अनिल गायकवाड : तुम जियो हजारो साल : पत्रकार हेमंत जोशी


अनिल गायकवाड : तुम जियो हजारो साल : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे काहीशा कामानिमित्ते एका गुजराथी कुटुंबाच्या घरी गेलो होतो, आमचे घर किती सुंदर त्यास्तव त्यांनी कौतुकाने अभिमानाने अख्खे घर दाखवले. आधी वडिलांच्या खोलीत नेले त्यांचा बार त्यांनी दाखवला नंतर त्यांच्या बेडरूम मधला बार पण दाखवला त्यानंतर एकुलत्या एक मुलाची पण बेडरूम दाखवली, मित्राची पत्नी म्हणाली, मुलगा पण ड्रिंक करतो, अद्याप तो १८ वर्षे पूर्ण झाला नाही म्हणून त्याचा बार रिकामा ठेवलेला आहे. आणखी एक उदाहरण, संध्याकाळी मी टेरेसवर फिरतो. अलीकडे नवरात्री मध्ये टेरेस वर फिरतांना सहजच समोरच्या इमारती मधल्या सदनिकेकडे लक्ष गेले, बघतो तर काय ४०-४५ ची मालकीण घरात एकटीच आणि तिच्या टग्या नोकरांकडून नको त्या कपड्यानिशी हात पाय दाबून घेत होती, साधारणतः तासाभरानंतर पुन्हा तिच्या सदनिकेकडे लक्ष गेले असता तीच बाई नवर्याच्या हाताला हात लावून देवीची आरती करत होती, म्हणी उगाच तयार होत नाहीत, स्त्रियांचे चारित्र्य आणि पुरुषांचे भाग्य देवालाही कळत नाही, या म्हणीचा नेमका उलगडा झाला. ऐय्याशी व व्यसने हिंदूंना देखील पाश्चिमात्य संस्कृतीला नको त्यापद्धतीने जवळ घेतल्याने उध्वस्त करू लागलेली आहेत. एकत्र कुटुंब पद्धती निभावणे जरासे कठीण असले तरी या संस्कृतीस बिलगून राहिल्यास किमान वाया चाललेली मराठी कुटुंबे तरी नक्की सावरल्या जातील अन्यथा आज राज्यातली शहरे बिघडलेली आहेत उद्या हे प्रकार खेड्यातून पण बघायला मिळतील… 

मराठी संस्कृतीमध्ये सहसा न सापडणारे आणखी एक उदाहरण येथे देतो, समृद्धी महामार्गाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री अनिल गायकवाड यांचे. एखादा उच्च सरकारी अधिकारी एकाचवेळी किती भावनाप्रधान आणि दिलदार असू शकतो यांचे अनिल गायकवाड मूर्तिमंत उदाहरण. तिकडे त्यांची पत्नी मुले आर्थिक चणचण सोसताहेत आणि इकडे या अनिलजी समोर रिकाम्या हाताने एखादा गरजू उभा ठाकला रे ठाकला कि प्रसंगी मित्रांकडून पैसे उसने घ्यायचे पण दान करूनच मोकळे व्हायचे असा हा अवलिया खचित सापडणारा सरकारी अधिकारी म्हणजे खिसे उलटे करून रिकामे होईपर्यंत दान करीत सुटणे आणि त्यांच्या या दानशूर भोळ्या दिलदार भावनाप्रधान मायाळू दयाळू स्वभावाचा नातेवाईकांनी मित्रांनी त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने अतिप्रचंड आर्थिक गैरफायदा घेणे हे आता नित्याचेच झाले आहे. मी मुंबईत आल्या दिवसापासून समृद्धीचे अनिल गायकवाड व राधेश्याम मोपलवार माझे मित्र आणि जवळून ओळखीचे पण कितीही सांगितले तरी उपयोग शून्य, अनिल म्हणजे आधुनिक कर्णाचे अवतार, एखाद्याला त्यांचा शर्ट जरी आवडला तरी बनियान वर घरी येतील पण अंगावरचा शर्ट देखील दान करून मोकळे होतील. विशेष म्हणजे जेव्हा केव्हा अनेकदा यांच्यावर आर्थिक संकटे ओढावलीत, ज्यांना सर्वार्थाने मोठे केले त्यांनी पाठ फिरवली नाही असे कधीही घडले नाही तरीही अनिल गायकवाड यांचे डोळे उघडलेले नाही, वाटणे आणि लुटून देणे अद्याप तेच सुरु आहे… 

मला आठवते अनिल गायकवाड बांधकाम खात्यातील मुंबई प्रेसिडेन्सी विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता असतांना लाचलुचपत विभागाने त्यांच्या अनेक कलिग्सला बाजूला सारून एका खटल्यात यांना विनाकारण गोवले, जे दोषी होते ते अलगद बाजूला राहिले पुढे नेमके सत्य न्यायालयात उघड झाले आणि अनिलजी निर्दोष सुटले. पाच वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर हि क्लीनचिट मिळाली खरी, पण डोक्यावर खटला घेऊ जगतांना जी पेपरबाजी झाली जी बदनामी झाली त्या त्रासातून या कमालीच्या इमोशनल अधिकाऱ्याला जो अति प्रचंड मानसिक त्रास झाला किंवा खटला लढतांना त्यांच्या मुलांना पत्नीला विनाकारण अनेकदा अपमानित व्हावे लागले त्याचे काय ? आणि या साऱ्या प्रकारात बांधकाम खात्याचे सचिव होण्यास त्यांना जे पापड बेलावे लागले त्याचे काय, तरीही न थकता न विचलित होता जसे या अधिकाऱ्याने अतिशय कठीण असे दिल्लीतले महाराष्ट्र सदन उभे केले, आज पुन्हा तेच दिसतेय कि गायकवाड असोत अथवा मोपलवार कोणत्याही संकटांची बदनामीची अडचणींची काळजी चिंता पर्वा न करता किंवा कोरोना रूपाने साक्षात मृत्यूला देखील न घाबरता पायाला भिंगरी लागल्यागत गायकवाड मोपलवार आणि त्यांचे मोजके साथीदार सतत स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागलेले आहेत, काहीही झाले तरी समृद्धी महामार्ग पूर्ण करायचा, या मंडळींनी ठरविलेले आहे… 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *