मुख्यमंत्र्यांचे मित्र : पत्रकार हेमंत जोशी

मुख्यमंत्र्यांचे मित्र : पत्रकार हेमंत जोशी 

नेता आणि अभिनेता आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात एक असे दृश्य असते जे वारंवार पाहायला मिळते. म्हणजे प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये त्यांचे सूत जुळवून आणणारी एक व्यक्ती असते मग तो भाऊ असतो, मित्र असतो, मैत्रीण असते, बहीण असते वगैरे वगैरे..माझीही मुख्यमंत्र्यांच्या त्या मित्राशी ओळख अशाच एका मध्यस्थामार्फत, मित्रामार्फत झाली. नागपुरात गेलो कि अनेकदा ज्यांच्याकडे मुक्काम करतो किंवा करावासा वाटतो त्या नानिवडेकर कुटुंबामुळे माझी त्या मुख्यमंत्र्यांच्या मित्राशी आधी ओळख झाली नंतर मैत्रीत रूपांतर झाले…

आपल्या आसपास अशी काही गोंडस गॉड हसतमुख लाघवी गुबगुबीत छोटीशी मुले असतात कि जो तो त्यांना लाडाने पटकन कडेवर उचलून घेतो, फडणवीस यांचे वागणे बोलणे दिसणे हे असेच त्या लहान लाघवी मुलांसारखे, देवेंद्र म्हणजे सुरुवातीपासूनच गॉड गुबगुबीत हसमुखलाल, त्यामुळे जो कोणी त्यांच्याकडे एकदा कटाक्ष टाकतो, हे हसमुखलाल मग एकदा का त्यांच्याकडे बघून हासलेत कि समोरचा मग तो कोणीही असो आपोआप देवेंद्रमय होतो, आणि असे या राज्यात, नागपुरात, नागपूर जिल्ह्यात, विदर्भात खूप खूप आहेत कि जे सांगत असतील मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे, नागपुरात तर हातगाडीवर पोहे आणि तर्री विकणारा देखील सांगत असतो कि मी देवेंद्रच्या एकदम घरातलाआहे पण त्यात फारसा अर्थ नसतो, असे विनाकारण अनेकांना वाटत असते कि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, हे असे शरद पवार यांच्याही बाबतीत नेहमी घडत आले आहे म्हणजे रस्त्याने फिरतांना तुम्हाला जागोजाग पायलीचे पन्नास असे आढळतील कि ते छाती ठोकून सांगतील, होय, मी पवारांच्या अगदी जवळचा आहे. अलीकडेच मी तुम्हाला सांगून टाकले आहे कि फडणवीस हे शरद पवार यांच्यापेक्षाही एकदम डेंजरस, सो ते साम्य येथे त्या दोघात आहेच कि ज्याला त्याला वाटत राहते कि आपण फडणवीस यांच्या जवळचे आहोत, वास्तविक हे असे वाटणे चुकीचे आहे, असते किंवा तो असतो केवळ त्यांचा भ्रम….

पण तो एकमेव असा माणूस आहे, मित्र आहे कि तो अगदी बालवयापासून म्हणजे पहिल्या वर्गापासून तर आजपर्यंत देवेंद्र यांचा बेंचमेट    असूनही किंवा कुटुंब सदस्य असूनही त्याला आम्ही कधी कुठेही सांगतांना बघितलेले नाही किंवा ऐकलेले नाही कि तो मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचा आहे, त्यांचा खर्या अर्थाने सखा आहे, जिवलगा आहे, किंवा तो हे उठता बसता सांगत सुटला नाही कि तो फडणवीसांना अतिशय जवळचा आहे, नाय नो नेव्हर आणि हे नाव आहे श्रीमान आल्हाद राजे. श्रीयुत आल्हाद आणि त्यांच्या पत्नी शीतल हे जोडपे देवेंद्र फडणवीस यांना अतिशय जवळचे कारण आल्हाद आणि देवेंद्र पहिल्या वर्गापासून तर साधारण बारावीपर्यंत वर्गात, शाळेत एका बेंचवर बसायचे आणि शाळा सुटल्यानंतर म्हणजे त्यांचे मार्ग वेगवेगळे झाल्यानंतरही ते एकमेकांशी पूर्वीचेच संबंध ठेवून आहेत, जपून आहेत, दोघांचे एकमेकांशी अतिशय सख्य आहे. विशेष म्हणजे हे फारच कमी लोकांना माहित आहे, असावे कि ते एकमेकांशी अति अति क्लोज आहेत, याचे श्रेय नक्की आल्हाद राजे यांनाच द्यायला हवे यासाठी कि त्यांनी कधीही आपल्या या सख्याच्या नावाचा साधा उल्लेख कधी केला नाही किंवा फडणवीस यांचे नाव कुठेही वापरले नाही…

जे देवेंद्रच्या बाबतीत तेच वागणे आल्हाद राजे यांचेही, माणूस त्याच्या व्यवसायात अतिशय मोठा, नामवंत पण अजूनही जमिनीवर, यशाची हवा अजिबात डोक्यात न गेलेला, साधे सरळ दिलदार आणि बोलके असे हे राजे आडनावाचे आडनावाला शोभणारे जोडपे पण वागणे ते तसेच, एकदम साधे त्यामुळे जोडल्या गेलेला माणूस आपोआप आल्हादमय होतो, त्यांच्याशी जवळीक निर्माण होते हे विशेष. आल्हाद राजे हे या देशातले नामवंत असे आर्किटेक्ट, मोठमोठाली स्टार हॉटेल्स बांधणे किंवा त्यांची अंतर्गत सजावट हे राजे यांच्या हाताचा मळ, पण आमचा हा मित्र गर्विष्ठ नाही, मैफिल जमली कि गप्पांमध्ये आकंठ बुडून जाणारा मस्तकलंदर. अलीकडे मी ते, हेमंत नानिवडेकर नागपुरात नानिवडेकर यांच्या घरी गप्पांमध्ये रंगलो होतो, रमलो होतो, बोलण्याच्या ओघात मी त्यांना विचारलेही कि असे अनेक आहेत जे तुमच्याएवढे त्या फडणवीसांशी क्लोज नसूनही त्यांचा फायदा गैरफायदा घेऊन मोकळे होतात, तुमचा तर त्यांच्यावर जवळचा जुना जाणता मित्र म्हणून हक्क आहे, पण तुम्ही कधीही असे काम केले नाही ज्यातून मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा तुम्हाला आर्थिक किंवा अन्य फायदा झाला किंवा तुम्ही तो करून घेतला, ते पटकन म्हणाले, एकतर मला या अशा पैशांची गरज नाही किंवा गरज असो अथवा नसो, आपण हे असे काही करून उंची गाठलेल्या आपल्याया मित्राला त्रास द्यावा असे मनातही कधी येत नाही, पण जेव्हा केव्हा मी आणि मुख्यमंत्री भेटतो, दोघांच्याही डोळ्यातले आनंदाश्रू लपता लपता नाहीत, संपता संपत नाहीत….

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *