भाकरी करपली २ : पत्रकार हेमंत जोशी

भाकरी करपली २ : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे भद्रावती वरोरा विधानसभा परिक्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्या नेत्यांवर टीका केलेली नाही, त्यांनी उद्धव किंवा आदित्य ठाकरे वाईट आहेत त्यांचे नेतृत्व कुचकामी आहे असे कुठेही म्हटलेले नाही आणि बाळासाहेबांच्या पश्चात कुठेही कमी न पडलेली शिवसेना, बापसे बेटा आणि नातू सवाई निघाले, तुम्हा आम्हा सर्वांना ते अगदी उघड दिसते आहे. बाळू धानोरकर यांनी सेनेच्या अख्ख्या मंत्र्यावर टीका केलेली आहे, ज्या दिवाकर रावते यांच्या कार्यालयात त्यांची उठबैस असते त्या दिवाकर रावते यांना देखील त्यांनी कुचकामी बिकामाचे ठरविलेले आहे आणि ते यासाठी खरे आहे कि त्यावेळेचे मंत्री दिवाकर रावते १९९५ सारखे राहिलेले नाहीत कारण अगदी उघड आहे त्यांनी सभोवताली जमविलेली अधिकारी मंडळी, त्यातले बहुतेक अतिशय भ्रष्ट आणि दुष्ट आहेत, ज्या राजेंद्र जवंजाळ यांना सार्वजनिक बांधकाम खाते थेट तुरुंगात पाठवायला निघाले होते ते थर्डग्रेड मोस्ट करप्ट राजेंद्र जवंजाळ नामें सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता दिवाकर रावते यांनी थेट परिवहन महामंडळात मागून घेतले, आता तुम्हीच सांगा, एखादी रांड नांदत्या घरात सून म्हणून आणल्यानंतर किंवा आल्यानंतर कशी अपेक्षा ठेवावी कि ती संध्याकाळी देवासमोर उदबत्ती दिवा लावून शुभम करोति म्हणेल, याउलट संध्याकाळ झाल्यानंतर मी केव्हा एकदा डान्स बार मध्ये जाऊन नाचते आणि केव्हा नाही असे तिला होईल. आणि असे कितीतरी राजेंद्र जवंजाळ त्या दिवाकर रावतेंनी जवळ बाळगल्यानंतर, कसे ते अख्खे परिवहन खाते किंवा परिवहन महामंडळ थेट रावतेंना १९९५ पद्धतीने एक मंत्री म्हणून जगू देईल, आमचे अगदी सुरुवातीपासून दिवाकर रावते यांच्यावर अगदी उघड प्रेम आहे, कडवा शिवसैनिक कसा असावा त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फक्त आणि फक्त दिवाकर रावते, उद्या समजा शिवसेनेचा प्रतिनिधी मुख्यमंत्री होणार असेल तर कसे रावते यांचे नाव पुढे येईल जर हेच रावते सुभाष देसाई किंवा रामदास कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक मंत्री म्हणून घसरणार असतील, देव करो आणि परिवहन खात्याचे वाभाडे न काढण्याची सुबुद्धी परमेश्वर मला देवो, शक्यतो मला रावते यांना दुखवायचे नाही पण खानदानी रावते यांनी त्यांच्या खात्यात घरंदाज मंडळींना महत्वाच्या पदावर नेमणे जेथे आवश्यक होते त्यांनी थेट फोर्ह्स रोडवरच्या रांडांना तेथे आणून ठेवलेले आहे, जे अत्यंत चुकीचे घडले आहे…


www.vikrantjoshi.com




आमदार बाळू धानोरकर हे कडवे सच्चे झुंजार धडाकेबाज गावठी शिवसैनिक आहेत, आधीच्या मंडळींना हुसकावून लावत भद्रावती वरोरा विधान सभा मतदार संघावर भगवा फडकविणे अतिशय कठीण असे ते काम होते पण धानोरकर यांनी ती कामगिरी यशस्वी पार पडली ते थेट आमदार झाले. कीर्तिकर यांच्या उपस्थितीत त्यांचा रोख जरी पूर्व विदर्भावर बाराही मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी अन्याय केला असा होता तरी त्यांनी भाषणातून व्यक्त केलेली खदखद या मंत्र्यांच्या बाबतीत उभ्या महाराष्ट्राला लागू पडते. ज्या कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने थैमान घातले होते, वर्षानुवर्षे तेच ते आणि तेच ते नेते घराणेशाहीतून सत्तेचा उपभोग घेत होते त्या सर्वांना थेट आस्मान दाखवून आणि तेही मोदी लाट असतांना याच कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एक दोन नव्हे तर थेट सहा आमदार निवडून आलेले असतांना आता हिंपंचवार्षिक योजना संपत आली असतांना त्या सहातल्या एकालाही मंत्री करणे तर सोडा पण साधे एखादे महामंडळ मिळू नये केवढे हे चुकीचे वागणे किंवा दुर्लक्ष…


कोल्हापूर जिल्ह्यातुन शिवसेनेचा एकही मंत्री नाही आणि नेक्स्ट टू मुख्यमंत्री भाजपाचे श्रीमान चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातले, महत्वाची खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी भाजपाची पाळेमुळे या पंचवार्षिक योजनेत खोलवर रुजवून घेतलेली असतांना तिकडे शिवसेनेचे आमदार कसाबसा आपला खर्च काढून स्वतःला आणि शिवसेनेला जिवंत ठेवण्यात धन्य 

समजताहेत, कोल्हापूरचे असूनही चंद्रकांत पाटील या सार्या आमदारांना सवतीची लेकरे म्हणून जवळ घ्यायला तयार नाहीत आणि त्या बाराही मंत्र्यांना आपल्या मतदार संघाशिवाय आणि आपल्या कुटुंबाशिवाय जग असते ठाऊक नाही त्यामुळे हसावे कि रडावे अशी त्या सहाही आमदारांची किंवा उभ्या महाराष्ट्रातल्या साऱ्याच सेनेच्या आमदारांची आणि इतर मान्यवर जिल्हा निहाय नेत्यांची एरंडेल तेल प्यायल्यासारखी किंवा हागवणीचा त्रास मागे लागल्यासारखी बिकट आणि चिकट अवस्था आहे. आमदार धानोरकर म्हणाले ते शंभर टक्के सत्य आहे कि सेनेच्या मंत्र्यांना राज्यातल्या त्यांच्या मंडळींनी गाठले कि हे मंत्री अंगावर धावून येतात आणि विचारतात तुम्ही येथे कोणाला विचारून आलात, समोरचा मग मनातल्या मनात दात ओठ खात आल्या पावली परत जातो…


अत्यंत अत्यंत महत्वाचे असे कि राज्यातल्या कोणत्याही आमदाराची ना मंत्र्यांसमोर ना मातोश्रीवर मनातले सांगण्याची सत्य सांगण्याची हिम्मत आहे, समोर गेल्यानंतर म्हाताऱ्या बैलासारखी अवस्था झालेल्या सुभाष देसाई यांच्यासारख्ये मंत्री असोत कि ठाकरे बाप बेटे फक्त खाली मान घालून ऐकून घ्यायचे, आदेश घ्यायचे आणि पुढल्या कामाला लागायचे एवढे या सार्या आमदारांना राज्यातल्या लोकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींना माहित आहे ते मजबूर आहेत, नाक दाबून वरून बुक्क्यांचा 

मार खाणे एवढेच काय सध्या त्यांच्या नशिबात असल्याने ते आमच्या सारख्या मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून याला अपवाद फक्त रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, नाही म्हणायला त्यांच्याकडे मान खांदयावर ठेवायला काही छान छान व्यक्ती आहेत पण इतर लोकप्रतिनिधी मात्र आमच्यासारख्या मित्रांच्या खांद्यावर मान ठेवून अक्षरश: डोळ्यात पाणी आणून आपल्या मनातली खदखद व्यक्त करून मोकळे होतात कारण त्यांना नेमके ठाऊक आहे माहित आहे प्रसंगी किंमत मोजावी लागली तरी 

पत्रकार हेमंत जोशी आपल्या मनातला उद्रेक नक्की व्यक्त करून मोकळे होतील, थेट उद्धव किंवा आदित्य यांना नेमकी माहिती लिहून किंवा देऊन मोकळे होतील, हरकत नाही म्हणून मी स्वतः बळीचा बकरा होण्याचे ठरविले आहे, शिवसेना आमदारांच्या मनातले सांगून मोकळा झालो आहे. खरेतर आता सेनेत देखील सारवा सारव करण्याची वेळ निघून गेलेली आहे, एखाद्या मुलीच्या लग्नाला एवढा विलंब व्हावा कि तिच्या नशिबी मंथली पिरियड्स निघून गेल्यानंतर हनिमून साजरा करण्याची वेळ यावी हुबेहूब सेनेतल्या आमदारांचे झाले आहे मधुमेह झाल्यानंतर जणू पंधरा वर्षांनी त्यांचे लग्न लावून दिल्यासारखे आता होणार आहे म्हणजे काही बदलघडलेत तरी, फार फार उशीर झाला आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *