तुमच्यासाठी जान कुर्बान : पत्रकार हेमंत जोशी

तुमच्यासाठी जान कुर्बान : पत्रकार हेमंत जोशी 

तशीही माझी मीन रास असल्याने मी कायम द्वीधा मनःस्थितीत असतो,  लग्न करतांनाही मी असाच द्विधा मनस्थितीत होतो म्हणजे नेमके कोणत्या नटीशी लग्न करावे सुचत नव्हते शेवटी भलतीकडेच विवाहबद्ध झालो. अर्थात लग्नाच्या बाबतीत प्रत्येकच पुरुषाला प्रश्न पडलेला असतो कि चार  दिवस वाट पहिली असती चार दिवस थांबलो असतो तर आणखी बरे मॉडेल मिळाले असते अगदी डॉ. नेने यांना देखील तेच वाटते म्हणे. आणि हे तर खरेच आहे कि प्रत्येकाला दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमी मोठा वाटतो. जगात असे फार कमी स्त्री पुरुष आहेत कि ते एकमेकांशी संभोग करतांना एकमेकांना बघतात, बहुतेक नवरा बायको संभोग करतांना आपला आवडता तिसराच चेहरा नजरेसमोर आणतात.  आणखी मोलाचा सल्ला, फेस बुक वर टाकलेले फोटो तद्दन फसवे असतात म्हणजे फोटो मध्ये ज्या मधुबाला दिसतात प्रत्यक्षात त्या थेट बाईच्या वेषातल्या भाऊ कदम सारख्या जवळपास दिसायला असतात. फोटो फिनिशिंग तद्दन फसवे असते. असे म्हणतात ज्या देखण्या असतात त्यांचे फोटो  खचित चांगले येतात… 

ज्या विषयावर मी अगदी अलीकडे तुम्हाला मनातले सांगितले होते तेच येथे पुन्हा रिपीट करतोय म्हणजे आम्ही सत्यवान, भाऊ तोरसेकर विक्रांत जोशी विक्रांत पाटील इत्यादी बोटावर मोजता येतील अशा काही देशभक्त, आक्रमक राज्यातल्या लढवय्या पत्रकारांनी सध्याची पत्रकारिता सुरु ठेवावी कि सोडून द्यावी कारण माझी माहिती माझा अनुभव हेच सांगतो कि यापुढे सत्य, तेही आक्रमक स्वरूपात मांडणे म्हणजे आगीशी जीवाशी आयुष्याशी खेळ खेळण्यासारखे झालेले आहे आणि हे शरद पवार देखील शंभर टक्के स्वतः खाजगीत मान्य करतील. हे बघा शरद पवार त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक बाबतीत वादग्रस्त संशयास्पद ठरलेले असतील पण त्यांच्याविरुद्ध थेट मात्र सत्य कितीही आक्रमक रीतीने आम्ही पत्रकारांनी अनेकदा मांडले असताना त्यांनी कधीही कोणत्याही वाहिनी विषयी, वृत्तपत्राविषयी, पत्रकाराविषयी मनात कायम राग द्वेष कपट ठेवून बदला घेण्याची भाषा केली नाही पण यावेळी थेट सत्तेत असतानाही त्यांना नक्की हा प्रश्न पडलेला असेल कि यापुढे लढवय्या देशप्रेमी पत्रकारांचे या विचित्र विध्वंसक उद्भवलेल्या परिस्थितीत कसे व्हावे ? 

मला अलिकडल्या काही महिन्यात जी भीती वाटत होती तेच नेमके घडले आहे म्हणजे त्याचे असे झाले अलीकडे एका मंत्र्यांचे लायझनिंग सांभाळणार्या निवृत्त सरकारी अधिकारी असलेल्या मित्राचा मला फोन आला, म्हणाला, हेमंतराव तुम्ही आणि चिरंजीव यापुढे सांभाळून लिखाण करा आणि हा निरोप मला तुम्हाला एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने द्यायला सांगितला आहे. वरून तो हेही म्हणाला कि यदु गॅंग मधल्या एका बड्या वार्ताहराला असेच विरोधात लिखाण केले म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने दमात घेतले होते त्यामुळे तो वार्ताहर घाबरला आणि त्याने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे धाव घेतली, स्वतःची सुटका करून घेतली. त्याच्या या निरोपाचा थेट सरळ अर्थ हाच निघतो कि हि वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते. माझी मीन रास त्यामुळे गोंधळलो आहे कि यापुढे गांडू व्हावे कि अधिक आक्रमक होऊन असत्याविरुद्ध लढत राहावे जीव गेला तरी. अर्थात मन अनेकदा गोंधळात जरी पडत असले तरी कोणत्या तरी कन्क्लुजनला यायचे असतेच त्यामुळे फायनल निर्णय मी आम्ही हाच घेतला कि सारे काही गमावले तरी चालेल जीव गेला जीव घेतला तरी चालेल पण लढवय्या पत्रकारिता सोडायची नाही, अन्यायाविरुद्ध लढतच मरायचे. तसेही चार दशकाच्या या प्रदीर्घ पत्रकारितेत कित्येकदा जीवघेणे, बदनामीचे, कठीण प्रसंग जीवावर बेतले असतील तेव्हा आपण कुठे घाबरलो. ठीक आहे कि आता तो पूर्वीचा महाराष्ट्र राहिला नाही हे जाणवते आहे खरे पण गांडू निराश होऊन जगणे कधी जमलेच नाही यापुढे तरी ते कसे शक्य आहे, आणखी काय सांगायचे ? 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *