पुन्हा भय्यू महाराज २ : पत्रकार हेमंत जोशी


पुन्हा भय्यू महाराज २ : पत्रकार हेमंत जोशी 

अमुक एखादे संत अनंतात विलीन झाल्यानंतर देखील त्यांचे भक्त कमी न होता वाढत गेल्याचे दिसते. शिर्डीच्या साईबाबांचे किंवा शेगावीच्या गजानन महाराजांचे किंवा स्वामी समर्थांचे भक्त त्यांच्या पश्चात मोठ्या संख्यने वाढत गेल्याचे वाढत असल्याचे सतत वाढ होत असल्याचे आपण कायम बघत आलो आहोत मात्र भय्यू महाराजांच्या बाबतीत तसे घडलेले दिसत नाही. म्हणजे होते ते देखील त्यांना आता देव मानायला तयार नाहीत आणि नव्याने तयार होणारे भक्त, प्रमाण शून्य टक्के आहे. त्यांचा इंदोरस्थित सूर्योदय आश्रम पूर्वी भक्तांनी नेत्यांनी दलालांनी तरुण बायकांनी कायम गर्दी करून असायचा आता त्या गर्दीच्या दहा टक्के देखील तमाम भक्त आश्रमाकडे महाराजांच्या पश्चात लगेचच न फिरकल्याचे दिसते, आश्रमाला लवकरच कुलूप लागल्यास आस्चर्य वाटणार नाही. मध्यन्तरी झी वाहिनी ने जे दाखवले आहे तेच खरे आहे, सूर्योदय आश्रमावरचा सूर्य केव्हाच मावळला आहे, भक्त आणि भामट्या नेत्यांनी केव्हाच तिकडे पाठ केली आहे…


अर्थात आज महाराज जिवंत असते तर तो दिवस फार दूर नव्हता कि त्यांच्या हयातीत देखील त्यांच्याच भक्तांनी आश्रमाकडे पाठ फिरवली असती कारण भय्यू महाराज संत नव्हते, चांगले गृहस्थ तर अजिबात नव्हते. हे बहुतेकांच्या ते हयात असतांनाच लक्षात यायला लागलेले होते. भय्यू महाराज हयात असतांना या राज्यातले जे जे दिग्गज नेते त्यांच्या पाया पाडण्यासाठी त्यांचे दर्शन घेण्यासाठी सूर्योदय आश्रमात गर्दी करायचे किंवा महाराज महाराष्ट्रात जेथे म्हणून जायचे तेथे रांगा लावून दर्शन घायचे थोडक्यात त्यांना थेट देव म्हणून पुजायचे त्या सर्वांना मग ते मोहन भागवत असतील, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे असतील, दिलीप वळसे पाटील किंवा राम नाईकांसारखे राज्यपाल असतील, कित्येक शासकीय व प्रशासकीय अधिकारी असतील आजी माजी मुख्यमंत्री असतील, नितीन गडकरी किंवा अनेक कित्येक नेते उद्योगपती असतील त्या सर्वांना आज त्याच भय्यू महाराजांविषयी चार चांगले शब्द वाक्यबोलायला लिहायला सांगा किंवा चार पाने लिहायला सांगा, मला शंभर टक्के खात्री आहे कि एकही तसे करण्यास धजावणार नाही कारण त्यांची देखील एकूण पुरावे बघून खात्री झालेली आहे कि भय्यू महाराज संत नव्हतेच पण ते चांगले गृहस्थ देखील नव्हते. विशेष म्हणजे त्यांना फक्त शरद पवार आणि अजित पवारांनी मात्र नेमके ओळखलेले होते….


भय्यू महाराज तर गेले पण त्यांच्या पाठी उरलेले जे जे म्हणून त्यांचे कुटुंब सदस्य किंवा विनायक, संजय यादव यांच्यासारखे जे उजवे डावे हात आहेत खरे तर या मंडळींची कसून चौकशी व्हायला हवी त्यातून नक्की नेमके सत्य बाहेर येईल कि महाराजांकडे नेमकी संपत्ती किती होती आणि ते नेमके कसे स्त्रीलंपट किंवा विकृत होते. मागेही एकदा मी सांगितले होते कि खऱ्या अर्थाने भय्यू महाराजांच्या जवळच्या नातेवाईकाने म्हणजे इंदोरला सूर्योदय आश्रमा शेजारी राहणाऱ्या शरद पवार या गृहस्थाला जर पोलिसांनी विश्वासात घेतले तर ते महाराजांच्या पश्चात उरलेल्या बदमाश उजव्या डाव्या हातांचे तंतोतंत वर्णन करून सांगतील. महाराजांनी, जेव्हा त्यांचे मावशे शरद पवार यांनी वारंवार सांगून, कि असे तू वागू नको, सांगूनही ऐकले नाही तेव्हाच इंदोर मधले या राज्याचे नेते नव्हेत केवळ नाम साधर्म्य, शरद पवार भलेहि आश्रमाशेजारी राहायला होते पण मनाने मात्र ते भय्यू महाराजांपासून काही महिने आधीच कोसो मैल दूर निघून गेले होते…


याची बदली करून दे त्याला तिकीट मिळवून दे याची फाईल क्लिअर करायला सांगणे त्याला कंत्राट मिळवून देणे हे काम कोणत्याही संतांचे नसते ते दलाली करणाऱ्यांचे काम असते. अमुक एखाद्या प्युअर संताने अशी कामें केल्याचे तुम्ही आम्ही कधीही वाचलेले नाही कारण संत हे आपण परमेश्वराचे रूप मानून त्यांच्या पाय पडतो त्यांना शरण जातो पण येथे भय्यू महाराजांजवळ तर भलतेच घडायचे, पुढे पुढे तर त्यांनी अशी हवा पसरवली होती कि या राज्यातले मराठे मोर्चे केवळ त्यांच्या मार्गदर्शना खाली निघताहेत आणि तेच हे मोर्चे थोपवू थांबवू शकतील, पण एक बरे झाले जेव्हा मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या हे कानावर गेले तेव्हा त्यांनी भय्यू महाराजांची आई बहीण थेट पत्रकारांसमोर घेतली आणि भय्यू महाराज व कंपू त्यातून नागडा झाला उघडा पडला…. 


स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आम्ही कसे भय्यू महाराजांना जवळचे हे सांगणारे या राज्यातले नेते आणि भय्यू महाराज देखील मी कसा यशस्वी राजकीय संत त्यांच्या भक्तांसमोर सांगून जे एक हिडीस वातावरण काही वर्षे या राज्यात त्या त्या नेत्यांनी आणि भय्यू महाराजांनी युती करून निर्माण केले होते, बरे झाले ते दृश्य एकदाचे काळाच्या पडद्याआड गेले आणि भय्यू 

महाराज कोणत्याही अँगलने परमेश्वरी अवतार नव्हते त्यामुळे त्यांच्या पश्चात अगदी तातडीने सूर्योदय आश्रमातली संपलेली ओसरलेली गर्दी आणि भक्तांची गळती हे त्याचेच द्योतक आहे कि भोळे भाबडे असूनही भक्तांच्या ते लक्षात आले कि आपण देव समजून चुकीच्या माणसाच्या पाया पडलो….


अगदीच एखादा दुसरा अपवाद या राज्यात असू शकतो कि त्याला खऱ्या अर्थाने संत म्हणून जगायचे आहे, सद्गुरू म्हणूच मारायचे आहे, पण असे उदाहरण अगदी विरळ त्यामुळे मराठी माणसाने जिवंत असलेल्या आणि स्वतःला सद्गुरू संत महाराज बुवा म्हणवून घेणाऱ्या तद्दन व्यक्तींच्या बाबतीत मोठी सावधगिरी बाळगावी, अलीकडले या राज्यातले बहुतेक महाराज किंवा संत म्हणजे केवळ एक थोतांड हे सर्वांनी लक्षात घ्यावे म्हणजे पुढे पश्चाताप होत नाही. भय्यू महाराज आणि त्यांच्या पश्चात उरलेले त्यांचे वाटेकरी, सध्या जे तुम्ही आम्ही बघतो आहे, वाचतो आहे ते तर केवळ हिमनगाचे एक टोक आहे, माझ्या लिहिण्यावर अनेकदा मला बंधने असतात म्हणून फार टोकाचे पाऊल लिखाण करतांना उचलता येत नाही पण भय्यू महाराज हयात असतांना आणि ते वर गेल्यानंतर देखील मी जे लिहिले सांगितले ते कसे शंभर टक्के सत्य आहे होते हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. महाराज तर संपले पण त्यांच्या पाठी उरलेले राहिलेले जे विनायक सारखे महाबदमाश मलिदा राखून आहेत त्यांची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *