भ्रष्टाचार केलाच पाहिजे!!

छगन भुजबळ लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. अजित पवार आणि सुनील तटकरे त्यातून बचावले, अस म्हटल तरी आता  चूक होणार नाही. हे आम्हा पत्रकारांना तेव्हाच समजले, जेव्हा मोदी साहेब बारामतीला गेले. या सगळ्या लेखाजोकात भुजबळांचा “बळी” दिला गेला. हो बळीच! “राजकीय सेटिंग” यालाच म्हणतात.  तुम्हाला या ब्लोग मार्फत आज थोडीशी वेगळी दिशा येथे देऊ इच्छितो.  विचार करा. पटेलच असे नाही!!

शेवटी भ्रष्टाचार ही समजाला लागलेली एक कीड आहे. माझ्या मतानुसार पुढली ५० वर्षे तरी आपल्याला, आपल्या स्वप्नातले सरकार बघता येणार नाहीय, हे निश्चितच. आमचे बाबा म्हणतात तसे. आपल्या कडे, म्हणजे महाराष्टात, हिटलर जन्माला आला पाहिजे. किवा किमान २५ वर्ष तरी हुकुमशाही हवी. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, जे कोणी पहिले ५०० लोक भ्रष्ट आहेत,  त्याना सरळ फाशी दिली पाहिजे. तरच आपणा सुधारू!! असे चालत राहिले तर मग कोणीही येवो, अगदी स्वतः  भगवान कृष्णाने मुख्यमंत्री पदाची जरी शपथ  घेतली, तरी आपणा सुधारणार नाही, हे तुम्ही अगदी पक्के मानून चाला. मागच्या महिन्यातील सलमान खान चे उधाहरण घ्या. पैश्यांच्या जोरावर तुम्ही दारू प्यायची, वाटेल तो धिंगाणा घालायचा, लोकांना मारायचे, आणि इन्स्पेक्टर ची भूमिका करून आम्ही कसे देशभक्त आहोत, हे सांगून मोकळे व्य्हायचे. काही अर्थ आहे का याला? जे सिनेमा जाणकार असतील किवा ज्यांचा कडे या “बीट” च्या  “ऑफ द रेकॉर्ड” बातम्या असतील त्यांना विचारा… किती भयंकर आहे हा सलमान खान? मग्रूर आणि व्यसनी. “बिंग ह्युमन” संस्थेची माहिती घ्या. पैसा कुठून येतो, कुठे जातो? कोणता “बाबा” राजकारणी यांच्या मर्फ़ात पैसे वेगवेगळे हॉटेल, पब मध्ये गुंतवणूक करतो? आमिष दाखवून कित्येक स्त्रियांचे आयुष्य हे लोक बरबाद करतात. मी फार जवळून बघतो. मी यांच्या परिसरात राहत असल्याने अनेक किस्से कानावार येत असतात . असो. विषय आहे  भ्रस्टाचाराचा! 

 कस असत, राजकारण  म्हटल कि भ्रष्टाचार, आणि, फक्त भ्रष्टाचार!  कारण एक मेकांवर पाय ठेऊनच इथे पुढे जायाच 

असत, हा जणू इथला ” रूल ”  आहे.  साम, दाम, दंड भेद हि सगळीच अस्त्रे  हमखास  वापरली  जातात.  पण हे सगळ करण्यापलीकडे खूप कमी नेते असतात, जे स्वतः  मोठे होत असताना, इतर लोकांनाही खूप मोठे  करत असतात. जे दिलदार असतात. ज्यांच्यात काही करण्याची उमेद असते, पण शेवटी हे लोकही ” त्या ” काळाचे सिस्टम मधून आलेले आहेत,  हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  शरद पवार, कै. आनंद दिघे , छगन  भुजबळ, नारायण राणे, मनोहर जोशी, सुनील तटकरे, नितीन गडकरी, कै. गोपीनाथ मुंडे असे कितीतरी राजकारणी आहेत ज्यांच्या मोठ्या मनाबद्दल मी ऐकून आहे.  या लोकांनी जर भ्रष्टाचार केला आहे, तर याच लोकांनी महाराष्ट्र पण घडवला आहे, अगदी १० % का होईना , हे सत्य तुम्हाला मानवच लागेल. तुम्ही सांगा, कोण तुमच्यापैकी रोज १२ वाजता झोपून, सकाळी ४ वाजता उठता?  आणि दारात सकाळच्या ६ वाजे पासून लोकांची कामे करता?.  दिवसभर कामे करायची, तब्येतीकडे दुर्लक्ष करायचे, (रोग पचवायची किवा त्यावर मात करायची) संसाराकडे दुर्लक्ष करायचे आणि फ़क़्त आणि फक्त कामात राहायचे. दारोज 

अभ्यास करणे,  मीटिंग घेणे,  मह्तव्हाचे निर्णय घेणे, सत्ता टिकवण्यासाठी श्रम, आपल्याहून पुढे कोणी जात नाही 

याच्याकडे लक्ष, सतत टेन्शनस असतात या राजकारण्यांवर … कारण एकहि  चुकीचा निर्णय घेतला तर अख्खं महाराष्ट्र 

यांच्याच डोक्यावर येत!!  वर नमूद केलेला दिनक्रम आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांचा. शरद पवार तर हे गेली ५० वर्ष करीत आहे. विचार टकले साहेबांना. पण याच अजित पवार याची दुसरी बाजू बघा…  सतत कामात असल्याने पवारांना मात्र पोराकडे दुर्लक्ष केले. नुसता पैसा कमवून, चालत नाही दादा.  पार्थ बघा कसा धिंगाणा घालत असतो.  मध्ये वाचले होते त्याच्या बद्दल.  आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल. भ्रष्टाचार सहन करण्याची  मानसिक तयारी करावी लागेल . हा काही सिनेमा नाही. कि आज विचार केला आणि आपण भ्रष्टाचार संपविला…  

कसे चालते ते बघा … समजा सरकार मध्ये  १०० रुपयांचे काम असत, त्याचे हे लोक (मंत्री, अधिकारी आणि कंत्राटदार) 

२०० रुपयांचे बिले लावतात  आणि १० रुपयांचे “खर काम” करतात. कधी कधी तर ते पण नाही करत.  म्हणजे  सरळ सरळ १९० रुपये राजकारणी, अधिकारी आणि कंत्राटदारच्या खिश्यात घालतात.  तुम्ही असे का नाही करात हो मंडळी ? 

कि बाबारे, जर १०० रुपयांचे काम करायचे असेल तर तुम्ही त्याचे बिल १२० रुपयांचे लावा, पण काम मात्र ९० रुपयांचे तरी करा. ती कामे दिसू द्या .यात जर तुम्ही दोन पैसे खालले तरी कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही, हे प्रामणिक मत माझे आणि माझ्या काही व्यावसायिक मित्रांचे आहे.  आज आपल्याला प्रगती करायची आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणूस आपली दुसरी पिढी परदेशात पाठवण्याच्या मार्गावर आहे. साल, भारताचे दिवस, आणि बाहेर का जायचे आम्ही? अख्खं जग इथे धंदा करायला येत आहे, आणि आपल्याकडे सुविधा नसल्याने/भ्रष्टाचारामुळे  आपणच बाहेर का जायचे?  नो। नेव्हर!! 

अहो भुजबळ यांनी जे पैसे कमाविले, त्यात मोठ्ठा वाटा आहे समीर भुजबळ याचा… लई महत्वाकांक्षी!! हाताशी अभियंते, सिंधी दलाल आजूबाजूला (सा. बां. विभागात हा एल. टी कोण हा लेख लोकसत्तेने दोन वर्षांपूर्वी छापला होता) , वयाची मस्ती, आपले कोण काय उपटणार हि भावना, समता परिषद च्या नावाने पवार यांना सतत ब्ल्याक्मेल, कोण खपवून घेणार होत? कोणत्या पक्षाने हे होऊ दिले असते?  आणि सगळ्यात वाईट काम भुजबळ कुटुंबीयने जर केले असेल तर ते कर्वेला दुखावून!! आहो ते कर्वे किती दिव्होटी होते तुमच्या कुटुंबां बद्दल? … एखाद्या धंद्यात लक्ष नाही घातले असते तर आज हि नाचक्की झाली नसती. तो तुमचा सी. ए. होता ना?  तुम्ही चड्डी कोणती घालता हे सुद्धा त्यांना माहित होते. बाहेर येणारच… पण आपला खरा सलाम बॉस देवेंद्र फडणवीस आणि श्रीमान प्रवीण दिक्षित यांना. एवढ्या मोठ्या नेत्याला संपविणे म्हणजे काय खेळ होता का? केवढे प्रेशर असेल त्यांच्यावर? पण साहेब आता तरी याच धाधाडीने भरपूर नावे आहेत ज्यांच्या कडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे… “आगे आगे देखो होता है क्या”? हि फडणवीसांची धमकी कोणासाठी होती? तरी अजित पवार, तटकरे, जयंत पाटील, सचिन अहिर, गणेश नाईक, शिवाजीराव मोघे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड,  अनिल देशमुख तुम्ही सगळे जरा सगळ सगळ आटोक्यात घ्या बर… काहीही सांगू शकत नाही काय चालंय या दोन शूरवीर “ब्राह्माणाच्मनात ? एखाद वेळी गडकरी आणि खडसे साहेब तुम्ही सुद्धा जरा जपून वागा बर.  फडणवीस मोदींचे  लाडके आहेत   असे लोकच सांगतात.  

पैसे कमाविणारे लोक मला सांगतात कि अरे भाऊ पुढच्या पिढीची सोय करायची आहे… अहो पण  पैसा कमविणे पाप नाही, पण तुम्ही लोक असे कमविता कि जसे तुमची पुढची पिढी हि ” नामर्द” च  होणार आहे…अमेरिकेत, किवा कोणत्या हि पश्चिम देशात एकदाचे पोर १८ वर्षांचे झाले कि त्याला घराच्या बाहेर काढले जाते. त्यानेच त्यांच आयुष्य सुधारत. आपला पोरगा सेट होई पर्यंत “ब्रेड बटर” द्या ना… कोण नाही म्हणतय?  इथे आपले  पोराचे पोर पण होऊ द्या तरी आपले कमविणे मात्र सुरूच राहिले पाहिजे, अशी स्मजूद आपले राजकारणी करतात आणि तेथेच  ते चूक करत आहेत, आपली पुढची पिढी “नपुंसक” बनवत आहेत!!!  आता लक्षात नाही येणार, पण जेव्हा हाच पोरगा तुमचा चावा घेईल, किवा एखादा व्यसनाधीन होऊन एखादा रोग पाछाडेल, तेव्हा वेळ मात्र निघून गेली असेल… पुत्र प्रेम असणे गैर नाही पण आपल्याच हाताने त्यांचा तुम्ही खून करत आहात हे लक्षात घ्या…इंग्रजीत एक म्हण आहे, ” Anything in excess is Poison”

 तूर्त एवढंच !!!! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *