या वेळी मला दिले म्हणून यदु जोशी सारखा एक लढवय्या पत्रकार या राज्याला मिळाला. अमुक एखाद्याशी पटत नसले म्हणजे त्याविषयी केवळ वाईटच बोलायचे असे माझे नसते त्यामुळे जे चांगले आहे ते यदूंविषयी सांगितले. वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढणारे, असे किंवा त्यांचे कुटुंब केव्हाही कोणत्याही क्षणी उध्वस्त होऊ शकते पण रक्तात देश भक्ती मुरलेली असली कि लढ्याचे, लढण्याचे काहीही वाटत नाही.लिहिता लिहिता भलतीकडे वळलो आणि शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या कार्यालयातल्या भानगडी करणाऱ्या शिंदेशाहीविषयी लिहायचे राहून गेले ते पुढल्या भागात…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *