उंदीर पुराण नेमके १ : पत्रकार हेमंत जोशी

उंदीर पुराण नेमके १ : पत्रकार हेमंत जोशी 

उंदीर प्रकरणातील नेमके सत्य येथे मांडायचे आहे, बारकाईने वाचा, बातमी मागची नेमकी बातमी काय आहे, ती जाणून घ्या आणि त्यातले सत्य कृपया हा लेख हे लिखाण व्हायरल करून लोकांपर्यंत पोहोचवावे. खरोखरी राज्यातल्या या शिवसेना भाजपा युतीची अवस्था क्रिकेटपटू शमी सारखी झालेली आहे, घरातल्यांनीच या सरकारची अब्रू वेशीवर टांगून युतीची पार द्रौपदी करून सोडलेली आहे. एक क्षुल्लक प्रकरण त्या उंदीर मारण्याचे त्यात भाजपाच्या या राज्यातल्या सर्वश्रेष्ठ नेत्यानेच म्हणजे एकनाथ खडसे यांनी अकारण बादरायण संबंध लावून थेट मुख्यमंत्र्यांचे शरसंधान केले त्यांनी नेमके त्यात काय साधले, हा खरा सवाल आहे. तुम्हाला किंवा खडसे यांना काय वाटते हे असे ते लागल्याने त्यांचे आयुष्य अस्ताला जात असतांना, त्यांचे किंवा त्यांच्या कुटुंब सदस्यांचे फार मोठे भले होणार आहे, वाट्टेल ते राजकारणात बोलले कि अमुक एखादा नेता मोठा होतो, हा एकनाथ खडसे यांचा मोठा गैरसमज आहे, विनाकारण बोलत सुटले कि आपले राजकीय आयुष्य तर अस्ताला जातेच पण पुढली पिढी देखील राजकारणातून बाजूला फेकल्या जाते हे एका माजी मुख्यमंत्र्यांचे ज्वलंत उदाहरण तुम्हा आम्हा सर्वांसमोर आहे आणि असे कितीतरी त्या शालिनीताई पाटील, सुरेशदादा जैन यांच्यासारखे, जो कोणी नेता खडसे यांचा बोलविता धनी असलाच तर त्याचे काम खडसे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फत्ते झाल्यानंतर तो किंवा त्याचा पक्ष कधीही खडसे यांच्या पाठीशी उभे राहणे शक्य नाही, अति बोलणाऱ्या, घालून पाडून सतत बोलणाऱ्या नेत्यांचे घटस्फोट घेतलेल्या तरुण स्त्रीसारखे होते, तिचे बान्धखोर वागणे, सर्वांना वेठीस धरणे, तिचे दुसरे लग्न जमणे कठीण होऊन बसते कारण ज्याला त्याला वाटते, काल परवा हिने आधीच्या कुटुंबाला नामोहरम केले उद्या हे बालंट आपल्यावरही येऊ शकते मग तिला एकटीलाच उर्वरित आयुष्यसि कुढत काढावे लागते, खडसे असे तुमचे त्या घटस्फोट घेतलेल्या तरुण स्त्रीसारखे होऊ नये असे अगदी मनापासून वाटते…


एकनाथ खडसे इज ऍन असेट टू बीजेपी, ते खान्देशातले खरोखरी अतिशय मोठे लोकप्रिय, लोकमान्य नेते आहेत नेतृत्व आहे पण त्यांच्या अशा सततच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे ते संघ आणि भाजपा परिवारातून बाजूला सारल्यासारखे झालेले आहेत, फडणवीसांनी त्यांना आता जवळ करणे तर फार दूरचे पण उद्या, आमचाही फडणवीस होऊ शकतो, या भीतीने त्यांना दानवे किंवा गडकरी यांच्यासारख्या नेत्यांनी देखील दूर केल्यास फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नसेल. उंदीर मारणे हा विषय नेमका त्या सार्वजनिक बांधकाम खात्याशी म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या खात्याशी संबंधित आणि हे खडसे यांना शंभर टक्के माहित असतांना त्यांनी फडणवीस यांची विनाकारण, बादरायण संबंध लावून बदनामी केली त्यावर नेहमीप्रमाणे ‘सामनातुन’ श्रीमान उद्धव ठाकरे यांनी अग्रलेख लिहून विनाकारण खडसे यांनी जखमी केलेल्या फडणवीस यांच्या त्या जखमांवर पोतेभर मीठ चोळले. ज्या घोटाळ्याशी काडीचाही मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही त्या घोटाळ्याचा संबंध जेव्हा सामनाच्या अग्रलेखातून थेट चारा घोटाळ्याशी जोडल्या जातो, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जणू या राज्याचे ‘लालूप्रसाद यादव’ असे अप्रत्यक्ष तेही अग्रलेखातून लिहिल्या जाते त्यावर हसावे कि रडावे…


ज्यांची राजकीय कारकीर्द जडणघडण ज्या शिवसेनेतून झाली त्या विधान परिषद सदस्य श्रीमान प्रवीण दरेकर या अनुभवी नेत्याला नेमके विचारावे कि बोगस मजूर संस्थेचे नेमके जनक कोण आहे, ते त्यावर हुकूमत असल्यासारखे सांगतील, त्यातून ते स्वतःच कदाचित अडचणीत देखील येतील. अर्थात हे विचारण्याची, शोधण्याची जबाबदारी तशी त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्याची म्हणजे चंद्रकांत पाटील यांची. अलीकडे मी अगदी जीव तोडून चंद्रकांत दादांना म्हणालो, ज्या खात्यामुळे नितीन गडकरी आधी या राज्यात नंतर संपूर्ण देशात तदनंतर अख्या जगात गाजले, गाजताहेत ते गडकरी तुम्ही नक्की झाले असते, दुर्दैवाने ते अजिबात घडले नाही आणि त्यात त्यांची मोठी चूक आहे, असे खडसे यांच्यासारखी जीभ टाळूला लावून मी मोकळा होणार नाही….


जो उठतो तो अलीकडे चंद्रकांत पाटील आणि त्यांचे खाजगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यावर तोंडसुख घेऊन मोकळा होतो. शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर तर कागदपत्रे फडकावीत म्हणाले होते, दादांचे सारे धंदे उघड करायला यापुढे मी मोकळा आहे पण बघता बघता त्यांची भीमगर्जना हवेत विरली आणि बजेट अधिवेशनानिमित्ते भलतेच दृश्य दिसले, क्षीरसागर यांचा चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील वावर मनाला सुखावून गेला, त्यांचे नेमके त्या दादांशी कुठे जमले आणि का बिनसले होते हा तसा अभ्यास करण्याचा विषय, मातोश्रीवरून त्यास्तव आदेश जाणे गरजेचे. एकाचवेळी दादा चंद्रकांत पाटलांकडे राजकीय समनव्यय साधण्याची मोठी जबाबदारी अगदी सुरुवातीलाच भाजपा आणि मुख्यमंत्र्यांतर्फे त्यांच्यावर टाकण्यात आली वरून त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनाईक बांधकाम हि दोन्ही टेक्निकली अतिशय कठीण असलेली खाती देण्यात आली, हि कसरत दुर्दैवाने चंद्रकांत पाटलांना नेमकी जिंकता आली नाही, आणि मंत्रिमंडळात फेरबदल देखील झाले नाहीत अन्यथा चंद्रकांत पाटील आपल्याकडले सार्वजनिक बांधकाम खाते सोडणार होते, दुर्दैवाने कामाच्या जबाबदारीतून म्हणा किंवा तणावातून म्हणा, आयुष्यातल्या सुवर्णसंधीचे सोने त्यांना करता आले नाही, वास्तविक दादांचे अख्खे कार्यालय तसे बऱ्यापैकी बुद्धिमान पण ते सारे कमी पडले आणि पाटील या राज्याचे नितीन गडकरी झाले नाही, उरलेल्या वर्षभरात ते शक्य होईल असे वाटत नाही पण चंद्रकांत पाटलांकडे किंवा त्यांच्या कार्यलयात, त्यांच्या खाजगी सचिवांकडे काम घेऊन जाणारे लोकप्रतिनिधी नाराज झाले असे फारसे घडले नसावे, अर्थात महसूल आणि सार्वजनिक बांधकाम तसे दोन्ही खाते मलईदार, त्यामुळे अनेकांनी दबाव टाकून स्वतःचे फार भले करून घेतले मला ते अतिशय व्यापक माहित आहे. येथे महत्वाचे असे कि उंदीर मारण्याचा विषय तसा सार्वजनिक बांधकाम खात्यातील समस्त अभियंत्यांचा, पण मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम खाते आणि मुंबई पुणे नाशिक ठाणे येथील समस्त अभियंत्यांनी अक्षरश: चंद्रकांत दादा पाटलांना बेवकूफ बनवून या खात्याची वाट लावली. ज्या बागुल आडनावाच्या उपअभियंत्याच्या अखत्यारीत हे उंदीर प्रकरण घडले हे स्वतःला विनाकारण सज्जन म्हणवूनघेणारे उपअभियंते हे महाशय गेले २५ वर्षे सतत क्रीम पोस्टवर ठाण मांडून बसलेले आहेत त्यांनी साईड पोस्टिंग कधी बघितलेच नाही त्या बेवड्या घाडगे सारखे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *