पुढले आमदार : पत्रकार हेमंत जोशी

पुढले आमदार : पत्रकार हेमंत जोशी 

सेक्स म्हणजे संभोग हि एकमेव स्थिती अशी आहे कि जेथे भारतातले सर्वाधिक, जवळपास सारेच पुरुष मागे पुढे होत असतात. उदाहरण देतो, जसे डॉ. नेने यांना जगसुन्दरी माधुरी दीक्षित पत्नी म्हणून लाभलेली असतांनाही, मला खात्री आहे अधून मधून त्यांचीही नको ती नजर घरी काम करायला येणाऱ्या त्यांच्या तरुण, उफाड्या, पदर सारून पाडून काम करणाऱ्या मोलकर्णींवर नक्की पडत असेल. आपला सचिन…हि इज नोन फॉर दॅट…घरी परी असतांनाही…आमच्यातले हे असे पुरुष, त्यांना विचारले तर म्हणतात देखील, मिठाई आहे म्हणून काय झाले अधून मधून पाणी पुरी देखील तोंडाला मस्त चव आणते…


इतर कोणत्याही क्षेत्रात मात्र आम्ही पुरुष तडजोड करायला तयार नसतो, आज मर्सिडीज वापरणाऱ्यांना जर सांगितले उद्यापासून पूर्वीची ती हॉर्न सोडून सारे वाजणारी, विना वातानुकूलित फियाट वापरायला काढा, मला खात्री आहे, हाती जोडा घेऊन तुम्ही सांगणार्याच्या अंगावर धावून जाल. हे सारे त्या अनिल गावंडे आणि राजू वानखेडे या दोन मर्द मराठे मित्रांमुळे आठवले. अनिल आणि राजू या दोन्ही तरुणांचे त्यांच्या व्यवसायात मुंबईत छान बस्तान बसलेले पण त्यांना राजकारणात उतरायचे असल्याने, आमदार व्हायचे असल्याने त्यांनी ऐन उन्हाळ्यात थेट त्यांचे गाव गाठले, अनिल हा अकोला जिल्ह्यातल्या अकोटला तर राजू वानखेडे हे अमरावती येथे जाऊन बसलेले आहेत, अधून मधून येथे त्यांचे येणे असते पण कौतुक यासाठी कि त्यांनी ग्रामीण भागात तेही आमच्या खडूस कंगाल विदर्भात पुन्हा बस्तान बसविले आणि आता तर ते येणाऱ्या विधान सभेची खडतर भागात सतत पायपीट करून, पदरचे पैसे खर्च करून तयारी करताहेत..


www.vikrantjoshi.com


आणि हे असे करणे अजिबात सोपे नाही त्यासाठी मनाची तयारी करावी लागते आणि येथल्या सर्वस्वाचा, सुखाचा त्याग करून तेथल्या राजकीय कटकटींना गरज नसतांना बिलगावे लागते जे गावंडे आणि वानखेडे यांनी केले. राजू वानखेडे हे तर अमरावती जिल्ह्यातल्या शिवसेनेत एवढे रमले रुजले कि शिवसेनेतल्या अडसूळांनी त्यांना एखाद्या लेकरासारखे पोटाशी धरून त्यांना जिल्हा प्रमुख पदी नेमूनही टाकले. आता माझे ते स्वप्न आहे, वानखेडे आणि गावंडे आमदार म्हणून शपथ घेतानाचे…


मी मागेही एकदा लिहिले होते कि, पत्रकारितेच्या या अति प्रदीर्घ प्रवासात समाधान याचे लाभले कि असे कितीतरी कि जे एकेकाळी माझ्यासमोर काहीही नव्हते आणि आज म्हणाल तर सरकारी नोकरीत म्हणाल तर आजी माजी मंत्री म्हणून किंवा आमदार खासदार म्हणून, काही त्यांच्या व्यवसायात खूप खूप मोठे झालेले आहेत जसे वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर किंवा राज्यमंत्री पदाचा दर्जा अलीकडे मिळवून मोकळे झालेले आदेश बांदेकर असतील, किंवा पत्रकार यदु जोशी असतील, हि अशी माझ्या वृत्तपत्रात मला मनापासून सहकार्य करणारी मंडळी, आज आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आभाळाला टेकलेली व्यक्तिमत्वे बघतो, आई शपथ सांगतो, डोळे आनंदाने भरून येतात कारण मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला हे शंभर टक्के माहित आहे, असूयेने वागणे माझ्या स्वभावात आणि रक्तातही नाही, देवाने मलाही काही कमी केलेले नाही, उलट भरभरून दिलेले आहे आणि दिले नसते तरी माझे असूयेने वागणे कधीही ते माझ्या हातून घडले नसते…


आणखी एका तरुण नेत्याचा उल्लेख येथे करणे आवश्यक वाटते कारण तो देखील शंभर टक्के धारावीतून निवडून येणार आहे, उद्याचा आमदार आहे, आशिष मोरे हे ते नाव. आशिष ची पत्नी, माझ्या लेकीसारखी, तीचे आशिषशी लग्न झाले आणि केवळ त्यानंतर दीड महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूक लागल्या, आशिष ने या राजकारणात नवख्या असलेल्या, अगदीच अल्लड तरुणीला, हर्षला यांना उभे केले आणि निवडूनही आणले. भाजपच्या मुंबई अध्यक्षांना म्हणजे धडाकेबाज आशिष शेलारांना प्रत्यक्ष भेटून म्हणालोही होतो कि आशिष मोरे यांच्या पत्नीला म्हणजे हर्षला यांना उमेदवारी द्या, त्या शंभर टक्के नगरसेविका म्हणून निवडून येणाऱ्या आहेत, त्यांनी ऐकले नाही, तरीही म्हणजे भाजपा आणि शिवसेनेच्या वावटळीत त्यावेळी त्या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या. नगरसेविका झाल्या. आज ते दोघे नवराबायको शिवसेनेत आहे, बघा आशिष मोरे कोणत्या पक्षाच्या गळाला लागतात ते कारण आशिष यांच्यासाठी पक्षाचे चिन्ह महत्वाचे नाही, त्यांचे समाजकार्य आणि लोकांसाठी धावून जाणे, बोलते, आशिष अपक्ष उभे राहिलेत तरी निवडून येतील, आजतरी असे दिसते, आशिष हे धारावीतून शिवसेनेचे उमेदवार असतील आणि पुढले आमदार असतील…

तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *